बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासकीय मदतीबरोबरच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून दयावा - जिल्हाधिकारी एम. डी. सिंह



          बीड,दि.1 :- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच त्या कुटुंबाना स्वत:चा व्यवसायासाठी अवश्यक ती मदत  किंवा त्यांच्या मागणीनुसार इतर शासकीय योजनाचा लाभ  मिळवून देवून त्या कुंटुंबाला दिलासा  देण्याचे काम संबंधित अधिकाऱ्याने करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले
           जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि.31 ऑक्टोंबर रोजी शेतकरी आत्महत्याविषयी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी एम. डी. सिंह  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के,अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिवनराव बजगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह म्हणाले की, जिल्हयातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ शासकीय मदत मिळवून देण्याबरोबरच मिशन दिलासा अंतर्गत त्या कुटुंबाला त्यांच्या गरजेनुसार इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक असणारी संपूर्ण कार्यवाही पुर्ण करुन संबंधिताना लाभ मिळवून दयावे. असे सांगून या कुटुंबाना देण्यात येणारी मदत व  शासकीय लाभाची सविस्तर माहितीसाठी  सर्व तहसिलदारांनी समन्वयासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 जिल्हयातील मागील चार वर्षातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माहिती अद्यावत तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली.  जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ठेवण्यात आलेल्या प्रकरणावर चर्चा करण्यात आली व संबंधिताना योग्य त्या  सूचना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिल्या. या बैठकीस संमिती सदस्य, संबंधित अधिकारी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.
-*-*-*-*-


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा