बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधनासाठी अर्ज करावेत


         
          बीड, दि.1 :- जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळण्यासाठी शनिवार दि.18 नोव्हेंबर 2017 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
          अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली असून या योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी बचतगटांना 3 लाख 15 हजार रुपये 90 टक्के अनुदानावर देण्यात येतात. या रक्कमेपैकी 10 टक्के रक्कम 35 हजार रुपये स्वहिस्सा संबंधित बचत गटांनी भरणे आवश्यक राहील. विहित नमुन्यातील अर्ज समाज कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे बीड समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा