मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

विविध ग्रंथाची बीडकरांना मेजवाणी, बीड शहरात ग्रंथोत्सवाचे आयोजन



            बीड, दि.14:- बीड जिल्हा  ग्रंथोत्सव हा दि. 17 व 18 नोव्हेंबर २०१७ असे  दोन दिवस  भरविण्यात येणार आहे. ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन ग्रंथविक्री असा ग्रंथोत्सवाचा उद्देश असून प्रकाशक, ग्रंथप्रेमींना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. बीड जिल्हा ग्रंथोत्सव-2017 चा शुभारंभ  ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री  तथा  बीड जिल्ह्याच्या  पालकमंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ  मुंडे  यांच्या  हस्ते  शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसर, नगर रोड, बीड येथे करण्यात येणार  आहे.
            ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने त्याचठिकाणी जिल्हयातील मान्यवर साहित्यिकांची प्रकमुलाखत तसेच काव्यवाचन आणि वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार हेत. मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे,  ग्रामीण भागातील लोकांसह शहरी लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून वाचन संस्कृती वाढावी, या उदेशाने दि. 17 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत प्रभावी वाचन माध्यमे, ग्रंथाने मला काय दिले?  काव्यवाचन, कथाकथन, आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात  विविध क्षेत्रातील वक्ते ,मान्यवर भाग घेणार आहेत. तसेच बीडकरांना राज्यातील विविध दुर्मिळ पुस्तकांचे स्टॉल्स एकाच ठिकाणी उपलब्ध  होणार आहेत.
            ग्रंथोत्सवाची सुरुवात दिनांक 17 नोव्हेंबर रोजी ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथदिंडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ते शिवाजी पुतळा मार्गे परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन अशी काढण्यात येणार आहे. या ग्रंथदिंडीत  शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे  पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.  ग्रंथोत्सवाचा बीड जिल्ह्यातील  विद्यार्थी, शिक्षक व ग्रंथप्रेमी नागरिकांनी  लाभ घ्यावा. असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष एम.डी.सिंह व प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा  ग्रंथोत्सव समन्वय समितीचे सदस्य सचिव दि.ना.काळे यांनी केले आहे. असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा