शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

प्रत्येकाने आपले मन वाचनाकडे वळवून ज्ञानाने समृध्द व्हावे - जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार







            बीड, दि.17:- सध्याच्या वैज्ञानिक युगात मुलांमध्ये व्हॉटसअप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. यामुळे आपल्या संस्कृतीचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी ग्रंथ हेच गुरु आहेत. यामुळे प्रत्येकाने आपले मन वाचनाकडे वळवून ज्ञानाने समृध्द व्हावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार यांनी केले.
          जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बीडच्या वतीने ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवाचे 2017 चे त्यांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, शिक्षण विभागाचे बापुसाहेब हजारे, अनंतराव चाटे, म. दा. शहाणे मंठेकर, संदिप नेकडे प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी दि.ना.काळे यांच्यासह जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
          पुढे बोलताना श्रीमती गोल्हार म्हणाल्या की, भारताच्या ग्रंथसंपदेमुळेच भारतीय संस्कृतीची संपूर्ण जगाला ओळख झाली असून आपली संस्कृती ही जगभर पोहोचली आहे. माणसाची वैचारिकता वाढविण्यासाठी शालेय जीवनात वाचन खूप महत्वाचे ठरते त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाची कास धरुन आपले ध्येय प्राप्त करावे. बीडकरांना ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून एक चांगली दोन दिवसीय संधी मिळाली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, जिल्ह्यातील वाचनालयात विविध पुस्तकांची व ग्रंथाची खरेदी ग्रंथोत्सवातून करावी. तसेच वाचनालयात  जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचे साहित्य ठेवले पाहिजे यासाठी वेगळे दालन निर्माण करुन त्यांना वेगळे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील साहित्यिकांचे  ग्रंथ आपल्या वाचनालयात ठेवल्यास आपल्या जिल्ह्याचा लौकिक वाढण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी दि.ना.काळे यांनी ग्रंथोत्सावाबाबतची माहिती विषद करुन वाचक, साहित्य प्रेमीणा एकाच ठिकाणी आपल्या आवडीचे प्रुस्तके, साहित्य उपलब्ध व्हावे व वाचन संस्कृती वाढावी या ग्रंथोत्सवामागचा हेतू आहे असे त्यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले.
          ग्रंथोत्साव 2017 ची सुरुवात ही ग्रंथदिडीने करण्यात आली. यामध्ये शालेय भजनी मंडळ, वाचक, विविध विभागाचे अधिकारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही ग्रंथदिडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात येऊन विसर्जीत करण्यात आली. या कार्यक्रमास वाचनालायाचे पदाधिकारी, कर्मचारी, वाचक, साहित्य प्रेमी, पत्रकार यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या  प्रमाणात उपस्थित होते.

शनिवार दि.18 नोव्हेंबर 2017 रोजी  सकाळी 10.30 ते 1.00 वा. कालावधीत ग्रंथाने काय दिले या विषयावर म.सा.प चे सदस्य डॉ. सतिश साळूंके यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या परिसंवादामध्ये कोषागार अधिकारी श्रीरंग भूतडा, दैनिक सकाळचे उपसंपादक अरविंद रेड्डी, प्रा. डॉ. सोपान सुरवसे,प्रा. श्रीधर ढास,अमर फफाळ यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 1.30 ते 2.30 वा. ग्रंथवाचक गौरव व ग्रंथोत्सव सहभाग  प्रमाणपत्र वाटप. दुपारी 2.30 ते 4.30 वा. या कालाधीत काव्य वाचनाचा कार्यक्रम होणार आहे.                                                       -*-*-*-*-

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा


            बीड, दि.16:- भारतीय प्रेस परिषदेच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने गुरुवार दि.16 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता बीड येथील जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
          कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी, उपाध्यक्ष नागनाथ जाधव, संपादक दत्तात्रय दमकोंडवार, अभिजित गाठाळ, रामचंद्र जोशी, प्रदीप कुलकर्णी, गोविंद वाघ, किसन माने, श्रीमती प्रतिभा गणोरकर, सुंदर देशमुख, महेश जोशी, संतोष राजपूत यांच्यासह जिल्हा माहिती कार्यालयातील मिलिंद तुपसमिंद्रे, शिवाजी गमे, रईस अहेमद, भगवान ढाकरे, छगन कांडेकर, श्रीमती लता कारंडे आदि उपस्थित होते.
-*-*-*-*-


बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

जिल्हास्तरीय शालेय बँड स्पर्धेचे आयोजन, स्पर्धकांनी सहभागी व्हावे



            बीड, दि.15:- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड यांच्यामार्फत गुरुवार दि.16 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 2 वाजता बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय शालेय बँड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
          19 वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठी ही स्पर्धा असून एक संघाची संख्या 20 राहील. सादरीकरणासाठी जास्तीत जास्त 3 ते 5 मिनिटांचा कालवधी असेल, चित्रपटाच्या गीतांचा व राष्ट्रगीताच्या धुनवर सादरीकरण नसावे. बँड पथकाच्या सादरीकरणासाठी पाईप ॲन्ड ड्रम बँड यांचा समावेश असावा. बँड पथकाचे सादरीकरण हे देशभक्तीवर असावे, पथकाला गणवेश असल्यास प्राधान्य देण्यात येईल. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, विद्यालय, महाविद्यालयांनी या स्पर्धेची दखल घेवून संघ, विद्यार्थांना स्पर्धेत वेळेवर सहभागी करावे. ही स्पर्धा जिल्हास्तरीय होऊन राज्यस्तर, क्षेत्रिय व राष्ट्रीयस्तरावर होत आहेत. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

