बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्ज करावेत


         
          बीड, दि.1 :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती,  नवबौध्द शेतकऱ्यांकडून नवीन विहिर, जुनी विहिर दुरुस्ती, इनवेल बोअरींग पंप संच, विज जोडणी आकार, शेततळ्याचे अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन संच अश विवि‍ध बाबींचा लाभ देण्यासाठी दि.30 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज सादर करावेत.
          योजनेत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर नवीन विहिर, जुनी विहिर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, पंप संच, विज जोडणी आकार, शेततळ्याचे अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन संच, विद्युत पंप, विद्युत  पंप इत्यादी बाबींचा लाभ देण्यात येतो. दारिद्र रेषेखालील अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देवून त्यांची आर्थिक उन्नती घडविणे व त्यांना दारिद्र रेषेच्यावर आणने हे या योजनेचे उदिष्ट आहे. लाभधारकांनी agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर, महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र अथवा इतर ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज करावा आणि त्यांची मुळ प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह पंचाय समिती (कृषि विभाग) कार्यालयास सादर करावयाची आहे. पात्र अनुसूचित जाती, नवबौधद शेतकऱ्यांनी  योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी (विघयो) यांच्याशी संपर्क साधावा. असे बीड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा