गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

बिंदुसरा नदीच्या पुलावरुन होणारी वाहतूक बंद; जनतेने सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

बिंदुसरा नदीच्या पुलावरुन होणारी वाहतूक बंद;
जनतेने सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

          बीड, दि. 31 :-  प्रकल्प संचालक,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,औरंगाबाद यांनी कळविल्यानुसार बिंदुसरा पुलावरून होणारी हलकी व जड वाहनांच्या वाहतूकीमुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना तसेच जीवित व वित्त हानी टाळण्याचे दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या पुलावरून होणारी वाहतूक तूर्तास बंद करण्यात आली आहे याबाबत जनतेने सहकार्य करावे असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
बीड शहरातील बिंदुसरा नदीवरील पूल जुना व वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने त्यावरील हलकी व जड वाहतूक चालू ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पुलावरून जाणारी वाहतूक संपुर्णपणे बंद करून या महामार्गावरील उस्मानाबादकडून येणारी जड अवजड वाहने मांजरसुंबा येथून तसेच औरंगाबाद कडून येणारी जड अवजड वाहने गेवराई तालुक्यातील गढी येथुन वळविणेबाबत प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन युनिट (NHAI-PIU) यांचे दि. २४ सप्टेंबर २०१६ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.
          राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ या महामार्गावर बीड जिल्ह्यात मांजरसुंबा येथे दि.27 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बिंदूसरा नदीवरील तयार केलेला तात्पुरता वळण रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या वळण रस्त्यावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. ही वाहतूक मांजरसुंबा-पाटोदा-बीड मार्गे वळविण्यात आली आहे. बीड शहरात बिंदुसरा नदीवर ८४ वर्षे जुना मोठा पूल आहे त्याचे आयुष्यमान, कार्यकाल संपलेला असून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण,मुख्यालय नवी दिल्ली यांनी दि.६ जुलै २०१७ रोजी तत्वतः मान्यता दिल्याने पावसाळा संपल्यानंतर बिंदुसरा नदीवर नवीन पूल बांधण्याचे काम लवकरात लवकर हाती घेण्यात येईल असे प्रकल्प संचालक,भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कळविलेले आहे.
         

-*-*-*-*-

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

कर्जमाफीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन



बीड, दि. 29 :- महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णयानूसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया जिल्ह्यातील सर्व ई-सेवा केंद्रावर सुरु असून ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दि.15 सप्टेंबर 2017 पर्यंत असणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीमध्ये ऑनलाईन अर्ज करुन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. असे बीडचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत



बीड, दि. 29 :- सन 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या राज्य शासन पुरस्कृत 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाच्या www.mahatmaphlecorporation.com/applications या संकेतस्थळावर ऑनलाईन मागणी अर्ज सादर करावेत.
तरी इच्छुक अर्जदारांना महामंडाळाकडून कर्ज घेण्याकरीता आवाहन करण्यात आले असून अर्जदारांनी त्यांचे स्वत:चे ई-मेल अकाऊंट वापरुन ऑनलाईन पध्दतीने दि. 16 ऑगस्ट ते दि. 15 सप्टेंबर 2017 पर्यंत कर्ज मिळण्याकरीता कर्ज मागणी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी दि. 14 ऑक्टोबर 2017 पर्यंत कर्ज मागणी अर्जाची मुळ प्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित, स्वसाक्षांकित प्रतीसह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालयात स्वत: सादर करावीत त्रयस्थ व्यक्तीकडून अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्र स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. असे बीड महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

संवादपर्व उपक्रम नागरिकांनी जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे - जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार

संवादपर्व उपक्रम
नागरिकांनी जिल्हा हागणदारीमुक्त
करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे
                       - जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार

बीड, दि. 28 :- जिल्हा हागणदारीमुक्त न झाल्यास येणाऱ्या काळात शासनाच्या विविध विकास योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागणार असल्यामुळे प्रत्येक नागरिक, गावासह जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, नागरिकांनी शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार यांनी केले.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात  जिल्हा परिषद आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संवादपर्व कार्यक्रमांतर्गत आयोजित स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) "खुले में शौच से आझादी " व पंचायत संमेलन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, समाज कल्याण सभापती संतोष हांगे, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, डॉ.सुनिल भोकरे, मधूकर वासनिक,  जि.प.सदस्य श्रीमती रेखा क्षीरसागर, श्रीमती ओव्हाळ, शिवाजी पवार, जयसिंह सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जि.प.अध्यक्षा श्रीमती गोल्हार म्हणाल्या की, उघड्यावर शौचास गेल्याने होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी प्रत्येकाने शौचालय बांधण्यास प्राधान्य देवून गाव हागणदारीमुक्त करावे. समाजातील प्रत्येक घटकाने आपण समाजाचे काही देणे लागतो या दृष्टीकोनातून शौचालय बांधण्यासाठी आपल्या परिसरातील व्यक्तींना प्रवृत्त करावे जेणेकरुन आपला जिल्हा 100 टक्के हागणदारीमुक्त होईल. निरोगी असल्यास विकासाच्या योजनेचा अनुभव घेण्यासाठी शौचालय व स्वच्छतेचे काम केले पाहिजे. तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी आपले गाव, परिसर व जिल्हा स्वच्छ झाला पाहिजे यासाठी नागरिकांसह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे सांगून जिल्हा 2 ऑक्टोबरपर्यंत 100 टक्के हागणदारीमुक्त होण्यासाठी प्रशासनाबरोबरच पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी या स्वच्छ भारत मिशनमध्ये सहभाग नोंदवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला म्हणाले की, जिल्हा 100 टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून जिल्ह्यात 60 गुड मॉर्निंग पथके नेमण्यात आली असून या पथकाच्या माध्यमातून जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामीण भागासह प्रत्येक गावातील नागरिकांना शौचालयाचे महत्व व उघड्यावर शौचास गेल्यास दंडात्मक कारवाईची माहिती देण्यात येत असून जिल्ह्यातील दोन तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. येणाऱ्या काळात ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही अशा कुटुंबांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने नागरिकांनी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी   लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांनीही आपला सहभाग नोंदवावा. शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनाकडून 12 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येत असून तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही शौचालय बांधकाम करता येणार असल्याने याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा असे सांगून जिल्ह्यात दररोज पूर्ण झालेल्या शौचालयाची ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम संबंधितांनी वेळेवर करावेत. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी युनिसेफचे वरिष्ठ सल्लागार जयंत देशपांडे यांनी स्वच्छ भारत मिशनबाबत सविस्तर माहिती देताना जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी सर्व स्तरावरुन जनजागृती होणे गरजेचे असून स्वच्छ भारत मिशन हे राष्ट्रीय कार्यक्रम असून मार्च 2018 पर्यंत राज्य हागणदारीमुक्त करण्याचे नियोजन असल्याने प्रत्येक जिल्हा हागणदारीमुक्त झाला तरच राज्य हागणदारीमुक्त होईल असे सांगून उघड्यावर शौचास गेल्यास नागरिकांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याने सर्वांनी अस्वच्छता दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच शासकीय यंत्रणा, पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थांच्या माध्यमतून गाव, जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती संतोष हांगे, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, जि.प.सदस्य अशोक लोढा, गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधूकर वासनिक यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करुन जिल्ह्यात सुरु असलेल्या हागणदारीमुक्तीच्या कामाविषयी माहिती विशद केली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनिल भोकरे यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे वाचन केले. प्रारंभी कार्यशाळेची सुरुवात मान्यवराच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास जि.प.पं.स.सभापती, जि.प.पं.स.सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-





बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

अपंग कल्याण राज्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत


                   
          बीड, दि. 23 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सन 1982 पासून प्रतिवर्षी अपंग राज्य पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी दि.3 डिसेंबर या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सन 2017 वर्षातील पुरस्कार देण्यात येणार असल्याने पात्र अपंग व्यक्ती, संस्था, अपंगाचे नियुक्तक यांनी दि.8 सप्टेंबर 2017 पर्यत अर्ज सादर करावेत.
          स्वयंउद्योग करणाऱ्या अपंग व्यक्ती किंवा अपंग कर्मचारी यांना उत्कृष्ट अपंग कर्मचारी/ स्वयंउद्योजक पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार शासकीय, निमशासकीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रामधील अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर व मतिमंद प्रवर्गातील व्यक्तींना देण्यात येतो. तसेच जास्तीत जास्त अपंग व्यक्तींना त्यांच्या आस्थापनेत नोकरी उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय, सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्थेला उत्कृष्ट नियुक्तक म्हणून पुरस्कार दिला जातो. पुरस्कारासाठी करावयाच्या अर्जाचे नमुने जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात दि.28 ऑगस्ट 2017 पर्यंत उपलब्ध आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर आहे. असे बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-



जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



          बीड, दि. 23 :- जिल्ह्यात गणेश मुर्तीची स्थापना दि.25 ऑगस्ट 2017 रोजी होत आहे व गणेश मुर्तीचे विसर्जन दि.5 सप्टेंबर रोजी होत असल्याने जिल्ह्यात कायदा  व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व अबकारी विभागाच्या सर्व देशी दारु, विदेशी दारु, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, सीएल-2 सीएल-3, बियर शॉपी, ताडी आदी अनुज्ञप्ती गणेश मुर्ती स्थापनेचा दिवस दि. 25 ऑगस्ट व गणेश विसर्जन दि.5 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर मौजे लिंबा गणेश क्षेत्रातील भालचंद्र गणेश मंडळाचे गणेश विसर्जन असल्याने दि.31 ऑगस्ट रोजी तर माजलगाव तालुक्यातील टेंबे गणेश मंडळाची मिरवणूक दि.7 सप्टेंबर रोजी असल्याने तालुका क्षेत्रातील मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील असेही आदेशात नमुद केले आहे. अनुज्ञप्ती धारकाने वरील दिनांकास अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात.  आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्याकडून जिल्ह्यातील पिक परिस्थितीचा आढावा




बीड, दि. 21 :- जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून चांगला पाऊस झाल्याने त्याचा फायदा खरीपाच्या सर्व पिकांना होणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा परिषदेचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यात मागील बऱ्याच दिवसापासून पाऊस न झाल्यामुळे त्याचा परिणाम पिकावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. नुकताच मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. या पावसामुळे खरीपातील सर्व पिकांना लाभ होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पिक परिस्थितीचा आढावा घेवून पिकाची सद्याची स्थिती त्याच बरोबर पिक परिस्थितीची दर आठवड्याला अद्यावत माहितीचा अहवाल सादर करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना करुन जिल्ह्यातील पर्जन्यमान, पाणी टंचाई, प्रकल्पातील पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती, टंचाई निवारण कृती आराखडा, पेरणीचा अहवाल, रासायनिक खताची उपलब्धता, पिक विमा व पिककर्ज याबाबत सविस्तर आढावा घेवून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या. तसेच महसूल व  इतर विभागाच्या रिक्त पदाचा आढावाही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी घेतला.
गणेश उत्सावाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन केले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच जनतेला या उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी पदाधिकारी, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी संगणीकृत सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा सादर केला. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते संपन्न





          बीड, दि. 15:- स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
            यावेळी जिल्हा पोलीस जी.श्रीधर, जिल्हा परिषद अध्यक्षा  श्रीमती सविता गोल्हार, उपाध्यक्षा श्रीमती जयश्री मस्के, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
            प्रारंभी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून आस्थेवाईकपणे त्यांची विचारपूस केली.        
            संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2016-17 मधील जिल्हास्तरीय पुरस्कार पात्र ग्रामपंचायतीना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये ग्रामपंचायत टाकळी देशमुख ता.परळी सरपंच श्रीमती सुवर्णा भीकाजी कलगुडे ग्रामसेवक प्रकाश बंकटराव करपे. द्वितिय पुरस्कार-ग्रामपंचायत ताडसोन्ना ता.बीड सरपंच श्रीमती द्रौपदी सोमनाथ माने, ग्रामसेवक संतोष नाथा शिंदे. तृतीय पुरस्कार विभागून- ग्रामपचायत गुंधावाडी ता.बीड सरपंच आप्पासाहेब नामदेव माने, ग्रामसेवक इनकर पुष्पराज विश्वनाथ. ग्रामपंचायत देवगाव ता.वडवणी सरपंच श्रीमती कैवल्याबाई रघुनाथ सुरवसे.  ग्रामसेवक रामहरी व्यंकटी मंत्री यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुछ देवून सत्कार करुन पुरस्कार देण्यात आले.
            शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आणि विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यामध्ये सीनीयर जी इंग्लीश स्कुल प्राशा अंबाजोगाईचा विद्यार्थी पार्थ मनोजकुमार बडगीने, स्वामी विवेकानंद प्राशा अंबाजोगाईची विद्यार्थींनी गौरी धनंजय देशमुख, वसुंधरा प्राशा आष्टीचा मुकुंद हेमंत देशमुख, वसुंधरा प्राशा आष्टीचा शेख जिशान सलीम, वसुंधरा प्राशा आष्टीचा प्रणव हनुमंत केदार, वसुंधरा प्राशा आष्टीचा संस्कार रघुनाथ मुटकुळे आणि पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील वसुंधरा प्राशा आष्टीचा सय्यद मेहक सलीयोद्दीन, वसुंधरा प्राशा आष्टीचा दिशा हनुमंत केदार, प्रगती विद्यालय बीडची विद्यार्थींनी कल्याणी दिलीप कंठाळे, प्रगती विद्यालय बीडची विद्यार्थी सुशांत श्रीराम आघाव, भेल सेकंडरी स्कुल परळी येथील सिध्दार्थी प्रविण तापडिया यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.  
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता धसे व गणेश धस यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय मुख्य कार्यक्रमास जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला बीड येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण


                   
          बीड, दि. 10 :- मंगळवार दि.15 ऑगस्ट 2017 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 70 वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे सकाळी 9.05 वाजता राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकिय समारंभ आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.  तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे. तसेच जिल्हा मध्यवर्ती प्रशासकिय इमारत बीड येथे सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.
-*-*-*-*-


बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

जिल्हा रुग्णालयात तंबाखु मुक्त अभियान; सेवन करणाऱ्यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल



     बीड, दि. 9 :-  जिल्हा रुग्णालयामध्ये तंबाखु सेवन करणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात सुरुवात केली असून एप्रिल 2017 पासुन तंबाखु मुक्त अभियानाने ही मोहिम हाती घेतली आहे. दि.9 ऑगस्ट 2017 पर्यंत ही दंडाची रक्कम पाच हजार रुपयाच्या घरात गेली आहे.

      शासन नियमानुसार सर्व शासकीय कार्यालये, रुग्णालय, शैक्षणिक संस्था इत्यादी ठिकाणी तंबाखु सेवन करण्यास मनाई करणारे फलक दर्शनी ठिकाणी लावण्याच्या सुचना आहेत. शासकीय रुग्णालय परिसरात तंबाखू खाणाऱ्यावर लागलीच कारवाई करण्यात येत आहे. अगदी नेहमीप्रमाणे कार्यवाहीची भिती फक्त भिंतीवरच राहील अशा आवेशात असणाऱ्यांना मात्र यावेळी चांगलाच झटका बसला आहे. तंबाखुजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्यास 200 रुपये दंड ठेवण्यात आला असून ही कारवाई 13 एप्रिल 2017 पासून आजतागायत सुरु असून यातून  5 हजार रुपये इतका दंड वसूल  करण्यात आला आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना चांगला धसका बसला आहे. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी तंबाखू मुक्त अभियान अधिक तीव्र करण्याचा मानस व्यक्त केला तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयातील कक्ष क्र.12 ला भेट देवून समुपदेशनाने तंबाखू सोडावी आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर रहावे असे आवाहनही केले आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांनी कळविले आहे.

विविध क्षेत्रातील गुणवंत माजी सैनिक पत्नी व मुलांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करावेत



          बीड - राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू. साहित्य, संगीत, गायन, वादन, नर्तन इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यश्स्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर, जळीत, दरोडा, अपघात आग व  इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल   कामगिरी करणारे, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक,पत्नी,पाल्यांना सैनिक कल्याण विभाग पुणे येथे शासनाने गठीत केलेल्या समितीमार्फत मंजुर केलेल्या प्रकरणांना तसेच सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात इ.10 वी व 12 वी परीक्षेमध्ये 90%  पेक्षा जास्त गुण मिळवून प्रत्येक विभागीय शिक्षण मंडळातून उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकी पहिल्या पाच पाल्यांना तसेच आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, तरी बुधवार दि.20 सप्टेंबर 2017 पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कायालय बीड येथे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावेत असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कर सहायक (पुर्व) परिक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी


बीड, दि. 8 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कर सहायक (पुर्व) परिक्षा 2017 ही दि. 20 ऑगस्ट 2017 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण 5 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी एकूण 2 हजार 4 उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.
          परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाईल,पेजर,कॅल्क्युलेटर व आभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही तसेच आयोगाच्या सुचनेनुसार उमेदवारांना परीक्षेचे आवश्यक साहित्यच  जवळ बाळगण्याची मुभा दिली आहे. उमेदवारांनी परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी  त्यांच्या परीक्षा केंद्रावर सकाळी 10.00 वाजेपूर्वी उपस्थित रहावे परीक्षा सुरु झाल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश दिला जाणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


माजी सैनिक व माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना विद्यावेतन योजना



बीड, दि. 8 :- बीड जिल्ह्यातील माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10वी, 12वी व पदवी परीक्षेमध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या व पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांच्या पहिल्या तीन पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून गुणानुक्रमे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीचा विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातुन प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रासह दि. 15 ऑक्टोबर 2017 पर्यत सादर करावेत. तसेच पाल्यास इतर कोणत्याही योजनेंतर्गत अथवा समाज कल्याण विभागामार्फत  शिष्यवृत्ती मिळत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना आवाहन



          बीड, दि. 8 :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यन्वित असलेल्या अर्थ सहाय्याच्या  समान निधी व असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालय,  महाराष्ट्र राज्य , नगर भवन, मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.
          राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संबधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in  संकेतस्थळ पहावे, ग्रंथालयांनी समाननिधी व असमाननिधी योजनेसाठी विहित पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेमधील प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दि.24 ऑगस्ट 2017 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत असे आवाहन किरण गं. धांडोरे, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*

ग्रामीण डाक सेवक व शाखा डाकपाल पदांसाठी पात्र उमेदवारांना संधी




बीड, दि. 8 :- नवीन भरती प्रक्रियेतील ग्रामीण डाकसेवक व ग्रामीण डाकसेवा शाखा डाकपाल या पदासाठी पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात महाराष्ट्र सर्कलकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ज्या उमेदवाराने  पोस्ट ऑफिसमध्ये दि. 27 मे 2017 पूर्वी आपल्या अर्जाची नोंदणी केली होती. परंतु त्यांच्या अर्ज तां‍त्रिक अडचणीमुळे ऑनलाईन प्रणालीमध्ये दाखल झालेला नव्हता अशा पात्र उमेदवारासाठी अधिकची संधी मिळावी म्हणून दि. 12 ऑगस्ट 2017 पर्यंत ऑनलाईन पोर्टल विंडो सुरु करण्यात आली  आहे. तरी पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेवून आपला अर्ज ऑनलाईन प्रणालीमध्ये दाखल करावेत. असे अधिक्षक डाकघर, डाक विभाग, बीड यांनी कळविले आहे.

शनिवार, ५ ऑगस्ट, २०१७

संपात सहभागी स्वस्त धान्य दुकानदारांना नोटीसा


                            

          बीड, दि. 5:- माहे ऑगस्ट 2017 करीता स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्याची उचल ही पात्र लाभार्थींना वाटप करणे अभिप्रेत होते. तसेच जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांची सभा आयोजित करण्यात आली होती. परंतू दि.1 ऑगस्ट 2017 पासून आजपर्यत सुरु असलेल्या संपामुळे परवानाधारकांनी शिधावस्तुंची उचल आणि वाटप केली नाही. यामुळे पात्र लाभार्थी शिधावस्तुपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकानदारांच्या संपातील सहभागामुळे जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 व अन्न सुरक्षा अधिनियम 2013 मधील तरतुदींचा भंग झाल्याने प्राथमिक पातळीवर संपात सहभागी दुकानदारांपैकी बीड तालुक्यातील 149 स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.एन.आर.शेळके यांनी जीवनावश्यक अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 अन्वये नोटीसा बजावल्या आहेत. इतर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना नोटीसा रवाना केल्या असून सर्व तहसिलदारामार्फत नोटीसा बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यानंतरही संप सुरु राहिल्यास सर्व तहसीलदारांना गावनिहाय अन्न धान्य वितरण करण्याकरीता आकस्मित आराखडा तयार करण्याच्यासुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात संप कालावधीमध्ये एकही लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येत आहे. असे बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०१७

अहमदनगर अंतर्गत येणाऱ्या इसीएचएसमध्ये डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफची भरती




          बीड, दि. 4 :-  स्टेशन हेडक्वाटर अहमदनगर अंतर्गत येणाऱ्या इ.सी.एच.एस मध्ये ऑफीसर इन चार्ज, मेडिकल ऑफीसर, डेंटल ऑफीसर, नर्सिंग असिस्टंट व डेंटल असिस्टंट इत्यादी रिक्त पदे भरावयाची आहेत. अधिक माहिती व अटी, शर्ती, शैक्षणिक पात्रता याबाबत www.echs.gov.in या संकेतस्थळास भेट देवून दि. 9 ऑगस्ट 2017 पुर्वी अर्ज OIC ECHS CELL, Station HQ, Jamkhed Road, Camp Post, Ahemadnagar-414002  यांच्याकडे सादर करावेत. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे शासकीय पावती पुस्तक हरवले आहे




          बीड, दि. 4 :-  महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ मर्या, जिल्हा कार्यालय बीड येथील कर्ज वसुली पावती पुस्तक क्र. 1762 दि. 22 मार्च 2017 रोजी हरवलेले आहे.  हे पावती पुस्तक कोणास मिळाले असल्यास ते जिल्हा कार्यालय, बीड येथे जमा करण्यात यावे. तसेच पावती पुस्तकातील पावती क्र. 88068 ते 88100 या अनुक्रमांच्या कोऱ्या पावत्या दि. 22 मार्च 2017 नंतर फाडल्या गेल्या असल्यास संबंधीतांनी जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे संपर्क साधावा. तसेच यापुढे प्रस्तुत पावती क्र.88068 ते 88100 पावत्यांचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यास हे महामंडळ जबाबदार राहणार नाही यांची संबंधीतांनी नोंद घ्यावी. असे  महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

गुरुवार, ३ ऑगस्ट, २०१७

जिल्हाधिकारी कार्यालयात
क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

          बीड, दि. 3 :-  जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अपर कोषागार अधिकारी लहू गळगुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

खरीप हंगाम 2017-2018 शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी 4 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ



बीड,दि.2:-खरीप हंगाम 2017 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बीड जिल्हयात दि. युनायटेड इंडिया इंन्शुरंन्स कंपणी लि,पुणे या विमा कंपणीमार्फत राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2017 वरुन  कृषि व पदुम विभागाच्या दि. दि.1 जुलै2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.5 ऑगस्ट 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापी वरील शासन निर्णय अधिक्रमित करुन प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2017 मध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभागाची मुदत पुढील अटी व शर्तीवर   दि. 4 ऑगस्ट 2017 पर्यंत  मुदत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रस्तुत मुदतवाढ केवळ बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठीच देण्यात आली आहे. मुदत वाढीच्या कालावधी दरम्यान केवळ ऑनलाईन पध्दतीने www.agri-insurance.gov.in या संकेतस्थळावर (पोर्टलवर) जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून अथवा स्वत:शेतकऱ्यांनी थेट भरलेले अर्जच मान्य करण्यात येणार आहेत. अर्जदार शेतकऱ्याकडील पिक पेरणी प्रमाणपत्र दि.31 जुलै2017 अथवा त्यापुर्वीचे असणे आवश्यक आहे. तसेच मुदतवाढीच्या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या अर्जाबाबतची माहीती स्वतंत्र ठेवण्यात यावी.

 ज्या शेतकऱ्यांनी  पिक विमा रक्कम भरणा केली नाही अशा जिल्हयातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता  तात्काळ जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून अथवा स्वत:शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज ऑनलाईन भरणा करुन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.  

राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हास्तरीय समितीमार्फत शाळांचे सर्वेक्षण



            बीड, दि. 2 :- राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाकडून तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्पपरिणामाबद्दल जनजागृती केली जात असून याची सुरुवात म्हणून दि.31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी बीड शहरातील चंपावती विद्यालय, भगवान विद्यालय व शिवाजी विद्यालयास समन्वय समितीचे सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भेटी देऊन वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केले.

            शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांनी तंबाखुच्या  व्यसनापासून दूर राहण्यासाठी शाळेमध्ये तंबाखु नियंत्रण कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. शाळेपासून 100 या  उत्तर परिसरात तंबाखु जन्य पदार्थ विक्री व सेवनास बंदी घालण्यास आली आहे. तसेच शाळेच्या परिसरात दर्शनीय भागात 60 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर चा तंबाखु विरोधी फलक बंधनकारक आहे. या संदर्भात तपासणी करण्यात आली. या विशेष मोहिम तपासणीसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सत्येद्र दबडगांवकर, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अभिमन्यु केरुरे, तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे डॉ.अमोल बन्सोडे, समन्वयक कृष्णा शेडगे हे उपस्थित होते. या कार्यक्रमास चंपावती विद्यालयाचे मुख्याधापक आर.आर.वाघमारे व उपमुख्याधापक आर.एस. कदम याचे वरील विशेष मोहिमेसाठी सहकार्य लाभले.             विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व तंबाखु विरोधी जनजागृतीसाठी शाळेमध्ये घोषवाक्य, भिंतीचित्र निबंध स्पर्धा घेण्याचे मानस देखील शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी विशेष घटक योजनेची अंमलबजावणी




            बीड, दि. 2 :- शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमातंर्गत कलम 11 अ अन्वये अनुसूचित जाती व नवबौध्द समाज घटकातील दारिद्ररेषेखालील  लाभधारकांना रोजगार उपलब्ध करुन देऊन त्यांना दारिद्ररेषेच्या वर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ राज्यात विशेष घटक योजना या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभधारकांना त्यांच्या ग्रामोद्योग उभारणीकरीता त्याच्या गरजे इतपत  50 हजार रुपयांपर्यंत वित्त सहाय्य वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करुन देते. या कर्जावर मंडळामार्फत विशेष केंद्रीय सहाय्यातून रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या 50 टक्के अनुदान रक्कम देण्यात येत आहे. विशेष घटक योजनेसाठी  10 हजार पर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या 50 टक्के अनुदान रक्कम देण्यात येत आहे. विशेष घटक योजनेसाठी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे  प्रमाणपत्र तहसीलदार यांचे ग्रामीण भागासाठी  40 हजार 500, शहरी भागासाठी 50 हजार 500, कोटेशन, जागेचा पी.टी.आर, दारिद्र रेषेचे प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक असून  या कागदपत्रासह पात्रताधारक अर्जदारांनी जिल्हा कार्यालय फोन क्र. 0240-222517 वर संपर्क साधावा किंवा मंडळाच्या जिल्हा कार्यालय द्वारा-जिल्हा उद्योग केंद्र, बंशीरगंज, बीड येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा आवश्यक पुर्तता करुन दयावी असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

सुशिक्षीत बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्रात व्यवसायाकरीता कर्ज प्रस्ताव सादर करावेत



            बीड, दि. 2 :- जिल्हा उद्योग केंद्र बीड मार्फत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींकडून शासनाच्या सुधारीत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेतंर्गत व्यवसायाकरीता कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

            सुधारीत बीज भांडवल योजना या योजनेतंर्गत व्यवसाय, उद्योग व सेवाकरीता अनुक्रमे  25 लाख व 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिल्या जाते, अर्जदाराचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असावे, अर्जदाराचे  सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी, अर्जदाराचे  शिक्षण इयत्ता 7 च्या पुढे असावे, अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 75 टक्के व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत 15 टक्के ते 20 टक्के सुधारीत बीज भांडवल मिळेल. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना ही योजना उद्योग व सेवा करीता लागु आहे, अर्जदाराचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असावे, अर्जदार ग्रामीण भागातील व ग्रामीण कारागीर असावा, अर्जदार शिक्षित, निरक्षर असावा, अर्जदारास कर्ज  मंजूर झाल्यास बँके मार्फत 75 टक्के, 65 टक्के कर्ज  व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत 20 ते 30 टक्के मार्जीन मनी बीज भांडवल मिळेल, तरी या योजनतंर्गत इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, बीड यांनी कळविले आहे.

मंगळवार, १ ऑगस्ट, २०१७

प्रधानमंत्री पिक विमा योजनेस 5 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ


बीड, दि. 1 :- ®úÉVªÉÉiÉ JÉ®úÒ{É ½ÆþMÉÉ¨É 2017 ¨ÉvªÉä |ÉvÉÉxɨÉÆjÉÒ Ê{ÉEò ʴɨÉÉ ªÉÉäVÉxÉÉ +ÊvɺÉÖÊSÉiÉ IÉäjÉÉiÉÒ±É +ÊvɺÉÖÊSÉiÉ Ê{ÉEòÉƺÉÉ`öÒ ¤ÉÒb÷ ÊVɱ½þªÉÉiÉ Ênù.ªÉÖxÉɪÉ]äõb÷ <ÆÊb÷ªÉÉ <ÆxºÉÖ®ÆúxºÉ EÆò{ÉhÉÒ Ê±É,{ÉÖhÉä ªÉÉ Ê´É¨ÉÉ EÆò{ÉhÉÒ ¨ÉÉ¡ÇòiÉ ®úɤÉÊ´ÉhªÉÉiÉ ªÉäiÉ +ºÉÖxÉ ¶ÉäiÉEò­ªÉÉÆxÉöÒ ºÉ½þ¦ÉÉMÉÒ ½þÉähªÉÉSÉÒ +ÆiÉÒ¨É ¨ÉÖnùiÉ 31 VÉÖ±Éè 2017 +¶ÉÒ ½þÉäiÉÒ. iÉlÉÉ{ÉÒ  ªÉÉäVÉxÉäiÉ ¶ÉäiÉEò­ªÉÉÆxÉÉ ºÉ½þ¦ÉÉMÉÒ ½þÉähªÉÉEò®úÒiÉÉ ÊnùxÉÉÆEò 05/08/2017 {ɪÉÈiÉ ¨ÉÖnùiÉ´ÉÉfø Eò®úhªÉÉiÉ  +ɱÉä±ÉÒ +ɽäþ.
´ÉÉføÒ´É EòɱÉÉ´ÉÊvÉiÉÒ±É Ê´É¨ÉÉ +VÉÇ ¡òCiÉ ¤ÉÄEäò ¨ÉÉ¡ÇòiÉSÉ º´ÉÒEòÉ®ú±Éä VÉÉhÉÉ®ú +ºÉÖxÉ VÉxɺÉÖÊ´ÉvÉÉ Eåòpù (ºÉÒBºÉºÉÒ) ±ÉÉ ªÉÉ EòɱÉÉ´ÉÊvÉiÉ |ÉÉÊvÉEÞòiÉ Eò®úhªÉÉiÉ +ɱÉä±Éä xÉɽþÒ.
Ê{ÉEòÊxɽþÉªÉ ºÉÆ®úÊIÉiÉ ®úCEò¨É ´É iªÉÉSÉÉ |ÉÊiÉ ½äþ. ʴɨÉÉ ½þ{iÉÉ ®úCEò¨É ªÉɤÉɤÉiÉSªÉÉ ºÉʴɺiÉ®ú ¨ÉÉʽþiÉÒºÉÉ`öÒ iÉɱÉÖEòÉ EÞòÊ¹É +ÊvÉEòÉ®úÒ EòɪÉÉÇ±ÉªÉ ´É IÉäjÉÒªÉ Eò¨ÉÇSÉÉ­ªÉÉƶÉÒ ºÉÆ{ÉEÇò ºÉÉvÉÉ´ÉÉ ´É +ÆÊiÉ¨É ¨ÉÖnùiÉÒSÉÒ ´ÉÉ]õ xÉ {ÉɽþiÉÉ +tÉ{ɽþÒ ºÉ½þ¦ÉÉMÉÒ xÉ ZÉɱÉ䱪ÉÉ ¶ÉäiÉEò­ªÉÉÆxÉÒ |ÉvÉÉxɨÉÆjÉÒ Ê{ÉEò ʴɨÉÉ ªÉÉäVÉxÉäSÉÉ ±ÉÉ¦É PªÉÉ´ÉÉ. +ºÉä +É´ÉɽþxÉ ÊVɱ½þÉ +ÊvÉIÉEò EÞòÊ¹É +ÊvÉEòÉ®úÒ, ¤ÉÒb÷ ªÉÉÆSÉä ´ÉiÉÒxÉä Eò®úhªÉÉiÉ +ɱÉä +ɽäþ.
-*-*-*-*-


आरसेटीचे सुशिक्षीत बेरोजगारासाठी प्रशिक्षण



          बीड, दि. 1 :- भारतीय स्टेट बँक, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,बीड यांच्यावतीने ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी माहे ऑगस्ट 2017 मध्ये प्रशिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे आयोजित करण्यात आलेले आहेत.

          ड्रेस डिजानिंग (महिलांसाठी) 30 दिवस, दुचाकी वाहन दुरुस्ती 30 दिवस दि. 1 ते 30 ऑगस्ट, या कालावधीत होणार आहे. तरी या प्रशिक्षार्थ्यांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल, प्रशिक्षण कालावधीत पूर्णपणे मोफत व निवासाची व्यवस्था केली जात आहे. तरी या प्रशिक्षणासाठी उमेदवार हा सुशिक्षीत बेरोजगार असावा. त्याचे शिक्षण सुरु नसावे, शैक्षणिक पात्रता किमान 8 वी पास असावा, कुटूंबाचे दारिद्र रेषेखालील यादीमध्ये नाव असावे, उमेदवार ग्रामीण भागातील रहिवाशी असावा, उमेदवाराचे वय किमान 18 ते 45 वर्षे असावे, प्रशिक्षणार्थ्यास व्यवसाय करण्याची आवड असावी, प्रशिक्षणासाठी कमाल 35 उमेदवारांची उपस्थिती आवश्यक आहे. तरी या प्रशिक्षणाचे अर्ज सर्व विस्तार अधिकारी, तालूका पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय, बीड  व प्रशिक्षण संस्था, एस.पी. समोर, भारतीय स्टेट बँक, शिवाजी नगर शाखेच्यावर, बीड येथे मिळतील. तरी वरील अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी दि.3 ऑगस्ट 2017 पुर्वी अर्ज भरुन प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक एम.पी. वाघमारे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन


          बीड, दि. 1 :- जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, सय्यद कलीम, एस.एम.लिमकर यांच्यासह जिल्हाधिकारी व कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.