शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८






पालकमंत्री पंकजा मुंढे
यांनी घेतला विविध विभागाच्या प्रलंबित कामाचा आढावा
            बीड, दि. 28 :- राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास तथा पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी परळी येथील चेमरी विश्राम गृहामध्ये आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शिक्षणविभाग, रुरबण योजना, सार्वजनिक बाधकांम विभाग आणि गृह या पाच विभागाची बैठक घेऊन प्रलंबित कामे मार्च अखेर पूर्ण करुन बीड जिल्हयाचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकावे अशा सूचना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
            या बैठकीस जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा कृषी अधिकारी श्री. चपळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  धनराज निला, कार्यकारी अभियंता श्री. सानप हे उपस्थित होते.
            यावेळी पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी राष्ट्रीय आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य केंद्राचे करण्यात येणारे बांधकाम पुर्ण करुन इमारतीचे उद्याटन करण्यास सज्ज ठेवावे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, मोतीबिंदू मुक्त जिल्हा, कायाकल्प योजना, मातृवंदन योजना, सुरक्षित मातृत्व अभियान, गोवर रुबेला लसिकरण, महावितरण विभागाने  दीनदयाल उपाध्याय योजने अंतर्गत किती कुंटुबांना याचा लाभ दिला, सबस्टेशन ची किती कामे केली, ग्रामीण व शहरी भागाची उपकेंद्राची पूर्ण झालेली व अपुर्ण कामे याची माहिती घेतली.
            शासनामार्फत राबविण्यात येणारे शामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशनतर्फ साचलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करुन गावे स्वच्छ करावीत तसेच शाळा व्यवस्थापन, शाळा कायापालट, शाळांच्या वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असल्यास रंगरंगोटी करुन शाळेतील भिंतीवर सुविचार लिहून शाळा आकर्षक कशा दिसतील या दृष्टीने नियोजन करुन 26 जानेवारी 2018 पर्येंत कमीत कमी  100 शाळा उद्याटनासाठी तयार ठेवाव्यात. राष्ट्रीय व राज्य महामार्गांची कामे उत्तम दर्जाची व वेळेत पूर्ण करुन घ्यावीत.
            जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अभाधित राहण्यासाठी व शांततेच्या दृष्टीने  कोण कोणत्या उपाययोजना केल्या गेल्यात. विविध गुन्हयातील गुन्हेगांराची संख्या, महिला अत्याचांराची संख्या, त्यांच्या सुरक्षतेसाठी काय काळजी घेतल्या जाते, गुन्हेगारीला व महिलावरील अत्याचाराला किती प्रमाणात आळा बसला ही सर्व माहिती  श्रीमती पंकजा मुंढे यांनी सखोल व प्रात्याक्षिका द्वारे जाणून घेतली  व जिल्हयाच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करुन कोणत्याच विभागाला निधी कमी पडू दिल्या जाणार नाही. अधिकाऱ्यांनी योग्य अंमलबजावनी करुन कामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे असेही पालकमंत्री यांनी  याबैठकी दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
            जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू नये यासाठी जिथे पाणीसाठा उपलब्ध असेल तेथून  टंचाई असलेल्या ग्रामीण भागासाठी  पाण्याचा पुरवठा करावा.  जनावरांना चारा कमी पडू देऊ नये, चाऱ्यांची टंचाई अधिक भासत असेल तर जनावरांसाठी छावण्या सुरु कराव्यात, याकामात कुचराई करु नये अशा सूचना  पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंढे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
            याप्रसंगी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी पाच विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांचा आढावा पालकमंत्री यांच्यासमोर सादर करुन पाणी व चारा टंचाई यावर शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून दुष्काळी परिस्थितीत पाणी व चारा टंचाई भासू दिली जाणार नाही असे सांगितले.
            याबैठकीस विविध विभागाचे संबधित अधिकारी ,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
*-*-*-*-*-*

मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८


  विभागीय आयुक्त पुरोषोत्तम भापकर यांनी
                           प्रत्याक्षिकाव्दारे जाणून घेतली  इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची माहिती.
            बीड दि.25 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठीच्या निवडणूकीत वापरण्यात येणारे नविन M-3 प्रकारच्या  मतदार यत्रांचे (इव्हीएम व व्हीव्हीपॅट) मशीनची प्रत्याक्षिकाव्दारे औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरोषोत्तम भापकर यांनी माहिती जाणून घेतली.
             विश्रामगृह येथे दिनांक 25 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9.00 वाजता निवडणूक आढावा बैठकीत  नवीन इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनव्दारे प्रत्येक्ष मतदान करुन त्याविषयी सखोल माहिती जाणून घेतली   व या मशीनवर कसे मतदान करायचे हे मतदारांना समजले पाहिजे त्यासाठी मतदारामध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होण्यासाठी अधिका-यांनी प्रयत्न करावा, अशा सूचनाही  औरंगाबादचे विभागीय आयुक्त पुरोषोत्तम भापकर यांनी यावेळी निवडणूक संबधित उपस्थित अधिका-यांना दिल्या. 
             भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.प्रविणकुमार धरमकर यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान करुन घेऊन प्रत्येक उमेदवाराला किती मतदारांचे मतदान पडले तसेच त्याचे मशीन व  व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठीद्वारे पडलेले मतदानाची मोजनी करुन दाखविली. तसेच या मशिनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मतदान केले त्याची प्रत्यक्ष चिठ्ठी सात सेकंदासाठी व्हीव्हीपॅट मशीनवर पाहता येणार आहे. त्यानंतर ही चिठ्ठी सदरील मशीनच्या बॉक्समध्ये संकलित होणार आहे असे श्री धरमकर यांनी यावेळी सांगितले.
              या कार्यक्रमास, अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी श्री.महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्री.प्रविण धरमकर,निवडणूकीच्या संबधित अधिकारी उपस्थित होते
             इव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे मतदान जनजागृती व प्रशिक्षण संदर्भात दि. 20 डिसेंबर 2018 पासून जिल्हयातील 06 मतदार संघातील तालुकानिहाय प्रत्येकी दोन पथकाच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी महाविद्यालय, बसस्थानक, आठवडी बाजार, मतदार केंद्रावर प्रात्याक्षिका द्वारे मतदारामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
            तसेच निरक्षर,दिव्यांग,वृध्द व इतर सर्वानांच या मशिनद्वारे मतदान सोपे आहे काही अडचण येणार नाही असे ही त्यांनी यावेळी सांगितले. प्रात्यकशीका दरम्यान मशीन मध्ये मतपत्रीकेवर उमेदवारांचे नाव आणि त्यांची निशाणी (चिन्ह ) यासाठी सांकेतीक शब्द आणि चिन्हांचा उपयोग करण्यात आला होता. अधिकारी, कर्मचारी तसेच मतदार  यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.   
*-*-*-*-*-*-*















गुरुवार, २० डिसेंबर, २०१८






माननिय.प्रमुख.जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती.प्राची कुलकर्णी मॅडम
यांच्या हस्ते इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्याक्षिकाचा शुभारंभ..
            बीड दि.20 :- आगामी लोकसभा निवडणूक 2019 साठीच्या निवडणूकीत वापरण्यात येणारे नविन M-3 प्रकारच्या  मतदार यत्रांचे (इव्हीएम व व्हीव्हीपॅट) प्रात्यशिक कार्यक्रमाचा मा.जिल्हा सत्र न्यायाधीश मा.श्रीमती.प्राची कुलकर्णी यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या सभागृहामध्ये शुभारंभ झाला.
             यावेळी बोलताना माननिय.प्रमुख.जिल्हा सत्र न्यायाधिश श्रीमती.प्राची कुलकर्णी म्हणाल्या की, काळानुसार नवनवीन क्षेत्रात क्रांती होत आहे तसेच नवीन इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनेही आता मतदानाच्या क्षेत्रात ही मोठी क्रांतीच म्हणावी लागेल. देश प्रगती पथावर जाण्याचे हे एक माध्यम आहे.    
             भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्या वतीने इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या प्रात्याक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा.जिल्हाधीकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.एम. डी. सिंह (भाप्रसे)यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन वापराबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थित मा.न्यायधिश महोदय आणि अधिकारी - कर्मचाऱ्यांनी मशीन वापराबाबत विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तरे दिली. तसेच या मशिनच्या माध्यमातून ज्या उमेदवाराला मतदान केले त्याची प्रत्यक्ष चिठ्ठी सात सेकंदासाठी व्हीव्हीपॅट मशीनवर पाहता येणार आहे. त्यानंतर ही चिठ्ठी सदरील मशीनच्या बॉक्स मध्ये संकलित होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
             या कार्यक्रमास, मा.जिल्हा प्रमुख न्यायाधीश-क्र.1 बीड श्री.बी.व्ही. वाघ साहेब , जिल्हा न्यायालयातील सर्व सन्मानीय न्यायाधीश , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमोल येडगे भाप्रसे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री.चंद्रकांत सुर्यवंशी , उपविभागीय अधिकारी श्री.महेंद्र कुमार कांबळे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्री.प्रविण धरमकर बीड, तहसिलदार श्री.अविनाश शिंगटे, समाकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.मडावी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
             इव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे मतदान जनजागृती व प्रशिक्षण संदर्भात दि. 20 डिसेंबर 2018 पासून जिल्हयातील 06 मतदार संघातील तालुकानिहाय प्रत्येकी दोन पथकाच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रे व प्रमुख ठिकाणी महाविद्यालय, बसस्थानक, आठवडी बाजार, मतदार केंद्रावर प्रात्याक्षिका द्वारे मतदारामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
            उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.प्रविणकुमार धरमकर यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे प्रत्यक्ष मतदान करुन घेऊन प्रत्येक उमेदवाराला किती मतदारांचे मतदान पडले तसेच त्याचे मशीन व  व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्ठीद्वारे पडलेले मतदानाची मोजनी करुन दाखवली. तसेच निरक्षर,दिव्यांग,वृध्द व इतर सर्वानांच या मशिनद्वारे मतदान सोपे आहे काही अडचण येणार नाही असे ही त्यांनी यावेळी सांगितले. प्रात्यकशीका दरम्यान मशीन मध्ये मतपत्रीकेवर उमेदवारांचे नाव आणि त्यांची निशाणी (चिन्ह ) यासाठी सांकेतीक शब्द आणि चिन्हांचा उपयोग करण्यात आला होता
जिल्हा न्यायालयातील सर्व मा.न्यायधीश आणि कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.   
*-*-*-*-*-*-*


बुधवार, १९ डिसेंबर, २०१८


अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांचे
प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार
                                                 --निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी
            बीड, दि.19:- शासन अल्पसंख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित असून  शासनाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विद्यार्थी व नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून अल्पसंख्याक  समाजातील गरजू लाभार्थींना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यासह नागरिकांनी पुढाकार घेण्याची  गरज आहे, असे सुतोवाच निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.
            मंगळवार दि. 18 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्पसंख्याक  हक्क दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी  बोलत होते. या कार्यक्रमास नगर परिषदेचे मुख्याधिकारी, धनंजय जावळीकर,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड, उपशिक्षणाधिकारी उस्मानी नजमा सुलताना,अल्पसंख्याक समितीचे पदाधिकारी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे बोलतांना निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, समाजातील प्रत्येक नागरिकांना कायदयाने मुलभूत अधिकार प्राप्त करुन दिले असून त्यांनी त्याचा वापर करण्याची गरज आहे.  असे सांगून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे यासाठी शासनाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सोई सुविधा   उपलब्ध करुन दिल्या आहेत त्याचाही लाभ त्यांनी घेतला पाहिजे. असेही  निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
            अल्पसंख्याक दिनाचे औचित्य साधून विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यार्थीनीच्या निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे बक्षिस वितरण निवासी उपजिल्हाधिकारी चद्रकांत सुर्यवंशी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
            निबंध स्पर्धेत गट 5वी ते 8 वीचे विद्यार्थी प्रथम क्रमांक उसैद अलीयाखान जावेद खान मिल्लीया बॉईज हायस्कुल,बीड व्दितीय क्रमांक शेख सानिया युनूस जि.प.उच्च प्राथमिक शाळा गावदरा.ता. धारुर,तृत्तीय क्रंमाक सासे धनश्री रमेशराव विमला माध्यमिक विद्यालय,गेवराई, गट 9 वी ते 10 प्रथम क्रमांक उजैर मलिक सुफवाज असिफ,मिल्लीया बाँईज हायस्कुल,बीड, व्दितीय क्रमांक काबरा लक्ष्मी कैलास, विमला माध्यमिक विद्यालय,गेवराई,तृतीय क्रंमाक कदम गणेश बालासाहेब,नाथकृपा माध्यमिक विद्यालय कासारी ता. धारुर जि. बीड. उतेजनार्थ बक्षीस मोमीन गौरमान अब्दुल करीम,मिल्लीया गर्ल्स हायस्कुल बीड,इग्रजी माध्यम बीड, शेख मदीहा तहेरीन आसेफ उद्रु माध्यम,बेग आसमा खालेद, जिल्हा परिषद शाळा,नवा मोढां माजलगाव,मराठी माध्यम. श्रेया ध्नजय काळे, पठाण् आयेशा आरेफ,मिलीया कन्या शाळा बीड, ऋतुजा पडीतराव मोटे,विमला विद्यालय,गेवराई,काळे श्रेया धनंजय,सरस्वत माध्यमिक विद्यालय,धारुर. पठाण् अजमल अमजद, गट 9 ते 10 वीची विद्यार्थीनी श्रद्रधा विक्रम करांडे,विमला विद्यालय,गेवराई, शेख अबुजर रफिक,इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल,गेवराई, गणेश बाळासोहब कदम,नाथकृपा मायामिक विद्यालय,कासारी, खेत्रे रविराज सीताराम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबारुई
            कार्यक्रमाचे प्रस्ताविक यावेळी जिल्हा परिषदेच्या उपशिणाधिकारी श्रीमती उस्मानी नजमा सुलताना यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी मा. श्री सोनवणे यांनी केले.   या कार्यक्रमास अधिकारी कर्मचारी यांच्यासह अल्पसंख्यांक समाजातील पदाधिकारी, नागरिक मोठया संख्येने  उपस्थित होते.
-*-*-*-*-





मंगळवार, १८ डिसेंबर, २०१८


फरदड कापुस मुक्त गाव अभियान जिल्हाभरात राबविण्यात यावे
बीड दि. 18 :- फरदड कापुस अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर व्यापक प्रमाणात मोहिम राबविण्यात येत आहे. बीड जिल्हयामधे कापुस पिकाचे 3.29 लाख हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगाम 2018 मध्ये बीड जिल्हयात 3.77 लाख हेक्टर क्षेत्रावर कापुस पिकाच्या बी.टी वाणाची लागवड करण्यात आलेली आहे. शेंदरी बोंड अळीमुळे  कापुस पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. बोंड अळीचा संपर्ण नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये आणि आपल्या शेतातील पऱ्हाटी मुळासहित उपटुन काढावी व किडग्रस्त बोंडे, नख्या इत्यादी अवशेषांचा संपुर्ण नायनाट करावा, असे अवाहन जिल्हा कृषि अधिक्षक एम.एल. चपळे यांनी केले आहे.डिसेंबर महिन्यात रात्रीच्या वातावरणात घट होत असल्याने व रात्रीच्या कालावधी वाढत असल्याचे गुलाबी बोंड अळीच्या पतंगाना उपजिविकेसाठी अनुकुल वातावरण ठरत आहे. त्यामुळे सद्याच्या परिस्थितीत गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन पुढील प्रमाणे करणे अत्यंत गरजेचे आहे.
            त्यामध्ये कामगंध सापळयाचा सामुहिकरीत्या वापर करुन मोठया प्रमाणात नर पंतग पकडण्याची मोहिम हाती घेतल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होईल तसेच जिनींग, प्रेसिंग मिल मध्ये कापुस साठवणीच्या ठिकाणी कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. या कामगंध सापळयातील ल्युर्स वेळोवेळी बदलून नवीन ल्युर्स लावावेत. तसेच 15-20 कामगंध सापळयाचा वापर करुन एकत्रितरित्या गुलाबी बोंडअळीचे पतंग गोळा करुन नष्ट करावेत.पुढील हंगामातील प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गुलाबी बोंडअळी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पऱ्हाटया किंवा वाळलेल्या नख्यामध्ये गुलाबी बोंडअळी सुप्त अवस्थेत जाण्याची शक्यता असते. अशा वेळी कपाशीचे शेतातील अवशेष नष्ट करणे आवश्यक आहे. तसेच डिसेंबर नंतर कपाशीचे पिके ठेवल्याने गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी कपाशीची बोंडे सतत उपलब्ध होत असल्याने तीच्या वाढीच्या अवस्थेत आणखी चालना मिळून अळीच्या जीवनक्रमांच्या संख्येत कमी कालावधीत वाढ होऊन बी-टी प्रथीनांचे प्रमाण कमी होऊन प्रतिकारक शक्ती निर्माण होते.
            डिसेंबर महिण्यानंतर शेतात 5 ते 6 महिणे कापूस पीक विरहीत ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम संपुष्टात येतो. त्यामुळे पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव कमी होतो. डिसेंबर नंतर खाद्य उपलब्ध नसल्यास अळी सुप्त अवस्थेत जाते. परंतु फरदडीमुळे जीवनक्रम चालू राहुन पुढील हंगामात लागवड करण्यात येणाऱ्या कापसावर तिचा पुन्हा प्रादुर्भाव होतो म्हणुन कुठल्याही परिस्थितीत फरदड घेऊ नये. कापुस पिकाच्या चुरा करणारे श्रेडर यंत्राचा वापर करावा व कापूस पिकाच्या अवशेषांचा चुरा गोळा करुन सेंद्रीय खतांमध्ये रुपांतरीत करावा. पीक काढणीनंतर खोल नांगरणी करुन जमिन उन्हात तापू द्यावी. पीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटया, व्यवस्थीत न उघडलेली किडग्रस्त बोंडे व पाला पाचोळा नष्ट करुन शेत स्वच्छ ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.********