शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८


महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथे
1 मे रोजी पालकमंत्री ना.पंकजा मुंडे
यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
            बीड, दि.27 :-  महाराष्ट्र दिनाच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. 1 मे 2018 रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 8.00 वाजता राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली.
          जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन समारंभाच्या पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांना पूर्व तयारीबाबत सूचना देवून कामांचा आढावा घेतला. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8.00 वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 7.15 वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तर जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी 6.55 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे.   या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांना मुख्य समारंभास उपस्थित राहता यावे यासाठी या दिवशी  सकाळी 7.15 ते 9 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास  त्यांनी तो समारंभ सकाळी 7.15 वाजण्यापूर्वी किंवा 9 वाजेनंतर करावा तसेच ध्वजारोहण कार्यक्रमास सर्व अधिकारी कर्मचा-यांनी शासकीय पोषाखात उपस्थित रहावे, असे सांगून श्री.सुर्यवंशी यांनी पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, गृहरक्षक दल, नगर परिषद, शिक्षण संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्वतयारी कामांविषयी विविध सूचना दिल्या. या बैठकीस  सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.-*-*-*-*-
वृत्त्‍ क्रमांक:- 383                           
                                                    महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी
बीड जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी
लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण
       
          बीड, दि. 27 :- दि.1 मे 2018 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 8.00 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिरुर कासार येथे आ.जयदत्त क्षीरसागर, आष्टी येथे आ.भिमराव धोंडे, माजलगाव येथे आ.आर.टी.देशमुख, गेवराई येथे आ.लक्ष्मण पवार, केज येथे आ.संगीता ठोंबरे, परळी वैजनाथ येथे धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधान  परिषद, अंबाजोगाई येथे आ.विनायक मेटे, विधान परिषद सदस्य आणि पाटोदा येथे आ.अमरसिंह पंडीत, विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न होणार आहे. तरी या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
-*-*-*-*

बुधवार, २५ एप्रिल, २०१८


 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मागण्यांची
                    संबधित अधिका-यांनी पुर्तता करुन अहवाल सादर करावेत
                                                     अपर जिल्हाधिकारी बी.एम.कांबळे

                     
       बीड,दि,025:- शेतकरी आत्महत्या बाबत अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्या बाबत जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या अपेक्षाचा आढावा घेतला व त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी संबतिध अधिका-यांनी दोन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना श्री. कांबळे यांनी यावेळी दिल्या.
          बीड जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा एकूण 14 प्रकरणाचा आढावा घेतांनी  अपर जिल्हाधिकारी बी.एम कांबळे यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुबियांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले. यावेळी 14 प्रकरणातील आत्महत्याग्रस्त प्रत्येक कुटुंबियातील व्यक्तींनी शासनाकडून विहीर,शेळया,म्हशी,मुलांच्या शिक्षणाचा खर्च,मुलांच्या औषधोपचारासाठी खर्च, त्यांच्या विधवा पत्नीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ शासनाकडून मिळावा तसेच सुशिक्षीत मुलगा असेल तर त्याला शासकीय नोकरी मिळावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
          या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सुर्यवंशी, प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक अजित बोराडे,अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला,उपजिल्हाधिकारी रोहयो महेंद्र कांबळे, उपविभागीय अधिकारी  विकास माने,उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,ग्रामसेवक,आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे प्रतिनिधी जीवनराव बजगुडे,संबधित अधिकारी व आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे विविध तालुक्याच्या गावातील कुंटुंबिय उपस्थित होते.******


       

गुरुवार, १२ एप्रिल, २०१८


लोकराज्यच्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन
बीड,दि.12 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या एप्रिल 2018 च्या ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते शिरुर (कासार) जि. बीड येथे शुक्रवार दि.11 एप्रिल 2018 रोजी  झाले. यावेळी आमदार भिमराव धोंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आमदार गोविंद केंद्र, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती संतोष हंगे आदि मान्यवर तसेच जिल्हा माहिती कार्यालयाचे श्रीमती बी.जी. अंबिलवादे, ना. गो. पुठ्ठेवाड उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल 2018 रोजीच्या 127 व्या जयंतीनिमित्त माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या महामानवाला अभिवादन या विशेषांकातील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची पत्रकार मधू कांबळे यांनी घेतलेली मुलाखत, राजषी शाहू आणि डॉ. आंबेडकर (डॉ.जयसिंगराव पवार), परिवर्तनाचे अग्रदूत (डॉ. शैलेंद्र लेंडे), जलनीतीचे उद्गाते (अविनाश आ. चौगुले), ऊर्जाशक्तीला चालना                         (डॉ. जी. एस. कांबळे), उत्कृष्ट संसदपटू आणि शिस्तप्रिय प्रशासक (डॉ.संभाजी खराट), बाबासाहेबांची जयंती कधी आणि कोणी सुरु केली ? महामानवाचा स्मृतिगंध (मिलिंद मानकर), ग्रंथकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डॉ. संदेश वाघ), बुद्विवादीची प्रेरक शक्ती (प्रा. डॉ. म. सु. पगारे), शिक्षणाची मुहुर्तमेढ (दत्ता गायकवाड ), शांततामय सहजीवनाचे हमीपत्र (डॉ. अक्रम ह.पठाण), महामानवाचा जीवनपट, समतेचा उद्गाता (प्रा. नागसेन भीमरावजी ताकसांडे), प्रेरणा , ऊर्जा आणि स्फूर्ती देणारी तीर्थस्थळे (डॉ. बबन जोगदंड ), सुरक्षेचा प्रहरी (डॉ. विजय खरे), ज्येष्ठ विचारवंत डॉ.गंगाधर पानतावणे यांच्यावरील दलित साहित्याचा आधारवड (यशवंत भंडारे), आदि लेख वाचनीय आहेत.  जास्तीत जास्त नागरिकांनी महामानवाला अभिवादन  हा माहे एप्रिल 2018चा  लोकराज्य विशेषांक खरेदी करण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय,बीड यांच्यावतीने  करण्यात येत आहे.
-*-*-*-*-*-




मंगळवार, ३ एप्रिल, २०१८


जिल्हा माहिती कार्यालय, बीड                                                                                 दिनांक : 3 एप्रिल  2018
दूरध्वनी  क्रमांक  (02442) 222327                                                                       e-mail : diobeed1@gmail.com
                                                                        महाराष्ट्र शासन                              
 dgiprdiobeed.blogspot.in           @DioBeed                जिल्हा माहिती कार्यालय बीड      diobeed1@gmail.com
वृत्त क्र. 140
                           राज्यसेवा पूर्व परीक्षा सात उपकेंद्रावर;
केंद्र परिसरात 144 कलम लागू
                   
