मंगळवार, १३ जून, २०१७

14 व 15 जून रोजी बीड येथे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रशिक्षणाचे आयोजन


बीड, दि. 13 :-  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी बीड कोषागार कार्यालय तसेच नवी दिल्ली येथील भविष्य निर्वाह नियामक व विकास प्राधिकरण (PFRDA)  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) प्रशिक्षण सत्राचे बुधवार, दिनांक 14 व 15 जून 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह, नगर रोड, बीड येथे चार सत्रामध्ये आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची चार सत्रे पुढीलप्रमाणे आहेत. 
सत्र क्र. 1 दि. 14 जून 2017, सकाळी 10 ते दु. 1 दरम्यान मुख्यालय बीड  येथील डी.डी.ओ. (आहरण व संवितरण अधिकारी) क्र. 3301000131 ते डी.डी.ओ. क्र. 33010003444, सत्र क्र. 2 दि. 14 जून 2017 रोजी दुपारी 2 ते 5 वाजेदरम्यान मुख्यालय बीड येथील डी.डी.ओ. (आहरण व संवितरण अधिकारी) क्र.33010003958 ते डी.डी.ओ. क्र. 3301923421 तसेच गेवराई व वडवणी तालुक्यातील सर्व डी.डी.ओ.  यांचे प्रशिक्षण होईल.
सत्र क्र. 3 मध्ये दिनांक 15 जून 2017 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेदरम्यान अंबाजोगाई, माजलगाव व धारुर तालुक्यातील सर्व डी.डी.ओ. (आहरण व संवितरण अधिकारी) यांचे प्रशिक्षण होईल. तर सत्र क्र. 4 मध्ये दिनांक 15 जून 2017 रोजी दुपारी 2 ते 5 वाजेदरम्यान आष्टी, केज, पाटोदा व शिरुर तालुक्यातील सर्व डी.डी.ओ (आहरण व संवितरण अधिकारी) यांचे प्रशिक्षण घेण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी / कर्मचारी यांनी उपस्थित राहून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन बीडचे जिल्हा कोषागार अधिकारी डी.डी. माडे यांनी केले आहे.

-*-*-*-

सोमवार, १२ जून, २०१७

सांडपाण्यामुळे नद्या दुषित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी - पर्यावरण मंत्री रामदास कदम


बीड, दि. 12 :-  बीड शहरासह जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांना प्राधान्य देऊन सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळून नद्या दुषित होणार  नाहीत याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी अशा सूचना राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केल्या.
बीड येथील शासकीय विश्रामगृह येथे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीड जिल्हा  पर्यावरण समितीच्या कामाचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ जालन्याचे उप प्रादेशिक अधिकारी श्री. शेळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्याचे खत तयार करावे. तसेच बीड शहर आणि ग्रामीण भागातीलही सांडपाणी व्यवस्थापनाला महत्व द्यावे. जेणे करुन सांडपाणी नद्यांच्या पाण्यामध्ये मिसळून पाणी दुषित होणार नाहीत.
यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले की, ज्या प्लास्टीक उत्पादनांमुळे प्रदुषण होते नियमबाह्य प्लास्टीक उत्पादनांवर बंदी घालावी तसेच  अशा अशा प्रकारच्या उत्पादनांवर प्रशासनाने नियमितपणे नजर ठेऊन वेळोवेळी योग्य ती  कारवाई करावी.  जिल्हयातील वृक्षलागवड व वृक्षसंगोपन कार्यक्रमाचाही पर्यावरण मंत्र्यांनी यांनी सविस्तर आढावा घेऊन उपयुक्त सूचना केल्या. या बैठकीस संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-

रविवार, ११ जून, २०१७

जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याकडून बाह्यवळण रस्त्याच्या कामाची पाहणी




बीड, दि. 11 :- जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी राष्ट्रीय राजमार्ग क्र. 211 च्या चौपदरीकरणाचे काम सुरु असलेल्या  मांजरसुंबा तसेच बीड शहराच्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी     श्री. सिंह यांनी बार्शीनाका परिसरातील बिंदुसरा नदीवरील मोठा पुल कमकुवत झाल्याने नदी पात्रामध्ये तयार करण्यात आलेल्या पर्यायी वळण रस्त्याची व या पुलाची पाहणी केली. बिंदुसरा नदीवरील पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
या पाहणीच्या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, आय.आय. बी. कंपनीचे चिफ जनरल मॅनेजर श्री. श्रीवास्तव यांची उपस्थिती होती.
-*-*-*-








बुधवार, ७ जून, २०१७

पोलीस नियंत्रण कक्षात नवीन दुरध्वनी क्रमांक कार्यरत




बीड, दि. 7 :- बीड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात 02442-222333 हा क्रमांक यापुर्वीपासून कार्यरत होता. या क्रमांकावर अतिरीक्त ताण येत असल्याने तसेच आपत्कालीन स्थितीत जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत मदत व्हावी या उद्देशाने बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस नियंत्रण कक्षासाठी अतिरिक्त क्रमांक 02442-222666 हा चालू करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांनी याची नोंद घ्यावी. असे बीडचे पोलीस उपअधिक्षक (गृह) यांनी कळविले आहे.

मंगळवार, ६ जून, २०१७

जीएसटी बाबत आवाहन 15 जूनपर्यंत व्यापाऱ्यांनी जीएसटीएनवर नोंदणी करावी


बीड, दि. 6 :- एक जुलैपासुन संपुण देशभर वस्तु आणि सेवा कर अंमलात येणार आहे. त्यासाठी मुल्यवर्धीत कायद्याअंतर्गत नोंदीत व्यापाऱ्यांनी www.mahavat.gov.in या संकेतस्थळावरुन प्रोव्हीजनल आयडी घेऊन GSTN  वर नोंदणी करणे आवश्यक आहे. यापुर्वी विक्रीकर विभागाने मुल्यवर्धीत कायद्याअंतर्गत नोंदीत व्यापाऱ्यांनी GSTN वर नोंदणी करावी यासाठी तालुकास्तरापर्यंत  बैठका घेऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. तथापी काही नोंदीत व्यापाऱ्यांनी अद्यापही GSTN वर नोंदणी केली नाही. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना शेवटची संधी म्हणून दिनांक 1 ते 15 जून दरम्यान GSTN वर नोंदणी करण्यासाठी संधी उपलब्ध करुन दिलेली आहे.
अश व्यापाऱ्यांनी सर्व  प्रथम www.mahavat.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन प्रोव्हीजनल आयडी घ्यावयाचा आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांना स्वत:चा मोबाईल क्रमांक, इ-मेल आयडी इत्यादी माहितीची आवश्यकता आहे. प्रोव्हीजनल आयडी घेतल्यानंतर व्यापाऱ्याने www.gst.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन सर्वप्रथम पासवर्ड बदलून घेणे आवश्यक  आहे. त्यानंतर नोंदणीची प्रक्रीया पुर्ण करणे गरजेचे आहे. तसेच नोंदणी करतानाच Digital Signature Certificate (DSC) किंवा E-sign ची नोंदणी करणे आवश्क आहे. या प्रक्रियेसंबंधी माहिती विभागाच्या संकेतस्थळावरील 35 T2016  या परिपत्रकात विभागाच्या संकेतस्थळावरील www.mahavat.gov.in या संकेतस्थळावरील whats new section मधील FAQ  मध्ये तसेच www.gst.gov.in या संकेतस्थळरावरील user manual मध्ये विषद करण्यात आलेली आहे. व्यापाऱ्यास नोंदणी करतेवेळी कोणतीही अडचण आल्यास त्यांनी संबंधित Nodal Officer कडे तात्काळ संपर्क साधावा. व्यापाऱ्यांनी सदरची प्रक्रीया 15 जून 2017 पर्यंत पूर्ण न केल्यास त्यांचे व्हॅट (मुल्यवर्धीत  कर)  मधून GST मध्ये संक्रमण होणार नाही त्या सदरील व्यापारी संक्रमणामुळे मिळणाऱ्या फायद्यास  अनुज्ञेय राहणा नाहीत असे औरंगाबाद विभागाच्या विक्रीकर सहआयुक्त (व्हॅट प्रशासन) दिपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.

-*-*-*-

लिपीक टंकलेखक पुर्व परिक्षा -2017 केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी

बीड, दि. 6 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपीक टंकलेखक परिक्षा 2017 ही दि. 11 जून 2017 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण 09 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी एकूण 3 हजार 312 उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.
            परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाईल,पेजर,कॅल्क्युलेटर व आभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही तसेच आयोगाच्या सुचनेनुसार उमेदवारांना परीक्षेचे आवश्यक साहित्यच  जवळ बाळगण्याची मुभा दिली आहे. उमेदवारांनी परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी  त्यांच्या परीक्षा केंद्रावर सकाळी 10.00 वाजेपूर्वी उपस्थित राहावे परीक्षा सुरु झाल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश दिला जाणार नाही याची संर्वानी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

सोमवार, ५ जून, २०१७

जिल्हा जात पडताळणी समितीची प्रलंबित प्रकरणासाठी विशेष मोहिम



बीड, दि. 5 :- जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, बीडकडे दि.15 मे 2017 अखेर प्राप्त झालेल्या जात पडताळणी अर्जांची छाननी करण्यात आली असून अपूर्ण कागदपत्रे असलेल्या प्रकरणात समितीने त्रुटी नोंदविल्या आहेत. अशी सेवाविषयक (नोकरी) प्रकरणे अंदाजे 415 पुराव्याअभावी प्रलंबित असल्याने अशा  प्रकरणातील त्रुटी पुर्ण करण्यासाठी दि.6 ते 8 जून 2017 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

सेवाविषयक प्रकरणातील अर्ज त्रुटीबाबत पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना दि.6 ते 8 जून रोजी सकाळी 10.30 ते 5.30 यावेळेत मुलाखतीसाठी बोलविण्यात आले असून अर्जदारांना एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. तरी एसएमएस प्राप्त होईल अशाच अर्जदारांनी समिती कार्यालयाकडे मुळ कागदपत्रासह संपर्क साधावा. संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी कळविले आहे.

रविवार, ४ जून, २०१७




शिक्षकांनी मुलांच्या हस्ते झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे
                                           - विभागीय आयुक्त डॉ.भापकर

बीड, दि. 4 :- वृक्ष लागवडीसाठी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालाघाट डोंगररांगा तसेच टेकड्या असून या टेकडी जवळील गावच्या शाळेतील शिक्षकांनी मुलांच्या हस्ते झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित 4 कोटी वृक्ष लागवडीसंदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अतिरिक्त विभागीय आयुक्त विजयकुमार फड, विभागीय वन अधिकारी श्री.सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) महेंद्रकुमार कांबळे,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना श्री.भापकर म्हणाले की, आपण आपली मानसिकता बदलून वृक्ष लागवड करावी मांजरसुंबा घाटात वृक्ष लागवड करुन ते उजाड डोंगर हरित कसे होतील याची काळजी घ्यावी. मनरेगाच्या माध्यमातून लावलेली झाडे कशी जगतील याची परिपूर्ण काळजी घेण्यात यावी. ही झाडे जगविण्याची ताकद मनरेगात आहे यामधून आपण वृक्षाचे संवर्धन करु शकतो. बीड जिल्ह्यात खुप डोंगर आहेत तेथे आपण झाडे लावून डोंगररांग हिरवीगार कशी होईल याची काळजी घ्यावी. शिक्षकांनी आपल्या शाळेतील प्रत्येक मुलाला एक झाड लावायला प्रोत्साहित करावे यासाठी मुलांचा संवाद झाडांशी, हवेशी, पाना-फुलांशी, डोंगररांगाशी कसा होईल यासाठी प्रयत्न करायला हवीत. डोंगराजवळच्या शाळांनी तेथील डोंगरावर झाडे लावून डोंगरे हिरवीगार करावीत. बीड जिल्ह्यात अंदाजे 6 लक्ष मुले पहिली ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत आहेत. टेकडीवर मुलांनी झाडे लावावीत आणि आठवड्यातून दोनदा -तिनदा त्याला पाणी घालून वृक्ष संवर्धन करावे या माध्यमातून आपल्याला 6 लक्ष झाडांचे संवर्धन करणे सोपे होईल असेही ते म्हणाले.
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मजूर असून ते काही काळ स्थलांतर करत असतात त्यामुळे त्यांच्या पाल्याच्या शिक्षणावर परिणाम होवून शाळाबाह्य मुलांची संख्या वाढू नये याकरीता शिक्षकांनी जागरुक असावे. तसेच फक्त शिक्षण न देता त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देण्यात येईल याकडे महत्वपूर्ण नजरेने पाहणे गरजेचे आहे. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेतील वातावरण कसे प्रसन्न राहिल याची काळजी घ्यावी अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.
प्रास्ताविक विभागीय वन अधिकारी श्री.सातपुते यांनी केले यामध्ये त्यांनी 50 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम शासनाने पुढील तीन वर्षात राबविण्याचे ठरविले असून आपल्या विभागीय आयुक्तांनी चला गावाकडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ हे अभियान राबविण्याचे ठरविले असून त्यात वृक्ष लागवड कार्यक्रमाचा समावेश केला आहे. असे सांगितले.

यावेळी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे, खापरटोनचे शिक्षक श्री.किर्दत आणि रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार विभागीय आयुक्त श्री.भापकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, रोटरी क्लब व विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.                                                     -*-*-*-*-

शुक्रवार, २ जून, २०१७

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम


बीड, दि. 2 :- केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु  हे शनिवार, दिनांक 3 जुन 2017 रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
शनिवार, दिनांक 3 जून 2017 रोजी सकाळी 11.15 वाजता परळी वैजनाथ, जि. बीड येथे नांदेडहून हेलिकॉप्टरने आगमन. सकाळी 11.30 वाजता परळी वैजनाथ रेल्वेस्टेशन येथे आगमन व परळी- बीड या नवीन रेल्वे मार्गाचे भूमीपूजन कार्यक्रम व परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनमधील प्रवाशांकरीता सोयी-सुविधांचे उदघाटन. तसेच राज्यातील रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

-*-*-*-

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा बीड जिल्हा दौरा


बीड, दि. 2 :-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे शनिवार, दिनांक 3 जुन 2017 रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
शनिवार, दिनांक 3 जून 2017 रोजी सकाळी 11.15 वाजता हेलिकॉप्टरने जुने शक्तीकुंज वसाहत, थर्मल कॉलनी हेलिपॅड, परळी वैजनाथ, जि. बीड येथे आगमन. सकाळी 11.20 वाजता मोटारीने परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सकाळी 11.25 वाजता परळी वैजनाथ रेल्वेस्टेशन येथे आगमन व रेल्वे प्रकल्पांचा शुभारंभ. दुपारी 12.15 वाजता परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन येथून मोटारीने गोपीनाथगड, पांगरी, ता. परळी वैजनाथकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमास उपस्थिती. दुपारी 2.05 वाजता गोपीनाथगड येथून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मैदान पांगरी हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मैदान पांगरी समोरील बाजू हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 2.15 वाजता हेलिकॉप्टरने नांदेडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-

पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 1 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि.3 जून 2017 रोजी लातूर येथून गोपीनाथगड पांगरी ता.परळी वैजनाथ, जि.बीड येथे सकाळी 10.30 वाजता आगमन व लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता गोपीनाथगड पांगरी येथून शासकीय मोटारीने जि.हिंगोलीकडे प्रयाण करतील.

गुरुवार, १ जून, २०१७

भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे केले आवाहन गावांच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा परिषद हे प्रभावी माध्यम - पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे प्रतिपादन








बीड, दि. 1 :- बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी गावांच्या सर्वांगिण विकासाला अत्यंत महत्व असून यासाठी जिल्हा परिषद आणि त्यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजना हे प्रभावी माध्यम आहे. याचा सर्व सदस्यांनी पुरेपूर उपयोग करावा असे आवाहन  राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालविकासमंत्री  तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
 बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विभागाच्या विकास योजनांचा आढावा पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस खासदार डॉ. प्रितम मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री मस्के, आमदार जयदत्त क्षीरसागार, आ. विनायक मेटे, आ. आर.टी. देशमुख, आ.  संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार तसेच प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधताना पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, आपल्या गावाचा आणि जिल्ह्याचा विकास करण्याची संधी जनतेने सदस्यांना दिली आहे. त्यांनी ही सुवर्णसंधी मानुन आपल्या भागात विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. विकास हा केंद्रबिंदु मानुन काम केल्यास गावे समृध्द होती. ग्रामीण जनतेचे प्रश्न समजावून घेतले आणि पुढाकार  घेऊन कामे  हाती घेतली तर जनता नक्कीच तुम्हाला साथ देईल. यासाठी सदस्यांनी शासनाच्या योजनांची माहिती सतत घेतली पाहिजे.
जिल्हा परिषदेचा कारभार विकासाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त असण्यावर भर द्यावा अशी सूचना करुन पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, आपल्या जिल्हा परिषदेने हागणदारीमुक्तीच्या दिशेने सुरु केलेले काम कौतुकास्पद आहे. मात्र प्रत्येक लोकप्रतिनिधींनी मनावर घेतले तर जिल्हा हागणदारीमुक्त व्हायला वेळ लागणार नाही. यासाठी झटून कामाला लागले पाहिजे. 17 टक्क्यांवरुन आपण 57 टक्के शौचालय बांधकामाचा  पल्ला गाठला आहे. औरंगाबाद विभागात आपल्या जिल्ह्याने सर्वात जास्त शौचालये बांधण्याची कार्यवाही केली आहे. ही बदलाची नांदी आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावापासून हागणदारी मुक्तीचा विडा उचलला तर नजिकच्या काळात आपला जिल्हा संपुर्ण हागणदारीमुक्त होईल अशी आशाही श्रीमती मुंडे  यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची कामे करीत असताना पक्षीय राजकारण दूर ठेवण्याचा सल्ला देत पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यातील जुन्या व पडीक शाळांच्या इमारतींच्या नुतनीकरणावर भर देण्याची गरज आहे. यासाठी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज सुरु आहे. अशा शाळांच्या दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधींनी आपला निधी प्राधान्याने द्यावा याशिवाय सीएसआर फंड आणि इतर माध्यमातूनही निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.  जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचा सविस्तर आढावा घेऊन अहवाल सादर करावा असे निर्देशही पालकमंत्री मुंडे यांनी दिले.
नागरिकांच्या सेवासुविधांसाठी एक खिडकी योजनेसारखा उपक्रमाची अंमलबजावणी करावी असे सूचित करुन त्या म्हणाल्या की, 14 वा वित्त आयोगामध्ये गाव विकास आराखडे झाले आहेत. गावांच्या गरजा लक्षात घेऊन आमदारांनी जिल्हा परिषद गटनिहाय बैठक घेऊन नियोजन  करावे. त्यानुसार निधीचे वितरण करण्यात येईल. पाणी पुरवठा योजनांच्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करण्याचे तसेच शाळा बांधकामातील गैरव्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी दिले.
          पाणी-स्वच्छता-रस्ते आणि आरोग्य या चार क्षेत्रातील विकास कामांना प्राधान्य दिले गेल्यास जिल्ह्यातील जनता अधिक सुखी होईल. यासाठी सर्वांनी  प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या क्षेत्रातील 1 कोटी रुपयांच्या एका रस्त्याची निवड करुन प्रस्ताव पाठवावा. त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येईल अशी घोषणाही पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी केली. तसेच जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर 898 वरुन 927 एवढा वाढल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी विविध विकास योजनेच्या माहितीचे सादरीकरण केले. खासदार, आमदार, आणि इतर मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेऊन उपयुक्त सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे सभापती संतोष हांगे, शोभा दरेकर, राजेसाहेब देशमुख, युधाजित पंडीत यांच्यासह पंचायत समिती सभापती, जि.प. सदस्य, तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशनच्या " दरवाजा  बंद तर आजारपण बंद" या घडीपत्रिकेचे विमोचन करण्यात आले.

-*-*-*-

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम


बीड, दि. 1 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.2 जून 2017 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्यास उपस्थिती (एन.एच.कॉलेज ऑफ इंजिनियरींग, परळी). परळी ग्रामीण येथे भाजप शिवार संवाद सभेस उपस्थिती. दुपारी 2 वाजता श्री.पवन मुंडे, नगरसेवक, परळी नगरपालिका यांच्या वास्तुशांती कार्यक्रमास उपस्थिती. सोईनूसार परळी निवासस्थानी राखीव.
शनिवार दि.9.30 वाजता वाहनाने गोपीनाथगडाकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता आगमन व ह.भ.प.रामायणाचार्य श्री रामराव महाराज ढोक यांचे किर्तनास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता परळी ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे भूमिपूजन व व्हिडीओ लिंकद्वारे रेल्वेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ- परळी रेल्वे स्टेशन). दुपारी 12.30 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त मा.मुख्यमंत्री महोदय व मा.रेल्वेमंत्री, भारत सरकार यांचे समवेत विविध सामाजिक कार्यक्रमास उपस्थिती. सोईनूसार परळी निवासस्थानी राखीव.

रविवार दि.4 जून 2017  रोजी सकाळी 11 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या वर्षश्राध्द कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ- मौ.हाळम ता.परळी जि.बीड). परळी निवासस्थानी राखीव.