मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


            बीड, दि. 31 :- जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघ शहराचे नगरपरिषद हद्दीतील व ग्रामीण विभागातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होणार असून मतदान प्रक्रिया व मतमोजणी संबंधाने शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व अबकारी विभागाच्या सर्व देशी दारु, विदेशी दारु, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, सीएल-2 सीएल-3, बियर शॉपी, ताडी आदी अनुज्ञप्ती दि. 2 फेब्रुवारी 2017 मतदानाच्या पूर्वीचा दिवस, दि. 3 फेब्रुवारी मतदानाचा दिवस मतदानाची प्रक्रीया संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

            बीड व बीड तालुक्यातील नवगण राजुरी, पिंपळनेर, चौसाळा, नेकनूर, मांजरसुंबा, पेडगांव, नाळवंडी  या ग्रामपंचायत हद्दीत. पाटोदा व पाटोदा तालुक्यातील थेरला, अमळनेर या ग्रामपंचायत हद्दीतील. आष्टी व आष्टी तालुक्यातील कडा, धामनगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा या ग्रामपंचायत हद्दीतील. गेवराई व गेवराई तालुक्यातील धोनराई, रेवकी, उमापूर, तलवडा, चकलंबा, जातेगांव, शिरसदेवी, मादळमोही, पाचेगांव या ग्रामपंचायत हद्दीतील. शिरुर व शिरुर तालुक्यातील रायमोहा, तितरवणी, चिंचवण या ग्रामपंचायत हद्दीतील. अंबाजोगाई व अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव, बर्दापूर, पाटोदा (ममदापूर) या ग्रामपंचायत हद्दीतील. माजलगाव व माजलगाव तालुक्यातील गंगामसला, दिंद्रुड,नित्रूड, तालखेड, किट्टीआडगाव या ग्रामपंचायत हद्दीतील. केज व केज तालुक्यातील विडा, युसूफवडगाव,होळ, बनसारोळा, नांदूरघाट या ग्रामपंचायत हद्दीतील. धारुर व धारुर तालुक्यातील मोहखेड, तेलगांव या ग्रामपंचायत हद्दीतील. परळी व परळी तालुक्यातील सिरसाळा, नागापुर, धर्मापूरी, पिंपळगाव गाढे या ग्रामपंचायत हद्दीतील अनुज्ञप्ती धारकाने वरील दिनांकास अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे. 

जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


            बीड, दि. 31 :- जिल्ह्यातील शिक्षक मतदार संघ शहराचे नगरपरिषद हद्दीतील व ग्रामीण विभागातील ग्रामपंचायत हद्दीतील मतदान होणार असून मतदान प्रक्रिया व मतमोजणी संबंधाने शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व अबकारी विभागाच्या सर्व देशी दारु, विदेशी दारु, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, सीएल-2 सीएल-3, बियर शॉपी, ताडी आदी अनुज्ञप्ती दि. 2 फेब्रुवारी 2017 मतदानाच्या पूर्वीचा दिवस, दि. 3 फेब्रुवारी मतदानाचा दिवस मतदानाची प्रक्रीया संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

            बीड व बीड तालुक्यातील नवगण राजुरी, पिंपळनेर, चौसाळा, नेकनूर, मांजरसुंबा, पेडगांव, नाळवंडी  या ग्रामपंचायत हद्दीत. पाटोदा व पाटोदा तालुक्यातील थेरला, अमळनेर या ग्रामपंचायत हद्दीतील. आष्टी व आष्टी तालुक्यातील कडा, धामनगाव, पिंपळा, टाकळसिंग, धानोरा या ग्रामपंचायत हद्दीतील. गेवराई व गेवराई तालुक्यातील धोनराई, रेवकी, उमापूर, तलवडा, चकलंबा, जातेगांव, शिरसदेवी, मादळमोही, पाचेगांव या ग्रामपंचायत हद्दीतील. शिरुर व शिरुर तालुक्यातील रायमोहा, तितरवणी, चिंचवण या ग्रामपंचायत हद्दीतील. अंबाजोगाई व अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव, बर्दापूर, पाटोदा (ममदापूर) या ग्रामपंचायत हद्दीतील. माजलगाव व माजलगाव तालुक्यातील गंगामसला, दिंद्रुड,नित्रूड, तालखेड, किट्टीआडगाव या ग्रामपंचायत हद्दीतील. केज व केज तालुक्यातील विडा, युसूफवडगाव,होळ, बनसारोळा, नांदूरघाट या ग्रामपंचायत हद्दीतील. धारुर व धारुर तालुक्यातील मोहखेड, तेलगांव या ग्रामपंचायत हद्दीतील. परळी व परळी तालुक्यातील सिरसाळा, नागापुर, धर्मापूरी, पिंपळगाव गाढे या ग्रामपंचायत हद्दीतील अनुज्ञप्ती धारकाने वरील दिनांकास अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे. 

महात्मा गांधी यांची पुण्यतिथी कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा



बीड, दि. 31 :- महात्मा गांधी यांची 30 जानेवारी रोजी पुण्यतिथी असून ती देशभरात व राज्यामध्ये साजरी करण्यात येते. महात्मा गांधीनी त्यांच्या हयातीत पुर्ण न झालेले एकमेव स्वप्न म्हणजे कुष्ठ रोगाचे समुळ उच्चाटन हे आहे यामुळे त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस संपुर्ण देशभरात "कुष्ठरोग निवारण दिन" म्हणून पाळण्यात येतो.

सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), बीड यांच्या कार्यालयात महात्मा गांधी यांची पुण्यतिथी त्यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्याबरोबरच दोन मिनिटे मौन पाळून साजरी करण्यात आली. यावेळी सहाय्यक संचालक डॉ.के.एस.आंधळे, एल.व्ही.शिंदे,सां.सहाय्यक सी.जी.जाधव, श्री.गोसावी अवैस, श्री.अलुप्तकर, श्री.खेडकर, श्री.मसणे, श्रीमती जे.एस.मस्के, श्री.ससाणे, श्री.केदार, श्री.गव्हाणे, श्री.काळे व कार्यालयातील इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

युवकांच्या सक्षमीकरणासाठी पुणे येथे शिबीराचे आयोजन



            बीड, दि. 31 :- महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी स्वतंत्र युवा धोरण जाहिर केले असून या अंतर्गत राज्यातील युवाकांमधील नेतृत्व गुणांचा व व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणण्याकरीता युवा नेतृत्व व व्यक्तिमत्वाचा विकास शिबीराचे आयोजन निश्चित केलेले आहे. युवकांच्या सक्षमीकरणाकरीता विविध विषयावरील 10 दिवशीय तीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम  प्रशिक्षण शिबीराचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य ,पुणे यांच्याकडून दि.4 ते 17 फेब्रुवारी, दि.19 ते 28 फेब्रुवारी आणि दि.8 ते 17 मार्च 20017 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे -45 , येथे करण्यात आले आहे.

            प्रत्येक शिबीराकरीता 5 मुले व 5 मुली बीड जिल्ह्यामार्फत निवड करून पाठविण्यात येणार असून शिबीरात सहभागी होण्याकरीता  वय  15 ते 35 वर्ष दरम्यान असावे, नेहरू युवा केंद्राकडे नेहरू युवा कर्मी (एनवायसी) राष्ट्रीय सेवा योजनेचे 2 कॅम्प पुर्ण केलेले विद्यार्थी युवक - युवती, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी युवक-युवती, एम.एस.डब्ल्यु, एम.ए.सायकॉलॉजी, एम.ए.सोशियोलॉजी व महाविद्यालयातील  शिक्षण घेत असलेले युवक -युवती, स्वयंसेवी संस्था, नोंदणीकृत युवा व हिला  मंडळे इत्यादीकडून सामाजिक कार्यात रस घेणारे व आवड असणारे युवक - युवती याप्रमाणे पात्रताधारक युवक-युवकांनी शिबीराचा लाभ घ्यावा. युवक व युवतींनी आपल्या सर्व शैक्षणिक व आवश्यक असलेल्या माहितीच्या प्रमाणपत्रासह अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे शुक्रवार दि.3 फेब्रुवारी 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत. असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या बीड जिल्ह्यातील निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांच्याकडून निवडणूकीचा आढावा





बीड, दि. 31 :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी राज्याचे आदिवासी विकास आयुक्त श्री.नरेंद्र पोयाम यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली असून श्री.पोयाम यांनी आज बीड येथील निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर आणि तहसीलदार छाया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राम यांनी बीड जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात 60 मतदान केंद्र असून एकुण 10 हजार 395 मतदार आहेत त्यामध्ये पुरुष मतदार 8 हजार 526 आणि महिला मतदार 1 हजार 869 आहेत. 3 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदान केंद्राची पूर्वतयारी झाली आहे. सर्व मतदान केंद्र सज्ज करण्यात आली असून जवळपास 60 मतदान केंद्रासाठी 256 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी तसेच 60 सुक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. सर्व मतदान साहित्य व मतपत्रिका प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत पुरेशा वेळेत पोहचविण्याचे नियोजन करण्यात आले असून साहित्य तालुक्याच्या ठिकाणाहून वाटप करण्यात येणार आहे.
राष्ट्रीयकृत बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्त केले गेले आहे. निवडणू प्रक्रीयेसंबंधी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुरेशा  प्रमाणात वाहने व मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येत असून पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात येणार आहे. मतदानासाठी 13 प्रकारच्या ओळखपत्रापैकी एक ओळखीचा पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. याबाबतही अधिकाऱ्यांना सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
निवडणूक निरीक्षक पोयाम यांनी निवडणूकीच्या तयारीचा संपूर्ण आढावा घेऊन निवडणूक प्रक्रीया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची सुचना केली.
मतदानाबाबत कार्यशाळा
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीसाठी बीड जिल्ह्यात नियुक्त केलेल्या 256 मतदान क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रीयेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बीड जिल्ह्यात निवडणूकीसाठी 11 झोन करण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ व साध्नसामुग्री देण्यात येत आहे.  मतदान प्रक्रीया सादरीकरणाद्वारे सांगण्यात आली. मतदान पेटी सील करण्यापासून मतदान केंद्राच्या ठिकाणी व्यवस्थेसंदर्भात उपयुक्त सुचना यावेळी करण्यात आली. शिक्षक मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ॲपवर प्रत्येक मतदान केंद्राची नियमित माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी अपलोड करावयाची आहे. यासंबंधी या कार्यशाळेत सविस्तर माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी निवडणूकीसंबंधी उपयुक्त मार्गदर्शन केले.

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

आचारसंहितेबाबतची तक्रार नोंदवण्यासाठी पथक प्रमुखांची नियुक्ती



बीड, दि. 30 :- राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून बीड तालुक्यातील जिल्हा परिषद विभागाचे एकुण आठ गट व पंचायत समिती निर्वाचक गण 16, गटाची व गणाची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तालुक्यामध्ये ज्ञानेश्वर मोकाटे (भ्र.9850056933), अनिल जोशी (भ्र.9421344872), शरद मोगरकर (भ्र.9860294500), बी.एम.खेडकर (भ्र.7385910844), यु.पी.बनसोडे (भ्र.9850184664), व्ही.बी.धोंगडे (भ्र.8625866780) यांची प्रथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तालुक्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होणे अपेक्षित आहे. बीड तालुक्यातील गट व गणामध्ये आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळुन आल्यास किंवा मतदारांना याबाबत काही तक्रारी नोंदवायची असल्यास पथकप्रमुखांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे बीडचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद  व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना मौन पाळून अभिवादन



बीड, दि. 30 :- हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी सोमवार दि.30 जानेवारी 2017 रोजी सकाळी   11 वाजता 2 मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, ना.गो. पुठ्ठेवाड, सय्यद कलीम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय कार्यालयातील  अधिकारी-कर्मचाऱ्यांनी 2 मिनिटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहीली.

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१७

शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी विशेष नैमित्तीक रजा




            बीड, दि. 27 :- शासन निर्णयान्वये महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदार संघाच्या निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजा व्यतिरिक्त असणार आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत राष्ट्रीय युवा दिन पंधरवाडा विविध कार्यक्रमाने साजरा



            बीड, दि. 27 :- जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स व प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत राष्ट्रीय युवा दिननिमित्ताने 12 ते 26 जानेवारी दरम्यान पंधरवाड्यात एचआयव्ही एड्स जनजागृतीपर पोस्टर प्रदर्शन, मानवी साखळी जनजागृतीपर रॅली,  रक्तदान शिबीर, पथनाट्य, आयईसी वाटप आदि विविध कार्यक्रम घेण्यात आले.

            महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत डापकु विभागात घेण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमात महाविद्यालयीन युवक-युवतींना एचआव्ही, एड्स, लैंगिक आजार, रक्तदारविषयी योग्य माहिती देवून त्यांच्यामार्फत इतरांना माहिती पोहचविण्याचे काम आरआरसी क्लब मार्फत करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयात आरआरसी क्लबच्या माध्यमातून एचआयव्ही, एड्स प्रतिबंध, काळजी व उपचाराविषयी योग्य माहिती देवून समाजात आजाराविषयी असलेली भिती घालवणे व समज, गैरसमजाविषयी माहिती देण्यासाठी युवकांची मदत घेणे हे उदिष्ट आहे. याप्रमाणे राष्ट्रीय युवा दिन पंधरवाडा साजरा करण्यात आला. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

पोलीस मुख्यालयात 30 जानेवारी रोजी निकामी साहित्याचा लिलाव




            बीड, दि. 27 :- जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील किट पेटी, पितळी बक्कल, पितळी मोठे बटन, लेदर बेल्ट, स्टिल शिटी, सायकलचे सुट्टे भाग, मेसचे साहित्य, निकामी झालेले तसेच अत्यल्प किंमतीच्या साहित्याचा लिलाव बीड येथील पोलीस मुख्यालयात करण्यात येणार आहे. लिलावाची प्रक्रिया पोलीस उपअधिक्षक (मु), बीड यांच्या नियंत्रणाखाली सोमवार दि.30 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. असे कार्यालय अधिक्षक यांनी कळविले आहे.