          बीड, दि. 3 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परिक्षा-2018 नूसार बीड जिल्हा केंद्रावर दि. 08 एप्रिल 2018 रोजी एकुण 2 हजार 496 उमेदवारांची परीक्षा दोन सत्रात घेण्याचे निश्चित आहे. त्यानूसार 07 उपकेंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राचे परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे.परीक्षा केंद्र खालीलप्रमाणे.
चंपावती माध्यमिक विद्यालय,नगर रोड,बीड,भगवान विद्यालय,धानोरा रोड,बीड,संस्कार विद्यालय,नवीन इमारत भाजी मंडई,बीड,गुरुकुल इंग्लीश स्कुल,जालना रोड,बीड, शिवाजी विद्यालय,कॅनालरोड बीड,श्री. छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय, शाहू नगर बीड आणि डॉ. बापूजी साळूंके माध्यमिक विद्यालय,डी.एड.कॉलेज,सिव्हील हॉस्पीटल मागे, बीड या सात उपकेंद्रावर होणार आहे.
          परीक्षेच्या वेळी परीक्षार्थी सोबत त्यांचे नातेवाईक, मित्र आणि हितचिंतक परीक्षा केंद्राच्या परीसरात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे  परीक्षा केंद्राचे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि असे प्रसंग निर्माण झाल्यास केंद्र प्रमुख,  पर्यवेक्षक, समवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना परीक्षा सुरळीतपणे पार पाडणे अडचणीचे होईल. परिक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता बीडचे  निवासी उपजिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन आदेशीत केले आहे की परीक्षेच्या दिवशी केंद्र परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून ते परीक्षा संपेपर्यंत पेपर संपेपर्यंत 100 मिटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परिक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र  येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
          परिक्षार्थीनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र, स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोअर् किंवा ड्रायव्हींग लायसन्स (स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत ठेवणे आवश्यक आहे.
     तसेच परीक्षा केंद्रापासून 100 मिटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालु ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वेळेअभावी प्रत्येक इसमास नोटीस देणे शक्य नसल्यामुळे तसेच वेळेअभावी हा आदेश प्रत्येक इसमावर तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये हा एकतर्फी आदेश देण्यात आला आहे. असे बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी आदेशात नमुद केले आहे.
-*-*-*-*-




वृत्त क्रमांक:-141
 त्रैमासिक विवरणपत्र ईआर
ऑनालाईन भरण्‍याच्या सूचना.
                  बीड दि.3:-ºÉä´ÉɪÉÉäVÉxÉ EòɪÉÉDZɪÉä ( Ê®úCiÉ {Énäù ºÉCiÉÒxÉä +ÊvɺÉÚÊSÉiÉ Eò®úhÉä ) +ÊvÉÊxÉªÉ¨É 1959 Eò±É¨É 5 (1) (2) +ÉÊhÉ ÊxɪɨÉɴɱÉÒ 1960 ÊxÉªÉ¨É Gò. 6 +x´ÉªÉä ¤ÉÒb÷ù ÊVɱÁÉiÉұɠ ºÉ´ÉÇ Eåòpù ¶ÉɺÉxÉ, ®úÉVªÉ ¶ÉɺÉxÉ, ÊxɨɶÉɺÉEòÒªÉ EòɪÉÉDZɪÉä, ¶ÉɺÉEòÒªÉ +ÆMÉÒEÞòiÉ ={ÉGò¨É, ¨É½þɨÉÆb÷³äý, ºlÉÉxÉÒEò º´É®úÉVªÉ ºÉƺlÉÉ  ´É VªÉÉ JÉÉVÉMÉÒ +ɺlÉÉ{ÉxÉäiÉ 10 ËEò´ÉÉ iªÉÉ{ÉäIÉÉ VÉɺiÉ ¨ÉxÉÖ¹ªÉ¤É³ý +ºÉ±É䱪ÉÉ +ɺlÉÉ{ÉxÉÉ ªÉÉÆxÉÒ EòÉè¶É±ªÉ Ê´ÉEòɺÉ, ®úÉäVÉMÉÉ®ú ´É =tÉäVÉEòiÉÉú ʴɦÉÉMÉÉSÉä website:www. mahaswayam.in ªÉÉ ºÉÆEäòiɺlɳýÉ´É®ú ¨Éɽäþ ¨ÉÉSÉÇ-2018 +JÉä®úSÉä jÉè¨ÉÉʺÉEò Ê´É´É®úhÉ{ÉjÉ E.R.-1 On Line Generate Eò®úÉ´Éä ´É Generated E.R.-1
SÉÒ Print ÊVɱ½þÉ EòÉè¶É±ªÉ Ê´ÉEòÉºÉ ®úÉäVÉMÉÉ®ú ´É =tÉäVÉEòiÉÉ ¨ÉÉMÉÇnù¶ÉÇxÉ Eåòpùù, VÉɪÉEò´ÉÉb÷Ò ´ÉºÉɽþiÉ, VÉÖxÉä ʴɸÉɨÉMÉÞ½þ,xÉMÉ®ú ®úÉäb÷, ¤ÉÒb÷ù ªÉälÉä ºÉÉnù®ú Eò®úÉ´ÉÒ.              
               On Line Generate Eäò±Éä±Éä E.R.-1 ¨ÉÖnùiÉÒiÉ ªÉÉ EòɪÉÉDZɪÉÉºÉ ºÉÉnù®ú Eò®úhªÉÉiÉ ªÉÉ´É Genaratated  E.R.-1 ºÉÉnù®ú xÉ Eò®úhÉÉ-ªÉÉ +ɺlÉÉ{ÉxÉÉ Ê´É°ürù +ÊvÉÊxÉªÉ¨É 1959, ÊxÉªÉ¨É 1960 ´É Eò±É¨É 6 +x´ÉªÉä nÆùb÷Éi¨ÉEò EòɪÉÇ´ÉɽþÒSÉÒ iÉ®úiÉÚnù +ɽäþ.
On Line Generate Eäò±Éä±Éä E.R.-1 ¨ÉÖnùiÉÒiÉ ªÉÉ EòɪÉÉDZɪÉÉºÉ ºÉÉnù®ú Eò®úhªÉÉiÉ ªÉÉ´Éä.
 
 E.R.-1 Generate Eò®úhªÉÉSÉÉ EòɱÉÉ´ÉvÉÒ  01.04.2018 iÉä 30.04.2018

xÉÉånùhÉÒ xÉ Eäò±É䱪ÉÉ +ɺlÉÉ{ÉxÉÉÆxÉÒ On Line xÉÉånùhÉÒ Eò¯ûxÉ PÉähÉä ¤ÉÆvÉhÉEòÉ®úEò +ɽäþ.
वृत्त्‍ क्रमांक:- 142
शुभ कल्याण मल्टी स्टेट को.-आपरेटिव्ह सोसायटीत
ठेवी ठेवणा-या नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात संपर्क साधावा
         बीड,दि,3:- शुभ कल्याण मल्टी स्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. हावरगांव ता. कळंब जिल्हा उस्मानाबाद शाखा अंबेजोगाई,माजलगांव,केज,धारुर,आष्टी आणि परळी या शाखेतील ठेवीदारांच्या ठेवी मुदत संपूनही पतसंसथेने त्यांच्या ठेवी परत दिलेल्या नाही अशा स्वरुपाच्या तक्रारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील गुन्हे शाखेकडे प्राप्त झाल्या असून त्यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सर्व गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा बीड यांकडुन चालु आहे.
               बीड येथील नागरिकांनी अशा ठेवी ठेवल्या असल्यास त्यांनी ठेवीचा दस्ताऐवजासह आर्थिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संपर्क साधावा असे, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.*********
वृत्त क्रमांक:-143
श्रावण बाळ योजने अंतर्गत लाभार्थ्यांनी
मंजूर अनुदानाची यादी नोटीस बोर्डवर पाहावी
         बीड,दि,3:- सर्व संगायो/ श्रावणबाळ योजने अंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे अंगठे उलटत नसल्यामुळे त्यांचे बँकेत पैसे जमा होत नाहीत. अशा  एकुण 343 लाभार्थ्यांचे अनुदान एस बी. आय, कॉनरा बँक, महाराष्ट डीसी सी या बॅकेत जमा  करण्यात आले आहे.
               या लाभार्थ्यांनी आपले आधारकार्डची छायांकित प्रत,हयात नामा, मंजूरी आदेशाची प्रत बीड तहसील कार्यालयात अर्जासहित सादर करावेत. यानंतर लाभार्थ्यांचे आनुदान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल. तसेच तहसील कार्यालय बीड येथे सर्व लाभार्थ्याची यादी नोटीस बोर्डवर डकविण्यात आली असल्याची तहसील कार्यालयातील पत्रात नमूद करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी संबधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.******   
वृत्त्‍ क्रमांक:-144
                                                            अप्रेटीसशिप उमेदवारानी ऑनलाईन अर्ज सादर करावेत
               बीड,दि,3:- अप्रेटीसशिप झालेल्या उमेदवारांची शिकाउर् उमेदवारी 107 परीक्षा दि. 2 मे 2018 ते 11 मे 2018 या कालावधीत होणार असून परिक्षेचे वेळापत्रक तसेच कार्यक्रम पत्रिका www.apprenticeship.gov.in वर  news  & updates मये उपलब्ध असून परीक्षेला पात्र व नवीन व नापास उमेदवारांनी  www.apprenticeship.gov.in व  in cbtexam.dht.www  या संकेतस्थळावरुन माहिती घेउुन दि. 1 एप्रिल ते 10 एप्रिल 2018  पर्यत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
               उमेदवारांनी परीक्षा शुल्क मुलभूत पशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्राव्दारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथे जमा करावे. आक्टोंबर 17 ची 106 परीक्षेचा निकाल लागला असून शिकाऊ उमेदवारांनी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथून प्राप्त करावे, असेमुलभुत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्राचे  अंशकालीन प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.*******

   


सोमवार, २ एप्रिल, २०१८


वृत्त क्र. 139
     पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे
यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम
बीड, दि. 02:- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          मंगळवार दि. 3 एप्रिल 2018 रोजी सकाळी 8.15 मालेवाडी तांडा क्र.1 व 2 ता. परळी जि. बीड येथे गाव तिथे विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामस्थांशी संवाद. सकाळी 9.30 वाजता मालेवाडी ता.परळी जि. बीड येथे गाव तिथे विकास कार्यक्रमांर्तगत ग्रामस्थांशी संवाद. सकाळी 10.30 वाजता वनवासवाडी ता.परळी  येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.सकाळी 11.00 वाजता सेवानगर तांडा ता.परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद. सकाळी 12.00 वाजता मैंदवाडी व रुपसिंग तांडा ता.परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद. दुपारी 12.30 वाजता लेंडवाडी तांडा ता. परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत गामस्थांशी संवाद. दुपारी 13.30 वाजता मैंदवाडी ता. परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.दुपारी 15.30 वाजता दौंडवाडी ता. परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.दुपारी 16.30 वाजता आनंदवाडी ता. परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.सांयकाळी 17.30 वाजता. नागदरा ता. परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.सायंकाळी 19.00 वाजता लाडझरी ता. परळी  येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.सांयकाळी 20.30 वाजता लेंडवाडी ता.परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.सांयकाळी 21.00 वाजता चांदापूर ता. परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद व सोयीनुसार यशश्री  निवासस्थान परळी येथे आगमन व मुक्काम.
          बुधवार दिनांक 4 एप्रिल 2018 रोजी सकाळी 8.30 वाजता वैजवाडी/धारावती तांडा ता.परळी येथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.सकाळी 9.30 वाजता कासारवाडी ता.परळीयेथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.  सकाळी 1.30 वाजता नंदनज ता.परळीयेथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद. सकाळी 11.30 वाजता सारडगाव ता.परळीयेथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.  दुपारी 12.30 वाजता मिरवट ता.परळीयेथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद. दुपारी 16.30 वाजता वसंतनगर /मोहदरा तांडा  ता.परळीयेथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.  सांयकाळी 17.30 वाजता मलकापूर ता.परळीयेथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.  सांयकाळी 18.30 वाजता मरळवाडी ता.परळीयेथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद.सांयकाळी 20.00 वाजता मांडवा ता.परळीयेथे गाव तिथे विकास कार्यक्रमातंर्गत ग्रामस्थांशी संवाद. सोयीनुसार यशश्री  निवासस्थान परळी येथे आगमन व मुक्काम.******