विविध ग्रंथाची बीडकरांना मेजवाणी, बीड शहरात ग्रंथोत्सवाचे आयोजन



            बीड, दि.14:- बीड जिल्हा  ग्रंथोत्सव हा दि. 17 व 18 नोव्हेंबर २०१७ असे  दोन दिवस  भरविण्यात येणार आहे. ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन ग्रंथविक्री असा ग्रंथोत्सवाचा उद्देश असून प्रकाशक, ग्रंथप्रेमींना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. बीड जिल्हा ग्रंथोत्सव-2017 चा शुभारंभ  ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री  तथा  बीड जिल्ह्याच्या  पालकमंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ  मुंडे  यांच्या  हस्ते  शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसर, नगर रोड, बीड येथे करण्यात येणार  आहे.
            ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने त्याचठिकाणी जिल्हयातील मान्यवर साहित्यिकांची प्रकमुलाखत तसेच काव्यवाचन आणि वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार हेत. मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे,  ग्रामीण भागातील लोकांसह शहरी लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून वाचन संस्कृती वाढावी, या उदेशाने दि. 17 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत प्रभावी वाचन माध्यमे, ग्रंथाने मला काय दिले?  काव्यवाचन, कथाकथन, आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात  विविध क्षेत्रातील वक्ते ,मान्यवर भाग घेणार आहेत. तसेच बीडकरांना राज्यातील विविध दुर्मिळ पुस्तकांचे स्टॉल्स एकाच ठिकाणी उपलब्ध  होणार आहेत.
            ग्रंथोत्सवाची सुरुवात दिनांक 17 नोव्हेंबर रोजी ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथदिंडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ते शिवाजी पुतळा मार्गे परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अशी काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीत  शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे  पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.  ग्रंथोत्सवाचा बीड जिल्ह्यातील  विद्यार्थी, शिक्षक व ग्रंथप्रेमी नागरिकांनी  लाभ घ्यावा. असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष एम.डी.सिंह व प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा  ग्रंथोत्सव समन्वय समितीचे सदस्य सचिव दि.ना.काळे यांनी केले आहे. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-




जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत नेहरु यांना अभिवादन



            बीड, दि.14:- जिल्हाधिकारी कार्यालयात पंडीत नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी एस.जी.भुतडा, सय्यद कलिम, श्री.नवगीरे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पंडीत नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

-*-*-*-*-

अन्न व औषध प्रशासनाची प्रतिबंधित पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई



            बीड, दि.14:- अन्न व औषध प्रशासनाच्या बीड कार्यालयास गुप्त खबर प्राप्त झाल्यानूसार बीड शहरातील साठे चौकामधील न्यु तारा पान सेंटर येथे प्रतिबंधीत पदार्थाची राजरोस विक्री करण्यात येते अशी माहिती मिळाली. या विक्रीची खात्री झाल्यानंतर श्रीमती जाधवर यांच्या टीमने पान सेंटरवर धाड टाकली व धाडीत प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटखा, बाबा गुटखा, पेट्रोल गुटखा, एक्का गुटखा, रजनीगंधा पानमसाला व सुगंधीत तंबाखु व सुपारीचे 17 हजार 672 रुपयांच्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच या व्यवसायासाठी वापरात येणारी पानटपरीसुध्दा जप्त करण्यात आली असून तिची किंमत अंदाजे 45 हजार इतकी आहे. व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शासनाने बंदी घातलेल्या पदार्थाचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक व विक्री करु नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे बीडचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करावेत



            बीड, दि.14:-शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सन 2014-15, 2015-16, 2016-17 या आर्थिक वर्षातील राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.


  राज्यातील सर्वोकृष्ट खेळाडू, साहसी दिव्यांग खेळाडू, संघटक, कार्यकर्ते, उत्कृष्ट मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक यांच्यासाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, क्रीडा महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रस्ताव दि.30 नोव्हेंबर 2017 पर्यंत विविध तपशीलासह अर्ज नमुन्यात ऑनलाईन पध्दतीने सादर करावा तसेच 2014-2015 या पुरस्कारासाठी ज्यांनी अर्ज सादर केले होते अशांनी पुन्हा नवीन शासन नियमावलीनूसार अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.mumbaidivsports.com या संकेतस्थळावर करावेत. अर्जाची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे साक्षांकीत प्रमाणपत्रासह सादर करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व अभियानाचा नायगाव येथे शुभारंभ



            बीड, दि.14:-प्रधानमंत्री सुरक्षीत मातृत्व अभियानाचा दि.9 नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, नायगाव येथे जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार यांच्या अध्यक्षतेखाली व आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.  
            गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दरमहा 9 तारखेला स्त्री रोग तज्ञाच्या सेवा या मोहिमेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. खाजगी व्यवसाय करणारे एकुण 65 स्त्री रोग तज्ञ हे गरोदर मातांची मोफत आरोग्य तपासणी करुन गरोदर मातांवर उपचार करणार आहेत. तसेच अतिजोखमीच्या माता शोधून त्यांना उपचार तसेच योग्य वेळी संदर्भ सेवा देऊन सुरक्षीत बाळंतपण कशा पध्दतीने होईल जेणेकरुन माता व बालक सुरक्षीत राहील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रत्येक गरोदर मातेची किमान एक सोनोग्राफी मोफत करण्यासाठी जिल्ह्यातील एकुण 39 डॉक्टरांनी सहमती दर्शविली असून त्यांच्या खाजगी दवाखान्यात गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी करण्यात येणार आहे.
            या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर, पं.स. सदस्य देविदास शेंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ.संजय कदम तसेच परिसरातील विविध गावचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

निवृत्तीवेतन धारकांनी हयातनामे बायोमेट्रिक पध्दतीने सादर करावेत


            बीड, दि.14:- बीड कोषागार कार्यालयातर्गंत निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातनामे बायोमेट्रिक मशीनद्वारे ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यासाठी संबंधितानी स्वत:चे पीपीओ क्रमांक, आधारकार्ड, पासबुक व मोबाईलसह कोषागार, उपकोषागार कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून ऑनलाईन हयातनामे सादर करावेत.
            निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी संबंधित तालुक्याच्या उपकोषागार कार्यालयात जाऊन आपापले हयातनामे बायोमेट्रिक मशीनद्वारे ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. हयातनामे सादर करण्याची अंतीम मुदत दि.31 डिसेंबर 2017 पर्यंत आहे. मुदतीत हयातनामे सादर न केल्यास माहे जानेवारी 2018 पासून निवृत्तीवेतन अदा केले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तरी सर्व निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी मुदतीत हयातनामे सादर करुन सहकार्य करावे. असे बीडचे कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह



          बीड, दि.10:-जिल्ह्यातील नागरिकांनी भ्रष्टाचारासंबंधी केलेल्या तक्रारीचे वेळेवर निराकरण होणे गरजेचे असल्याने जिल्हा भ्रष्टाचार ‍निर्मुलन समितीकडील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष एम.डी.सिंह यांनी केले.    
          जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संपन्न झाली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री.मिसाळ यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
          पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले की,  जिल्ह्यातील शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्याविरुध्द प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. संबंधितांच्या तक्रारीचा अहवाल वेळेत द्यावा यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशी सुचनाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी प्राप्त झालेल्या 11 तक्रारीवर संबंधित कार्यालयाकडून प्राप्त अहवालाची चौकशी करुन योग्य त्या सूचना केल्या.
          शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याविरुध्द भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास समितीसमोर उपस्थित राहून लेखी स्वरुपात मांडावी असे आवाहन करण्यात आल्याने काही तक्रारदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली तक्रार जिल्हाधिकारी श्री.सिंह यांच्यासमोर मांडली. त्यावर जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी संबंधित विभागाच्या प्रमुखांना संबंधितांच्या तक्रारीविषयी जलदगतीने तक्रार निवारण करण्याच्या सूचना केल्या. या बैठकीस विविध विभागाच्या विभागप्रमुखासह, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

सहाय्यक कनिष्ट पदासाठी 13 नोव्हेंबरला कागदपत्र तपासणी

सहाय्यक कनिष्ट पदासाठी
13 नोव्हेंबरला कागदपत्र तपासणी


          बीड, दि.8:-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये सरळसेवा भरती 2016-17 अंतर्गत सहाय्यक (कनिष्ट) पदाकरीता दि.9 व 30 जुलै 2017 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली असून या लेखी परीक्षेचा निकाल www.msrtcexam.in या संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. निकालानूसार अंतिम निवड यादीवरील उमेदवारांची मुळ कागदपत्र व दाखल्याची तपासणी सोमवार दि.13 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता बीड येथील राज्य परिवहनच्या विभागीय कार्यालयात करण्यात येणार आहे. तरी संबंधित उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीस हजर रहावे. असे विभाग नियंत्रक, राज्य परिवहन, बीड यांनी कळविले आहे.

जिल्हा भ्रष्टाचार समितीची बैठक; तक्रार असल्यास उपस्थित रहावे



          बीड, दि.8:-जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्याविरुध्द प्राप्त होणाऱ्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार      दि.10 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याविरुध्द भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास समितीसमोर उपस्थित राहून लेखी स्वरुपात मांडावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव चंद्रकांत सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अर्ज करावेत



          बीड, दि.8:- भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवासासह शिक्षणाची मोफत सोय असणाऱ्या जवाहर नवोदय गढी येथे इयत्ता सहावी वर्गात प्रवेशाकरीता www.nvshq.org,  www.jnvbeed.org संकेतस्थळावरुन अर्ज प्राप्त करुन विद्यार्थी पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रमाणित करुन घ्यावा. विद्यार्थी, पालक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असलेला अर्ज प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, गढी यांच्याकडे सादर करावेत.
          परीक्षेसाठी विद्यार्थी, विद्यार्थींनी बीड जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत सत्र 2017-18 मध्ये इयत्ता पाचवी वर्गात शिकत असला पाहिजे, उमेदवार हा इयत्ता तिसरी, चौथी पूर्ण शैक्षणिक सत्र सलगपणे सरकारमान्य शाळेतूनच उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराचा जन्म 1 मे 2005 ते 30 एप्रिल 2009 या कालावधीत झालेला असावा. उमेदवारांचा ग्रामीण भागासाठी आरक्षित 75 टक्के जागाकरीता पात्र  उमेदवार हा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी सलगपणे फक्त ग्रामीण विभागातील सरकारमान्य शाळेतूनच शिकलेला असावा. एक दिवस जरी तो शहरी विभागातील शाळेत अध्ययन केलेला असल्यास त्यास शहरी समजण्यात येईल. प्रवेश अर्ज सेतू केंद्रातून दि.25 नोव्हेंबर 2017 पुर्वी भरण्यात यावेत. अधिक माहितीसाठी www.nvshq.org,  www.jnvbeed.org या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा 02447-259607, 259491 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, गढी ता.गेवराई जि.बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

रमाई आवास घरकुल योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत


          बीड, दि.7 :-जिल्ह्यातील ग्रामीण भागाकरीता 4 हजार आणि शहरी भागासाठी 800 प्रमाणे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत.
          ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर करावेत व पंचायत समितीमार्फत सदरील प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये सादर करण्यात येतील. शहरी भागातील लाभार्थ्यांनी प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये सादर करावेत त्यांनतर हे प्रस्ताव मंजूरीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे सादर करण्यात येतील.
          प्रस्तावासोबत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी ग्रामसभा ठराव, जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, ओळखपत्र, पीटीआर सातबारा किंवा आठ अ, उत्पन्न प्रमाणपत्र, ग्रामसेवकांनी दिलेले लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र व कच्चे घर अथवा बेघर असल्याचे प्रमाणपत्र, जॉबकार्ड, बँक पासबूक झेरॉक्स तर शहरी भागातील लाभार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, ओळखपत्र, दारिद्ररेषेखालील कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बाँन्डवर लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, पीटीआर, पीआर कार्ड आदि कागदपत्रे सादर करावी. गरजू व पात्र ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी ग्रामसेवकास संपर्क साधून प्रस्ताव सादर करावेत तसेच शहरी भागातील लाभार्थ्यांनी संबंधित नगरपरिषद,  नगरपंचायतीमध्ये प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्याधिकारी व  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांनी केले आहे.

-*-*-*-*-

विशेष इंद्रधनुष्य मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन संपन्न



                        
          बीड, दि.7 :- अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे विशेष इंद्रधनुष्य मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील मोहीमेचे उदघाटन बीड जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
          यावेळी जि.प.सदस्य शंकर उबाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.एल.मोरे, डॉ.जे.एन.सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ.सहासष्टे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
          प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत स्त्री रोगाची तपासणी करणे तसेच सर्व बालकांचे संपूर्ण लसीकरण व गरोदर माताची तपासणी करण्याचे आवाहन सभापती श्री.देशमुख यांनी यावेळी केले. बीड जिल्हा आरोग्य विभागाने चांगली आरोग्य सेवा देऊन आदर्श पॅटर्न राबवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          जिल्ह्यात दि.7 ते 18 नोव्हेंबर 2017 या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात 192 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

नोंदणी रद्द केलेल्या न्यासाची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द


                        
          बीड, दि.7 :- धर्मादाय न्यासाच्या विश्वस्तांनी संस्था, न्यास नोंदणीपासून नियमावलीप्रमाणे कार्यकारी, विश्वस्त मंडळाचे बदल अर्ज किंवा मागील पाच वर्षापर्यंतचे हिशोबपत्रके सार्वजनिक न्यास  नोंदणी कार्यालय, बीड येथील कार्यालयात दाखल केले नाही अशा न्यासाची यादी धर्मादाय संघटनेच्या संकेतस्थळावर व बीड येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संबंधित न्यासाच्या विश्वस्तांना हरकत घ्यावयाची असल्यास त्यांनी पुराव्यासह धर्मादाय कार्यालयात सुनावणीच्या दिवशी उपस्थित राहून समक्ष हरकत दाखल करावी अन्यथा त्यांच्या न्यासाची नोंदणी रद्द करण्यात येईल. असे सहायक धर्मादाय आयुक्त, बीडयांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

मौखिक आरोग्य मासअंतर्गत जिल्हा रुग्णालयात मोफत पेस्ट व ब्रशचे वाटप


                        
          बीड, दि.7 :- राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमातर्गंत मौखिक आरोग्य मास दि.1 ते 30 नोव्हेबर 2017 या कालावधीत राबविण्यात येत असून इंडीयन डेंटल असोसीएशन शाखा बीड आणि जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांची तपासणी करुन त्यांना टुथ पेस्ट व ब्रशचे वाटप जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
          कार्यक्रमामध्ये तोंडाची व दाताची निगा कशी ठेवावी तसेच दात घासण्याच्या विविध शास्त्रोक्त पध्दतीवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्फत टुथपेस्ट व टुथ ब्रसचे वाटपही यावेळी करण्यात आले. तसेच हा कार्यक्रम विविध शाळेत आयोजित करुन विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी आणि मोफत टुथ पेस्ट आणि टुथ ब्रसचे वाटप करण्याचे नियोजित आहे. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पाटील, विभागप्रमुख डॉ.सत्येंद्र दबडगावकर, इंडियन डेंटल असोसीएशनचे डॉ. अशोक उनवणे, डॉ.राजीव खामकर, डॉ.शहादेव जगताप यांच्यासह रुग्णालयातील डॉ.सुजाता नरवणे, डॉ.अमोल बनसोडे आदि उपस्थित होते. असे जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन
कामे वेळेत पार पाडण्याची दक्षता घ्यावी
                        -जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
          बीड, दि.4 :- भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2017 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2018 घोषित केला असून विशेष मोहिमेमध्ये केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी प्रत्यक्ष भेटी देऊन कामे वेळेत पार पाडण्याची दक्षता घ्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात 15ते 30 नोव्हेंबर 2017 कालावधीतील  विशेष मोहीमेबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाघ यांची प्रमुख उपस्थित होती.
            कार्यक्रमानूसार प्रारुप मतदार यादी दि.3 ऑक्टोबर 2017 रोजी प्रसिध्द केली आहे. दावे व हरकती दि.3 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत स्विकारण्यात येतील. दि.8 व 22 आणि 29 ऑक्टोबर 2017 या तीन दिवशी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. बीएलओ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दि.15 ते 30 नोव्हेंबर 2017 कालावधीत घरोघरी भेटी देऊन पडताळणी व नोंदणी करणे आणि अंतिम मतदार यादी दि.5 जानेवारी 2018 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. असे विशेष पुनरिक्षण कार्यक्रमातील महत्वाचे टप्पे आहेत.
            विशेष मोहिमेमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दि.15 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीतील घरोघरी भेटी देऊन पात्र मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करणे, पूर्वीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात नाव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना (1 जानेवारी 1999 अथवा त्यापूर्वी जन्म झालेल्या मतदारांना) नमूना क्र.6चे वाटप करणे व परिपूर्ण भरलेले अर्ज परत घेणे. 2018 च्या पुनरिक्षणासाठी पात्र  नागरिकांना (2 जानेवारी 1999 आणि 1 जानेवारी 2000 यामध्ये जन्म झालेल्या मतदारांना) नमूना क्र.6 चे वाटप करणे व त्यांनी भरलेले अर्ज परत घेणे. मतदार नोंदणीसाठी पात्र होणाऱ्या नागरिकांची माहिती जमा करणे. स्थलांतरीत  व मयत मतदारांच्या वगळणीसाठी नमूना क्र.7 चे वाटप करणे व जमा करणे. प्रारुप मतदार यादीतील तपशीलात दुरुस्तीसाठी न.क्र.8 चे वाटप करणे व जमा करणे. प्राप्त झालेल्या अर्जाची बीएलओ चेकलिस्टप्रमाणे प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन तपासणी करणे. मतदार ओळखपत्र दुरुस्तीसाठी इपीआयसी 001 अर्ज मतदारांना देऊन भरुन घेणे. मतदारांची कौटूंबिक माहिती व मोबाईल क्रमांक व दूरध्वनी क्रमांक गोळा करणे. मोबाईल आज्ञावलीचा वापर करुन मतदारांच्या घरांचे अक्षांश व रेखांश गोळा करणे अथवा अक्षांश व रेखांशाचे एसएमएस करणे.
            अनिवासी भारतीय नागरिकांची माहिती संबंधित कुटुंबाकडून प्राप्त करुन घेणे. मतदारांचे मोबाईल क्रमांक व दूरध्वनी क्रमांक गोळा करणे. दूबार मतदारांना सूचना बजावणी करणे व पंचनामा करणे. कृष्णध्वल छायाचित्र असलेल्या मतदारांचे मतदार यादीत मतदार छायाचित्र उपलब्ध्‍ा नाहीत अशा मतदारांचे नजीकच्या काळातील 3.5×2.5 साईजचे 75 टक्के चेहऱ्याचा भाग व दोन्ही कान दिसावेत अशाप्रकारचे छायाचित्र मतदारांकडून प्राप्त करुन घेणे. आदि महत्वाची कार्ये करण्यात येणार आहेत. या बैठकीस उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, शिवकुमार स्वामी यांच्यासह सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2017 लढविलेल्या उमेदवारांनी खर्च सादर करावा



          बीड, दि.4 :- ग्रामपंचायत निवडणूक लढविलेल्या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूकीचा एकत्रित खर्च शपथपत्रासह लेखी स्वरुपात मंगळवार दि.7  नोव्हेंबर 2017 पर्यं‍त संबंधित तहसीलदारांना सादर करावा.
          जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 690 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम राबविण्यात आला असून ज्या ग्रामपंचायतीसाठी मतदान आवश्यक होते अशा ग्रामपंचायतीसाठी दि.7 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायतीचा निकाल दि. 9 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानूसार निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूकीमध्ये केलेल्या खर्चाची माहिती ही निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत सादर केली पाहीजे अशी तरतूद आहे. विहीत कालावधीत उमेदवाराने खर्च लेखी स्वरुपात सादर न केल्यास अशा सर्व उमेदवारांना अनर्ह ठरविण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी  कळविले आहे.

-*-*-*-*-

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०१७

जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी तालुका व गाव पातळीवर पथकाची नियुक्ती


         
          बीड, दि.2 :- संपूर्ण जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी तालुका व गाव पातळीवर पथकांची नियुक्ती करावी  असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  धनराज निला यांनी दिले.
          तंबाखू नियंत्रणाविषयीची जिल्हा समन्वय समितीची 5 वी बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एल. हरिदास, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.जी.दबडगावकर, क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ.आंधळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          जिल्ह्यामध्ये तंबाखूच्या सेवनावर नियंत्रण करण्यासाठी जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची कडक अंमलबजावणी करुन सर्व कार्यालय, शाळा, महाविद्यालयामध्ये तंबाखू मुक्तीचा संकल्प करण्यासंबंधीचा महत्वपूर्ण निर्णय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या जिल्हा समन्वय समितीमध्ये घेण्यात आला. कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण व पोलिस विभागाची मदत घेऊन भरारी पथक स्थापन करुन विविध शाळा व कार्यालयांना भेटी देवून तपास करणार आहेत.
          सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान व तंबाखू खाण्यास बंदी सर्व शासकीय कार्यालय, रुग्णालय व शाळा परिसरात तंबाखू सेवन करणाऱ्यांवर 200 रुपये दंड आकारणे सुरु केले असून हा कायदा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आजपर्यंत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण प्रशासनामार्फत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांकडून 12 हजार 500 रुपये एवढी दंडाची रक्कम वसुल करण्यात आली आहे. तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी इतर विभागांनी देखील जिल्हा रुग्णालय प्रशासनाप्रमाणे दंड आकारण्यास सुरुवात करण्यासंबंधीचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले आहे.
          या बैठकीत जिल्ह्यातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ.पवन राजपुत, सुरेश दामोधर, ऋषिकेश शेळके यांचे सहकार्य लाभले. या बैठकीस विविध शासकीय कार्यालयाचे विभाग प्रमुख, तालुका वैद्यकिय अधिकारी, विक्रीकर अधिकारी, अन्न सुरक्षा अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कृषी अधिकारी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-

          

डेंग्यूच्या आजारापासून बचाव करण्यासाठी डासाची वाढ होणारी ठिकाणे नष्ट केली पाहिजेत -जिल्हाधिकारी एम.डी.सिंह



          बीड, दि.2 :- जिल्ह्यातील नागरिकांनी डासापासून होणाऱ्या डेंग्यूसारख्या आजारापासून स्वत:चा व परिसरातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी डासाची वाढ होणारी सर्व ठिकाणे नष्ट केली पाहिजेत तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुन्या सारख्या आजाराचा प्रार्दुभाव कमी होण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या अध्यक्षतेखाली डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भातील आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पाटील, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ.भोकरे, श्री.सोळूंके, मधूकर वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले की, जिल्ह्यात डासापासून होणाऱ्या डेंग्यूसारख्या आजारावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून काम करावे. डेंग्यू, चिकुनगुन्या सारख्या आजाराचा रुग्ण आढळल्यास त्या गावात धुर फवारणी, ॲबेटींग यासारखे तातडीची प्रतिबंधात्मक उपयायोजना करावी. तसेच तापीचे रुग्ण आढळल्यास त्या रुग्णांची योग्य ती तपासणी करुन व लक्षणे पाहून औषधोपचार करावा. डासापासून होणाऱ्या आजारापासून कोणत्याही रुग्णाचा मृत्यु होणार नाही याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          आरोग्य विभागाने डेंग्यू, चिकुनगुन्या या सारख्या डासापासून होणाऱ्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती केली पाहिजे यासाठी या कामी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच गावस्तरावर काम करणाऱ्या आरोग्यसेविका, आशा वर्कर यांची मदत घ्यावी. तसेच या आजाराचा रुग्ण आढळलेल्या गावामध्ये तात्काळ आरोग्य पथक पाठवून तात्काळ आवश्यकती कार्यवाही करावी नागरिकांनी डासापासून होणारे आजार टाळण्यासाठी आपले शहर, गाव व परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. डासाची उत्पत्ती होणारी सर्व ठिकाणे नष्ट केली पाहिजेत, घरातील उघडे पाणीसाठे असल्यामुळे डासाची उत्पत्ती होण्यास मदत होते. यासाठी घरातील सर्व पाणी साठे झाकून ठेवावेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. असेही जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी यावेळी सांगितले.
          तालुकास्तरावर तहसीलदार यांनी सर्व संबंधित विभागाची नियमित बैठक घेऊन प्रभावीपणे डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवावी, ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात यावी तसेच शाळांमधून प्रभातफेरी काढुन जनजागृती करण्यात यावी. आणि शाळेतील प्रार्थनेच्या वेळी डेंग्यू विषयक माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. अंगणवाडीमार्फत देखील तेथील मुलांना व त्यांच्या पालकामध्ये डेंग्यू विषयक जनजागृती करण्यात यावी असेही जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी बैठकीत सांगितले.
          या बैठकीस जिल्ह्यातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


नागरिकांनी घ्यावयाची काळजी : प्रतिबंधात्मक उपाय
·       पाणी साठे उघडे राहिल्यामुळे त्यावर डास बसून अंडी घालतात त्यानंतर साधारणत: 10 दिवसांनी डासांची निर्मिती होते. त्यामुळे घरातील सर्व पाणी साठे झाकून ठेवावेत.
·       शनिवार हा दिवस कोरडा म्हणून पाळावा. यामध्ये सर्व पाणी साठे कोरडे करुन कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावेत जेणेकरुन साठ्याच्या भिंतीला चिकटलेले डासांचे अंडे निघून जातात.
·       डास चावु नयेत म्हणून मच्छरदानी, डास पळवणारे धुप, वड्या, लिक्वीड, मलम यांचा वापर करावा. ही साधन उपलब्ध नसल्यास लिंबाच्या पाल्याचा धुर सर्व खोल्यामध्ये करावा.
·       हे डास दिवसा चावत असल्यामुळे लहान मुलांना अंगभर शर्ट व पॅन्ट घालावेत.
·       डास चावू नयेत म्हणून पंख्याचा वापर करावा.
·       घरावरील जूने टायर्स, फुटके डब्बे, नारळांच्या करवंट्या हे घराच्या छतावर असतील तर त्या काढून टाकाव्यात कारण त्यामध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होते. घरातील कुंड्या व कुलरमधील जूने पाणी काढुन टाकुन ताजे पाणी दररोज भरावे.
·       104 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करुन गावात साथरोग उदभवल्यास कळवावे जेणेकरुन तात्काळ उपाययोजना गावात सुरु होतील.
-*-*-*-*-



बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधनासाठी अर्ज करावेत


         
          बीड, दि.1 :- जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळण्यासाठी शनिवार दि.18 नोव्हेंबर 2017 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
          अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली असून या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बचतगटांना 3 लाख 15 हजार रुपये 90 टक्के अनुदानावर देण्यात येतात. या रक्कमेपैकी 10 टक्के रक्कम 35 हजार रुपये स्वहिस्सा संबंधित बचत गटांनी भरणे आवश्यक राहील. विहित नमुन्यातील अर्ज समाज कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे बीड समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्ज करावेत


         
          बीड, दि.1 :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती,  नवबौध्द शेतकऱ्यांकडून नवीन विहिर, जुनी विहिर दुरुस्ती, इनवेल बोअरींग पंप संच, विज जोडणी आकार, शेततळ्याचे अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन संच अश विवि‍ध बाबींचा लाभ देण्यासाठी दि.30 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत.
          योजनेत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर नवीन विहिर, जुनी विहिर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, पंप संच, विज जोडणी आकार, शेततळ्याचे अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन संच, विद्युत पंप, विद्युत  पंप इत्यादी बाबींचा लाभ देण्यात येतो. दारिद्र रेषेखालील अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देवून त्यांची आर्थिक उन्नती घडविणे व त्यांना दारिद्र रेषेच्यावर आणने हे या योजनेचे उदिष्ट आहे. लाभधारकांनी agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर, महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र अथवा इतर ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज करावा आणि त्यांची मुळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह पंचाय समिती (कृषि विभाग) कार्यालयास सादर करावयाची आहे. पात्र अनुसूचित जाती, नवबौधद शेतकऱ्यांनी  योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी (विघयो) यांच्याशी संपर्क साधावा. असे बीड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीबरोबरच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून दयावा - जिल्हाधिकारी एम. डी. सिंह



          बीड,दि.1 :- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच त्या कुटुंबाना स्वत:चा व्यवसायासाठी अवश्यक ती मदत  किंवा त्यांच्या मागणीनुसार इतर शासकीय योजनाचा लाभ  मिळवून देवून त्या कुंटुंबाला दिलासा  देण्याचे काम संबंधित अधिकाऱ्याने करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले
           जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि.31 ऑक्टोंबर रोजी शेतकरी आत्महत्याविषयी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी एम. डी. सिंह  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के,अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिवनराव बजगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले की, जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच मिशन दिलासा अंतर्गत त्या कुटुंबाला त्यांच्या गरजेनुसार इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण कार्यवाही पुर्ण करुन संबंधिताना लाभ मिळवून दयावे. असे सांगून या कुटुंबाना देण्यात येणारी मदत व  शासकीय लाभाची सविस्तर माहितीसाठी  सर्व तहसिलदारांनी समन्वयासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 जिल्हयातील मागील चार वर्षातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माहिती अद्यावत तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली.  जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ठेवण्यात आलेल्या प्रकरणावर चर्चा करण्यात आली व संबंधिताना योग्य त्या  सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिल्या. या बैठकीस संमिती सदस्य, संबंधित अधिकारी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
-*-*-*-*-


पुनर्रचित तलाठी साझांची अंतिम अधिसूचना प्रसिध्द



          बीड, दि 31:- महाराष्ट्र शासनाने वाढती लोकसंख्या व वाढते नागरिकरण या अनुषंगाने महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ विचारात घेता बीड जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेल्या 371 तलाठी साझांमध्ये 138 नवीन तलाठी साझेनिर्मिती करण्यात मान्यता दिली असून त्यानूसार बीड जिल्ह्यातील पुर्वीचे 371 व नव्याने प्राप्त 138 असे जिल्ह्यात एकुण 509 तलाठी साझे निर्माण झाले आहेत. त्या अनुषंगाने तलाठी साझांची दि.31 ऑक्टोबर 2017 रोजी अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली असून ही यादी बीड जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार पटेल यांच्या जयंती व इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन



          बीड, दि 31:- जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व इंदिरा गांधी यांच्या  पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकात सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
          यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी नितिन धार्मिक, अपर कोषागार अधिकारी लहू गळगुंडे यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

नेहरु युवा केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी



            बीड, दि 31:- नेहरु युवा केंद्र, बीडच्या वतीने लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद जव्हेरी  प्रमुख पाहुणे बार्टीचे नानाभाऊ गव्हाणे, तत्वशील कांबळे, महादेव मांडवे, अमोल जगताप, गणेश अवंतकर, दिपक खळगे, बाजीराव ढाकणे, अशोक गव्हाणे, विनोद आगलावे आदि उपस्थित होते. असे बीड नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौड संपन्न




बीड, दि. 31 :- सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय एकता दौड व इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात  येतो. या दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने  श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा  संकुल येथे आज राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन  करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित एकता दौड रॅलीस जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रीय एकतेची उपस्थितांना शपथ दिली. या कार्यक्रमास या रॅलीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, महेंद्र कांबळे, महाराष्ट्र केसरी श्री. केकाण, क्रिडा अधिकारी श्रीमती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा  संकुल येथून निघालेली ही रॅली सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ विसर्जित झाली. यावेळी अरविंद विद्यागर, क्रिडा  मार्गदर्शक  अजय पवार, संतोष वाबने, अजित शेख, क्रिडा संघटक अविनाश बारगजे, सुनिल गव्हाणे, अझर शेख, संजय धस, शरद अंदुरे, शेख इसाक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी अखर्चित राहणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी एम.डी. सिंह




बीड, दि. 31 :- जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना जिल्हा  नियोजन विभागाकडून वितरित करण्यात आलेला निधी वेळेत खर्च झाला पाहिजे. यासाठी सर्व यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातील नियोजित केलेली कामे वेळेत व दर्जेदारपर्ण पुर्ण करुन कोणताही निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आज येथे दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीअंतर्गत सन 2017-18 करीता कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेल्या निधी व त्याअंतर्गतच्या कामांचा आढावा घेताना ते बोलत होते.
            या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा नियोजन अधिकारी     बालाजी आगवने, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. मडावी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी  एम. डी. सिंह म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध विकास कामांकरीता कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आलेला निधी जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असून या निधीचा योग्य विनियोग होणे आवश्यक आहे. यंत्रणांनी कामे विहीत मुदतीत पूर्ण करुन कोणत्याची प्रकारचा निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी ज्या यंत्रणांनी त्यांच्या विभागातील नियोजित कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त करुन घेणे गरजेचे असून ज्या यंत्रणांनी प्रशासकीय मान्यता घेतली नाही त्या यंत्रणांनी  प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत असे सांगून ज्या यंत्रणांचे प्रमुख निधी खर्च करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर अनुदान, झालेला खर्च, कामांची सद्यस्थिती आदी बाबींचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस विविध यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-

शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

जिल्ह्यातील विविध ‍विकास कामांना गती देवून कामे वेळेत पुर्ण करावी - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे


जिल्ह्यातील विविध ‍विकास कामांना
गती देवून कामे वेळेत पुर्ण करावी
                   - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे

बीड दि.28:- जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देवून लवकरात लवकर कामे वेळेत पूर्ण करावीत अशी सुचना ग्राम‍विकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केली.
          पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत उपस्थित संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
          पुढे बोलतांना श्रीमती मुंडे म्हणाल्या की, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेवून प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करुन जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल होऊन जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर  पोहचेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत आणि आपला बीड जिल्हा प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करावीत अशा सुचनाही त्यांनी यावेळी केली.
          यावेळी   जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, रि-एडिट कामाचा अहवाल, एडिट मोड्युल अंतर्गत कामाचा आढावा, शेतकरी आत्महत्याविषयीची माहिती, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, पाटबंधारे प्रकल्पातील पिण्याचे पाणी, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वेमार्ग भूसंपादन व प्राप्त निधीबाबत माहिती आदिबाबत संगणकीय सादरीकरणादवारे माहिती दिली.
          जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, खाण व खनिकर्म विभाग, जिल्हा नियोजन, महावितरण, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, झिरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल आदिचा आढावा संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी घेतला.
          या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
-*-*-*-*-




गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे



शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची
जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी
                   - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे
पालकमंत्र्याच्या हस्ते वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

बीड, दि. 26 :- जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याच बरोबर प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार असून त्या ग्रामपंचायतींना भरपूर निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अठराव्या गळीत हंगामाचे शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विनायक मेटे होते तर आमदार आर.टी.देशमुख, आमदार लक्ष्मण  पवार, आमदार संगिता ठोंबरे, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, कारखाण्याच्या संचालक यशश्री मुंडे, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार केशवराव आंधळे, जि.प.सभापती युध्दजित पंडित, संतोष हंगे, फुलचंद कराड, रमेश आडसकर, रमेश पोकळे, यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विकासाच्या योजना राबविण्यात येत असून येणाऱ्या काळात गावाचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्यात येणार असून त्या सर्व ग्रामपंचायतींना भरपूर निधी देण्यात येणार आहे. नव्याने निवडूण आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांनी या निधीचा चांगला उपयोग करुन घेतला  पाहीजे व आपल्या गावाचा विकास केला पाहिजे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल आला असून या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना नेहमी प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहिला आहे. या कारखान्याने मागील काळात विक्रमी गाळप करुन उच्चांक गाठला होता. तसेच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यापेक्षा शेतकऱ्यांच्या ऊसाला जादा भाव दिला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी समाधानी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी यावर्षी गाळपाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला असून पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे कारखाना पुढील वर्षी चालू राहण्यास मदत होणार असल्याचे सांगून जिल्ह्यातून 8 राष्ट्रीय महामार्ग जात असून त्याची कामे प्रगती पथावर आहेत. परळी मतदार संघात शंभर कि.मी.चे रस्ते मंजूर झाले असून येणाऱ्या काळात रस्त्याचे कामे एकही शिल्लक राहणार नाहीत. तसेच विविध विकास कामाच्या माध्यमातून परळी मतदार संघासह जिल्ह्याचे नाव लौकीक वाढविण्यासाठी योगदान देणार आहे असेही पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आमदार विनायक मेटे म्हणाले की, जिल्ह्यात सहकार चळवळ निर्माण करण्याचे काम स्व.गोपिनाथराव मुंडे यांनी केले आहे त्यांच्याच प्रयत्नातून पांगरी येथील साखर कारखान्याची उभारणी पूर्ण झाली आहे. या कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चांगली मदत झाली आहे असे सांगून या कारखान्याने यावर्षीचे गाळपाचे उदिष्ट पूर्ण करणार असेही त्यांनी यावेळी सां‍गितले.
यावेळी आमदार संगिता ठोंबरे, आ.लक्ष्मण पवार, आ.आर.टी.देशमुख, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, फुलचंद कराड, माजी आमदार केशवराव आंधळे, गणेश हके, रमेश पोकळे, रमेश आडसकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अठराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव यांनी केले.
या कार्यक्रमास जिवराज ढाकणे, शिवाजीराव गुट्टे, राजाभाऊ मुंडे, श्रीहरी मुंडे, आदित्य सारडा, जुगलकिशोर लोहिया यांच्यासह पदाधिकारी, कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-