मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०१७

अन्न व औषध प्रशासनाची प्रतिबंधित पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई



            बीड, दि.14:- अन्न व औषध प्रशासनाच्या बीड कार्यालयास गुप्त खबर प्राप्त झाल्यानूसार बीड शहरातील साठे चौकामधील न्यु तारा पान सेंटर येथे प्रतिबंधीत पदार्थाची राजरोस विक्री करण्यात येते अशी माहिती मिळाली. या विक्रीची खात्री झाल्यानंतर श्रीमती जाधवर यांच्या टीमने पान सेंटरवर धाड टाकली व धाडीत प्रतिबंधीत अन्न पदार्थ गोवा गुटखा, बाबा गुटखा, पेट्रोल गुटखा, एक्का गुटखा, रजनीगंधा पानमसाला व सुगंधीत तंबाखु व सुपारीचे 17 हजार 672 रुपयांच्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला. तसेच या व्यवसायासाठी वापरात येणारी पानटपरीसुध्दा जप्त करण्यात आली असून तिची किंमत अंदाजे 45 हजार इतकी आहे. व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शासनाने बंदी घातलेल्या पदार्थाचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक व विक्री करु नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे बीडचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा