बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अर्ज करावेत



          बीड, दि.8:- भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवासासह शिक्षणाची मोफत सोय असणाऱ्या जवाहर नवोदय गढी येथे इयत्ता सहावी वर्गात प्रवेशाकरीता www.nvshq.org,  www.jnvbeed.org संकेतस्थळावरुन अर्ज प्राप्त करुन विद्यार्थी पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून प्रमाणित करुन घ्यावा. विद्यार्थी, पालक व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असलेला अर्ज प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, गढी यांच्याकडे सादर करावेत.
          परीक्षेसाठी विद्यार्थी, विद्यार्थींनी बीड जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत सत्र 2017-18 मध्ये इयत्ता पाचवी वर्गात शिकत असला पाहिजे, उमेदवार हा इयत्ता तिसरी, चौथी पूर्ण शैक्षणिक सत्र सलगपणे सरकारमान्य शाळेतूनच उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराचा जन्म 1 मे 2005 ते 30 एप्रिल 2009 या कालावधीत झालेला असावा. उमेदवारांचा ग्रामीण भागासाठी आरक्षित 75 टक्के जागाकरीता पात्र  उमेदवार हा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी सलगपणे फक्त ग्रामीण विभागातील सरकारमान्य शाळेतूनच शिकलेला असावा. एक दिवस जरी तो शहरी विभागातील शाळेत अध्ययन केलेला असल्यास त्यास शहरी समजण्यात येईल. प्रवेश अर्ज सेतू केंद्रातून दि.25 नोव्हेंबर 2017 पुर्वी भरण्यात यावेत. अधिक माहितीसाठी www.nvshq.org,  www.jnvbeed.org या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा 02447-259607, 259491 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, गढी ता.गेवराई जि.बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा