मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

विशेष इंद्रधनुष्य मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन संपन्न



                        
          बीड, दि.7 :- अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे विशेष इंद्रधनुष्य मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यातील मोहीमेचे उदघाटन बीड जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
          यावेळी जि.प.सदस्य शंकर उबाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.एल.मोरे, डॉ.जे.एन.सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ.सहासष्टे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
          प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजनेअंतर्गत स्त्री रोगाची तपासणी करणे तसेच सर्व बालकांचे संपूर्ण लसीकरण व गरोदर माताची तपासणी करण्याचे आवाहन सभापती श्री.देशमुख यांनी यावेळी केले. बीड जिल्हा आरोग्य विभागाने चांगली आरोग्य सेवा देऊन आदर्श पॅटर्न राबवावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          जिल्ह्यात दि.7 ते 18 नोव्हेंबर 2017 या कालावधीत शहरी व ग्रामीण भागात 192 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा. असे बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा