बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

 

ई - पीक पाहणी साठी जिल्हयात

विशेष मोहिम -- जिल्हाधिकारी

          बीड, दि. 22 (जि.मा.का.) 15 ऑगस्ट पासून राज्यात ई- पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात पीक पेरणीची माहिती स्वत: शेतक-यांनी मोबाईल ॲपव्दारे गाव नमूना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी उपलब्ध करुन देण्याच्या क्रातिकारी कार्यक्रमाची राज्यात अमलबजावणी करण्यात येत आहे. राज्याच्या काही भागामध्ये अतिवृष्टी,पूर,कारोना महामारी आणि उशीराच्या मान्सुनमुळे ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा उशीराने झलेला शुभारंभ याचा विचार करुन खरीप   हंगामाची पीक पाहणी नोदंविण्याचा कालावधी 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

         बीड जिल्हयात मागील एक महिन्यात 2,28,463 शेतक-यांनी ॲप डाऊनलोड करुन 2,18,504  शेतक-यंनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित शेतक-यांनी त्यांचा पीक पेरा ई पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे विहित मुदतीत नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने 23 सप्टेबंर ते 26 सप्टेबंर 2021 पर्यंत विशेष मोहिम बीड जिल्हयात राबवून शेतक-यांनी पीक पेरा पूर्ण करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

        त्याची सर्व जबाबदारी संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. संबधित उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त तालुक्यात 23 सप्टेबंर 2021 ते 26 सप्टेबंर 2021 पर्यंत विशेष मोहिम राबविण्यासाठी तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन करुन ही माकहिम यशस्वी करावयाची आहे. सदर मोहिम यशस्वी करण्याकरिता अधिनस्त तहसीलदार कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक व इत्तर आवश्यक कर्मचा-यांची मदत घ्यावी. बीड जिल्ह्यात एकूण 1 हजार 402 महसूली गावे प्रत्येक गावातील किमान 200 शेतक-यांची नोंदणी करुन पीक पाहणी पुर्ण करावयाची आहे. 23 सप्टेबर 2021 ते 26 सप्टेबंर 2021 रोजी  ई- पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे करण्यासाठी पुढीलप्रमाणे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

           तालुक्याचे, नाव गावाची संख्या बीड- 239,आष्टी- 177, पाटोदा- 107, वडवणी 49, शिरुर कासार- 95, गेवराई- 192, अंबाजोगाई- 106, केज- 135, माजलगाव- 121, धारुर- 73, परळी- 108 एकूण 1402. प्रत्यक गावासाठी 10 किंवा उदिष्टानुसार कमी/अधिक प्रमाणात स्वयंमसेवकांची निश्चत करावयची संख्या. आणि प्रत्येक स्वंयसेवकास 20 शेतक-यांची नोंदणी केल्यास पूर्ण होणारे काम(कमी अधिक प्रमाणात) बीड- 2390, 47800 आष्टी- 1770,35400, पाटोद- 1070,21400, वडवणी- 490, 9800, शिरुर कासार- 950,19000, गेवराई- 1920,38400, अंबाजोगाई- 1060, 21200,केज- 1350,27000, माजलगांव- 1210,24200, धारुर- 730,14600, परळी- 1080,21600, एकूण 14020, 280400 वरील उदिष्टे साध्य होण्याच्या दृष्टीकोनातून व मोहिम यशस्वीकरण्यासाठी प्रत्येक गाव निहाय नियोजन व जनजागृती  करावयाची आहे.

        या मोहिमेसाठी मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, रोजगारसेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतीशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सीएसी केंद्र चालक संग्राम केंद्र चालक, मोबाईल ज्ञान असलेला तरुण वर्ग, तरुण मंडळाचे पदाधिकारी अशा स्वंयसेवकांची Volunteers ची निवड करुन त्यांचे सहाय्याने गावातील शेतक-यांना ई- पीक पाहणी ॲपव्दारे पीक पेरा भरण्याबाबत मार्गदर्शन करावयाचे आहे व पीक पेरा भरुन घेण्याची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.

         प्रत्येक गावासाठी दहा किंवा गरजेनुसार कमी- अधिक स्वंयसेवकांची  (Volunteers)  निवड करण्यात यावी व त्यांना दि. 2 सप्टेबंर 2021 रोजी आपल्या तालुक्यातील मास्टर ट्रेनर्स मार्फत ई- पीक पाहणी ॲपचे प्रशिक्षण देण्यात यावे. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी मोहिमेच्या दिवशी 23 सप्टेबंर 2021 ते 26 सप्टेबंर 2021 रोजी प्रत्येक दोन तासाने आढावा घ्यावा व जिल्ह्यात तीन लक्ष शेतक-यांचे पीक पेरा नोंदणी पूर्ण करण्याचे उदिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्यात यावा. असं जिल्हाधिकारी राधाबिनोद शमा यांली सूचित केले आहे.

*-*-*-*-*-*

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

*जिल्हयात अतिवृष्टीमुळे नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे आवाहन*

*जिल्हाधिकारी कार्यालय येथे  २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित*

 *नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक 02442-222604 वर  संपर्क साधवा*

 बीड , दि8:--जिल्हयात दिनांक 05 सप्टेंबर 2021 पासून नियमित पाऊस पडत असून बीड ,पाटोदा, आष्टी, गेवराई, अंबाजोगाई ,शिरूर कासार आणि बीड या तालुक्यात 65 मि.मि.पेक्षा जास्त अतिवृष्टी झालेली आहे. तसेच जिल्हयात अतिवृष्टीमध्ये वडवणी तालुक्यात बंधा-यात पुरामुळे  3 पुरूष वाहून गेले मयत झाले असून बीड तालुक्यात 1 महिला भिंत पडून मयत झाली आहे

              बीड जिल्हयात 11 तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मधील आपत्ती व्यवस्थापन निवारणार्थ जिल्हाधिकारी बीड येथील कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केलेला आहे. त्याचा संपर्क क्र 02442-222604 असा असून मदतीसाठी जनतेने कृपया या क्रमांकाशी संपर्क साधावा. तसेच आपल्या सभोवताली निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास तसेच नदीकाठी राहणार्या जनतेने पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वरील क्रमाकांशी तात्काळ संपर्क साधावा आणि सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

                                                                         *-*-*-*-*


 

*जिल्हयात अतिवृष्टीमुळे नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे आवाहन*

 

*जिल्हाधिकारी कार्यालय येथे  २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित*

 

*नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक 02442-222604 वर  संपर्क साधवा*

 

 

बीड , दि8:--जिल्हयात दिनांक 05 सप्टेंबर 2021 पासून नियमित पाऊस पडत असून 

बीड ,पाटोदा, आष्टी, गेवराई, अंबाजोगाई ,शिरूर कासार आणि बीड या तालुक्यात 65 मि.मि.पेक्षा जास्त अतिवृष्टी झालेली आहे. तसेच जिल्हयात अतिवृष्टीमध्ये वडवणी तालुक्यात बंधा-यात पुरामुळे  3 पुरूष वाहून गेले मयत झाले असून बीड तालुक्यात 1 महिला भिंत पडून मयत झाली आहे

 

 बीड जिल्हयात 11 तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मधील आपत्ती व्यवस्थापन निवारणार्थ जिल्हाधिकारी बीड येथील कार्यालयात 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वीत केलेला आहे. त्याचा संपर्क क्र 02442-222604 असा असून मदतीसाठी जनतेने कृपया या क्रमांकाशी संपर्क साधावा. तसेच आपल्या सभोवताली निर्माण झालेल्या पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास तसेच नदी

काठी राहणार्या जनतेने पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास वरील क्रमाकांशी तात्काळ संपर्क साधावा

आणि सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

                                   *-*-*-*-*

 

अनुकंपाधारक उमेदवारांची सामाईक व महसूल विभागाची

प्रतिक्षासूची संकेतस्थळावर प्रसिध्द

          बीड, दि. 4 :- (जि.मा.का.) जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथील ठेवण्यात येणारी दि. 22 ऑगस्ट 2005 नंतरची अनुंकपाधारक उमेदवारांची जिल्हास्तरीय सामाईक व महसूल विभागाची प्रतिक्षासूची - गट- क व गट- ड माहे जुलै 2021 जिल्हा बीड या कार्यालयाचे www.beed.gov.in (विभाग : आस्थापना) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

          सदरहू प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुकंपा प्रतिक्षासूचीमध्ये काही आक्षेप असल्यास संबंधितांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 15 (पंधरा) दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संबंधित नियुक्ती प्राधिकारी/ विभागप्रमुखामार्फत आक्षेप सादर करावेत. असे जिल्हा प्रशासनातर्फे प्रसिध्दी प्रत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

*-*-*-*-*-*-*