शिधापत्रिका धारकांना बीड तहसीलदारांची सुचना




            बीड, दि. 27 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी माहे जानेवारी 2017 मध्ये संप अनुसरला असून हा संप दि.1 ते 13 जानेवारी 2017 पर्यंत असल्याने जानेवारी महिन्याचे धान्य, रॉकेल, साखर कोठा उशीरा सुटलेला असून आदेशित कोठा स्वस्त धान्य दुकानदार यांना वितरीत करण्यात आला आहे. शिधापत्रिका धारकांनी संपर्क साधून माहे जानेवारी 2017 चे धान्य, रॉकेल, साखर हस्तगत करावी. असे तहसीलदार, बीड यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी 31 जानेवारीला रोजगार मेळावा



            बीड, दि. 27 :- सुशिक्षीत बेरोजगारांसाठी शासकीय नौकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प व खाजगी क्षेत्रातील आस्थापनेत रोजगाराच्या संधी तुलनेने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने औरंगाबाद येथील नवभारत फर्टिलायझर लिमिटेडमध्ये दहावी, बारावी, पदवी पास वय 19 ते 35 वर्ष वयाच्या पुरुष उमेदवारांना फिल्ड असिस्टंट पदाच्या 60 जागा व पीयाजो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बारामती जि.पुणे येथे 200 जागाकरीता  एसएससी, एचएससी, आयटीआय फिटर, पेंटर, वेल्डर, डिझेल मेकॅनिक कोर्स पास वय 18 ते 29 दरम्यान असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे मंगळवार दि.31 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड येथे आयोजन करण्यात आले आहे.

            मेळाव्यामध्ये कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहून पात्र अशा उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन इंट्रीपास घेवून मेळाव्यासाठी नाव नोंदणी केलेले ओळखपत्र व इंट्रीपाससह सर्व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मुळ व छायांकित प्रतीसह स्वखर्चाने जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जायकवाडी वसाहत, जुने विश्रामगृह,  नगर रोड, बीड येथे मंगळवार दि.31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे. पात्र बेरोजगार पुरुष उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीडचे सहाय्यक संचालक यांनी कळविले आहे.

गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

प्रजासत्ताक दिना निमित्त बीड येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ संपन्न









            बीड दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 67 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दि. 26 जानेवारी 2017 रोजी सकाळी ठिक 9.15 वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समांरभ बीड येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, परीविक्षाधीन पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पोलीस दलाच्या प्लाटूनसह विविध विभाग, शाळा आणि महाविद्यालयांचे परेड संचलन झाले.यामध्ये जिल्हा पोलीस दल, आर.सी.पी, महिला पोलीस, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिकी विद्यालय, स्काऊट-गाईड, पोलीस बँड आदि पथकांचा समावेश होता.
            यावेळी विशेष सेवा पदक प्राप्त बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड झाली असून यामध्ये राष्ट्रपती पदकासाठी निवड झालेले दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत चंद्रकांत उबाळे व पोलीस नियंत्रण कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल भानूदास मगरे आणि पोलीस मुख्यालयातील मोटार परिवहन विभागाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक कल्याण महादेव घोडके यांचा गौरव सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बीड जिल्ह्यातील स्काऊट यामध्ये द.बा. पब्लीक स्कुल गेवराईचा चि.अक्षय कैलास टकले, जातेगाव यमादेवी विद्यालयाचा चि.अजय संतोष चव्हाण, खारपांगरी येथील लोकमान्य टिळक विद्यालयाचा चि.सुंदर शुभम सुपेकर व चि.सय्यद असलम कासम, कु.अंजली गोरख खामकर, कु.माधुरी पांडुरंग खामकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच पोलीस उपअधिक्षक गणेश गावडे आणि सहाय्यक सरकारी वकील अजय तांदळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

            महिला गस्त पथक, अग्नीशमन पथक, सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत मिशन व जिल्हा रुग्णालयाच्या चित्ररथाचे संचलन झाले. पोलीस विभागाच्या जलद कृती दलाने यावेळी दहशतवाद्या विरुध्दच्या कारवाईचे सादरीकरण केले. विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.संगीता धसे, अनिल शेळके आणि गणेश धस यांनी केले. या कार्यक्रमास नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक,  प्राध्यापक व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवार, २५ जानेवारी, २०१७

प्रजासत्ताक दिना निमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड येथे ध्वजारोहण समांरभ





            बीड दि. 25:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 67 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दि. 26 जानेवारी 2017 रोजी सकाळी ठिक 9.15 वाजता राज्याच्या ग्रामविकास, महिला व बाल विकास मंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समांरभ जिल्हा पोलीस मुख्यालयाचे मैदान बीड येथे आयोजित केला आहे. या समारंभास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदान करावे - मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे






            बीड, दि. 25 :- लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक  नागरिकाने वापरला पाहिजे व आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी केले.
            राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ननावरे बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, विकास माने यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकशाहीच्या मजबुती करणासाठी मतदाराची भूमिका बजावतांना प्रत्येक मतदाराने आपली जबाबदारी ओळखावी असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी मतदानाचे महत्व स्पष्ट केले.
            मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करीत अप्पर जिल्हाधिकारी पवार यांनी मतदार नोंदणीच्या मोहिमेची माहिती दिली व मतदानासाठी मतदार युवक युवतींनी पुढाकार घेण्याची गरज प्रतिपादन केली.
            राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या चित्रकला, निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. नवमतदारांना यावेळी मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ देण्यात आली. मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी निऱ्हाळी यांनी दिली तर शेवटी वाघ यांनी सर्वांचे आभार मानले.
मतदार जागृतीसाठी रॅली
            जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रॅलीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅली मार्गस्थ केली. यावेळी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार छाया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

            मतदार जनजागृतीविषयक रॅलीस जिल्हाधिकारी परिसरातून सुरुवात करण्यात आली. ही रॅली शिवाजी चौक, बशीरगंज, माळीवेस, सुभाष रोड, साठे चौक, बसस्थानक ते शिवाजी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल होऊन समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये मतदारांना जागृत करण्यासाठी उघडा डोळे, निट कान स्वच्छ उमेदवाराला करा मतदान आणि तुमचं मत तुमचा आवाज, मतदार होण्याचा मला अभिमान आहे यासह विविध घोषणा देण्यात आल्या या घोषणांनी शहर परिसर दणाणून गेला. रॅलीमध्ये बीड येथील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्याथींनी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

सोमवार, २३ जानेवारी, २०१७

किमान पाच टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांना एकसमान चिन्ह



            बीड, दि. 23:- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्र निवडणूक चिन्ह (आरक्षण वाटप) (सुधारीत) आदेश दि.21 जानेवारी 2017 नूसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीमध्ये ज्या नोंदणीकृत राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या उमेदवारास मागील सार्वत्रिक निवडणूकीत एका विशिष्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकुण जागापैकी किमान पाच टक्के जागेवर किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकुण सदस्या संख्येच्या पाच टक्के जागा या एक पेक्षा कमी येत असतील तर किमान एका जागेवर निवडून आले असतील तर त्या नोंदणीकृत राजकीय पक्षास सक्ष अधिकारी (जिल्हाधिकारी) यांच्याकडे आगामी निवडणूकीसाठी मुक्त चिन्हापैकी एक चिन्ह मागणीद्वारे आरक्षित करता येईल. परंतू मागील लगतच्या सार्वजनिक निवडणूकीत निवडून आलेल उमेदवार त्या राजकीय पक्षाचे त्या वेळेला पुरस्कृत केलेले उमेदवार असणे अनिवार्य राहील. केवळ आज रोजी पक्षाचे सदस्य आहेत म्हणून त्यांना पक्षातर्फे निवडून आल्याचे समजले जाणार नाही. याबाबत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिनांकापासून किमान तीन दिवस आधी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे अर्ज करणे अनिवार्य असेल अशी तरतूद झालेली आहे. याबाबतचा आदेश राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड येथे 26 जानेवारी रोजी पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहन



          बीड,दि.23 :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 वा वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दि.26 जानेवारी 2017 रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी  पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येणार असल्याची  माहिती निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली.

          जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन समारंभाच्या पूर्व तयारीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांना पूर्व तयारीबाबत सुचना देवून कामांचा आढावा घेतला. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.15 वाजता होणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांना मुख्य समारंभास उपस्थित राहता यावे यासाठी या दिवशी  सकाळी 8.30 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावासा वाटल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 वाजण्यापूर्वी किंवा 10 वाजेनंतर करावा अशा सुचना शासनाने दिल्या आहेत. असे सांगून सुर्यवंशी यांनी पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, गृहरक्षक दल, नगर परिषद, शिक्षण इत्यादी विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्वतयारी कामांविषयी विविध सुचना केल्या. या बैठकीस जिल्हा प्रकल्प / प्रशासन अधिकारी नगर पालीका प्रशासन सतिश शिवणे कृषी उपसंचालक बी.एम. गायकवाड, तहसिलदार श्रीमती छाया पवार यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

29 जानेवारी रोजी जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पाच वर्षाखालील सर्व बालकास पल्स पोलीओ लस देवून मोहिम यशस्वी करावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



            बीड, दि. 23:- जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम  दिनांक 29 जानेवारी  रोजी राबविण्यात येणार असून 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ डोस पाजून ही मोहिम यशस्वी करावी असे  आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा टास्क फोर्स पल्स पोलिओ समन्वय समिती बैठक, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक, जिल्हास्तरीय कुष्ठरोग निवारण समिती बैठक, नियामक मंडळ रुग्ण कल्याण समिती बैठक तसेच जिल्हा गुणवत्ता आश्वायन समितीची बैठक रुग्ण कल्याण समिती बैठक जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
            बैठकीत पुढे बोलतांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण डोस पाजण्यासाठी नियोजनबध्द व सुक्ष्म आराखडा तयार  करावा तसेच ही मोहिम जिल्हयात यशस्वपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दयावे. जिल्हयातील 0 ते 5 वयोगटातील बालकांची माहिती घेवून त्याप्रमाणात डोस मागणी करण्याची सुचना करुन जिल्हयात ग्रामीण भागात आवश्यक त्या ठिकाणी बुथची स्थापणा करावी व 29 तारखेस सर्व बुथवर पल्स पोलिओ लसीकरण डोस उपलब्ध करुन दयावे असे सांगुन लसीकरणापासून एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.  
            रविवार दि. 29 जानेवारी 2017 रोजी  पाच वर्षाखालील सर्व बालकांना व त्या दिवशी जन्मलेल्या बाळाससुध्दा पोलिओ लस पाजण्यासाठी  बीड शहरात व जिल्ह्यातील सर्व भागांत बुथची  व्यवस्था करण्यात येणार असून बाळ, बालक आजारी असले तरीही पोलिओचा डोस देणे आवश्यक आहे. यासाठी जवळच्या बुथवर लस पाजून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी केले आहे.
            तंबाखु सेवनामुळे आरोग्यावर घातक परिणाम होणार असल्याने नागरिकांना तंबाखु सेवनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांना त्याच्या दुष्परिणामाची माहिती करुन दिली पाहिजे. याविषयी नागरिकामध्ये जनजागृती होण्यासाठी  ग्रामिण व शहरी भागात जनजागृतीपर विविध उपक्रम हातीती घ्यावे. तसेच  शाळा महाविद्यालयामधून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, व्याख्याने यासारख्ये कार्यक्रम करण्यात यावे तसेच शासकीय कार्यालये सार्वजनिक ठिकाणी मोठे फ्लेक्स तयार करुन त्यावर तंबाखु सेवन केल्यास त्यामुळे होणारे घातक परिणाम तसेच शासकीय कार्यालय व परिसरात तंबाखु सेवन केल्यास करण्यात येणारी कायदेशीर कारवाईबाबतची माहिती दयावी, सर्व अधिकाऱ्यांनी कार्यालय व परिसरात तंबाखु खाणाऱ्याविरुध्द कारवाई करावी असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हास्तरीय कुष्ठरोग निवारण समिती बैठक, जिल्हा एकात्मिक कुटुंब कल्याण सोसायटीच्या नियामक व कार्यकारी मंडळाची बैठक तसेच जिल्हा गुणवत्ता आश्वायन समितीची बैठक रुग्ण कल्याण समिती बैठकीविषयी  माहिती जाणून घेवून सविस्तर आढावा व योग्य त्या सुचना केल्या.  

            या बैठकीस जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ कमलाकर आंधळे, डॉ. अमोल गायकवाड, डॉ.संजय कदम, डॉ.संजीवनी गव्हाणे, डॉ. घुबडेृ उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. सोळंके, अन्न व औषधी प्रशासन अधिकारी श्रीमती जाधवर डॉ. दबडगावकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पिंपळनेरच्या आश्रमशाळेतील अत्याचाराच्या प्रकरणी समाजकल्याणची कडक कारवाई



                   बीड, दि. 23 :-  सिंदफणा प्राथमिक आश्रमशाळा, पिंपळनेर ता.शिरुर जि.बीड या विभाभज आश्रमशाळेतील मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीबाबत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बीड यांनी सविस्तर चौकशी करुन अहवाल सादर केला आहे.
             दि.12 जानेवारी 2017 रोजी ॲड. श्रीमती वर्षा देशपांडे दलित महिला विकास मंडळ, सातारा यांनी प्राथमिक आश्रमशाळा सिंदफाणा ता.शिरुर (कासार) जि.बीड येथील मुलीवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत त्वरीत चौकशी करुन दोषीवर कारवाई व्हावी व आश्रमशाळेतील मुलींना सुरक्षितता मिळावी असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड कार्यालयास लेखी पत्र दिले होते.
             त्यानूसार दि.31 जानेवारी 2017 रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,बीड कार्यालयामार्फत शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, शिरुर (कासार) जि.बीड या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अस्मिता जावळे यांच्यामार्फत शाळेतील प्रवेशित मुलींची विषयांकित प्रकरणी विचारपूस करण्यात आली. मस्के डी.एन. हे मुलींना स्नान घालणे तसेच अत्याचार करत असल्याचे व के.व्ही.उनवणे हे शाळेत दारु पिऊन येत असल्याचे मुलींना सांगितले असे मुख्याध्यापिका श्रीमती जावळे यांनी लेखी दिल्यानूसार महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली,1981 मधील कलम 28 मधील तरतुदीस अनुसरुन नैतिक अध:पात या गैरवर्तणीकीमुळे मस्के डी.एन.सहशिक्षक यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्याविरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम 2012 मधील तरतुदीनूसार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा नोंदविणेबाबत कार्यवाही करावी तसेच उनवणे के.व्ही. सहशिक्षक यांच्याविरुध्द महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील कलम 30 नूसार कार्यवाही करणेबाबत संबंधित संस्थेस निर्देश देण्यात आले.

             त्यानूसार अध्यक्ष/सचिव, संग्राम सेवाभावी संस्था, पिंपळनेर ता.शिरुर (कासार) जि.बीड यांनी सहशिक्षक मस्के डी.एन. यांना दि.13 जानेवारी 2017 रोजी निलंबीत करुन त्याच्यांवर गु.र.नं.08/2017 अन्वये पोलीस स्टेशन शिरुर (कासार)  जि.बीड येथे गुन्हा नोंद केलेला आहे. तसेच के.व्ही.उनवणे सहशिक्षक यांची गैरवर्तणूक तसेच शिस्त व अपील विषयक तरतूदीनूसार तीन वर्षाकरीता वार्षिक वेतनवाढ रोखली आहे. सहशिक्षक डी.एन.मस्के यांना अटक करण्यात आली असून सद्यस्थितीत पोलीस विभागामार्फत चौकशी सुरु आहे. त्याचप्रमाणे सदर घटनेस संस्था प्रशासन जबाबदार असल्याने संग्राम सेवाभावी संस्था, पिंपळनेर  ता.शिरुर (कासार) जि.बीड संचलित प्राथमिक आश्रमशाळा प्राथमिक आश्रमशाळा सिंदफणा ता.शिरुर (कासार)जि.बीड या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास का सादर करण्यात येवू नये याबाबत संबंधित संस्थेच्या अध्यक्ष/सचिव यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. तसेच प्रवेशित मुलींच्या संरक्षणाच्या दृष्टीने अध्यक्ष/सचिव, संग्राम सेवाभावी संस्था, पिंपळनेर ता.शिरुर (कासार) जि.बीड यांनी श्रीमती अमिना गुलाब पठाण यांची कंत्राटी पध्दतीने तात्काळ नियुक्ती केलेली आहे. त्या दि.13 जानेवारी 2017 रोजी रुजु झाल्या असून कार्यरत आहेत. अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन




                    बीड, दि. 23 :-  जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी व उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,  कर्मचारी उपस्थित होते.

शनिवार, २१ जानेवारी, २०१७

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई भेसळीच्या संशयावरुन खाद्यतेलाचा साठा जप्त




            बीड, दि. 21 :- औरंगाबाद अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त सी.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जालनाचे अन्न सुरक्षा अधिकारी रा.मा.भरकड व श्रीमती सु.त्री.जाधवर यांनी दि.20 जानेवारी रोजी बीड येथील जुना मोंढ्यातील मे.वर्धमान फुड प्रोसेसस एलएलपी या खाद्यतेल रिपॅकींग करणाऱ्या आस्थापनेमधून रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल, रिफाईंड सोयाबीन ऑईल, रिफाईंड व्हेजिटेबल ऑईल, रिफाईंड कॉटनसीड ऑईल या तेलाचे अन्न नमुने तपासणीसाठी घेऊन भेसळीच्या संशयावरुन तेलाचा एकुण 18 लाख 27 हजार 493 रुपयांचा साठा अन्न सुरक्षा व मानेद कायद्याअंतर्गत जप्त केला आहे. पेढीकडे कायद्याअंतर्गत काही बाबींचे उल्लंघन आढळुन आले असून पेढीने चुकीचा डी 1 फार्म सादर केला आहे. तसेच खाद्यतेल खरेदी विक्रीबाबत व साठ्याबाबत रॅकार्ड उपलब्ध नसून पेढीकडे प्रयोगशाळा आढळुन आली नाही. असे बीडचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द




            बीड, दि. 21 :- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक-2017साठी प्रभागनिहाय मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दि.21 जानेवारी 2017 रोजी झाली असून ही मतदार यादी www.beed.nic.in या संकेतस्थळावर तसेच संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

जि.प. व प.स.निवडणूकीच्या कामकाजाचा घेतला आढावा निवडणुका शांततेत व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम




बीड, दि. 21 :- जिल्ह्यातील  जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणुक यंत्रणा  व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने व सजगपणे काम करावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.  
5- औरंगाबाद विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघ व जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली पुर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी उपस्थित सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
याबैठकीस पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, अपर पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, गणेश निऱ्हाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 यावेळी जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, 5- औरंगाबाद विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघ व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका शांततामय वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांत समन्वय गरजेचा आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था चोख असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी करावी व तेथील पोलीस बंदोबस्ताविषयी आराखडा तयार करावा. पोलीस विभागाने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घ्यावी. मागील काळातील घटनांची माहिती घेऊन अशा केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा.
  निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने पोलीस विभाग व उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्याची गरज आहे असे सांगुन संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या निवडणूक प्रक्रियेचे गांभीर्य ओळखून त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री राम यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक असणारे विविध समित्यांचा तसेच स्थिर तपासणी पथके व अचानक तपासणी करणारी पथके, मतदान यंत्र, अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, जनजागृती इत्यादी बाबीविषयी सविस्तर आढावा घेवून योग्य त्या सूचना केल्या. तसेच आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रेणेने अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. या निवडणूकीतील उमेदवारांना निवडणुक विषयक विविध परवाने घेण्यासाठी अनेक ठिकाणी जावे लागते हे टाळण्यासाठी व उमेदवारांना अवश्यक असणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करुन या कक्षामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या  नियुक्त्या करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री राम यांनी यावेळी दिल्या. यावेळी 5- औरंगाबाद विभाग विधान परिषद शिक्षक मतदार संघ व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक हे मतदान केंद्रांना भेटी देवून प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.  

 यावेळी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडुन करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, २० जानेवारी, २०१७

बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्रांना शिक्षणाधिकारी शशीकांत हिंगोणीकर यांची भेट



            बीड, दि. 20 :- राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, बीड अंतर्गत कार्यरत बीड मधील बार्शी नाका आणि इमामपुर रोडच्या बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजाची पाहणी शिक्षणाधिकारी (प्रा) शशीकांत हिंगोणीकर यांच्यासह प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी यांनी शुक्रवार दि.20 जानेवारी 2017 रोजी प्रत्यक्ष भेट देवून केली.

            श्री.हिंगोणीकर यांनी भेटी दरम्यान प्रशिक्षण केंद्रातील मुलांशी मुक्त संवाद साधून शिक्षण पुर्ण केल्यावर काय करणार असा प्रश्न मुला-मुलींना विचारुन त्यांची विविध क्षेत्रातील आवड जाणून घेतली. यावेळी केंद्रातील मुलांना योग्य मार्गदर्शन व पालकांचे प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याकरीता शनिवार दि.21 जानेवारी रोजी शिक्षणाधिकारी (प्रा.) शशीकांत हिंगोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये पालकसभा आयोजित करण्यात आली आहे. असे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक यांनी कळविले आहे.

जानेवारी महिन्याचे सुधारीत रॉकेल नियतन मंजूर



            बीड, दि. 20 :- माहे जानेवारी 2017 महिन्यासाठी 924 के.एल. केरोसीन नियतन प्राप्त झाले असून मंजूर नियतनापैकी 372 के.एल. उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पात्र घाऊक, अर्धघाऊक व तालुकानिहाय वाटप करण्यासाठी  सुधारीत 1296 के.एल. रॉकेल नियतन बीड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. रॉकेलच्या घाऊक विक्रेत्यांनी महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत 60 टक्के, 11 ते 17 तारखेपर्यंत 85 टक्के तर 18 ते 25 तारखेपर्यंत 100 टक्के रॉकेलची उचल करावी.  तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या रॉकेलचे नियतन याप्रमाणे.

            आष्टी-90 के.एल, पाटोदा-45, शिरुर-33, बीड-138, गेवराई-129, माजलगाव-87, वडवणी-60, धारुर-51, केज-96, अंबाजोगाई-99 तर परळी तालुक्यासाठी 96 के.एल. रॉकेलचे मासिक नियतन मंजूर करण्यात आले आहे.  सर्व विक्रेत्यांनी रॉकेल पुरवठा झाल्याचे दर्शनी भागात सूचना फलकावर ग्राहकांच्या माहितीसाठी लावावी.   त्याचबरोबर घाऊक अथवा अर्धघाऊक रॉकेल डिलर्स यांच्याकडून वितरण व्यवस्थेसंदर्भात गंभीर स्वरुपाचे दोष आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये कारवाई करावी.  त्याचबरोबर तहसिलच्या पुरवठा विभागाने दुकानांना अचानक भेटी देऊन रॉकेल पुरवठ्याबाबत खात्री करावी.  तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे. 

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन


            बीड, दि. 20 :- सुशिक्षीत बेरोजगारांसाठी शासकीय नौकऱ्यांचे प्रमाण अत्यल्प व खाजगी क्षेत्रातील आस्थापनेत रोजगाराच्या संधी तुलनेने मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने औरंगाबाद येथील नवभारत फर्टिलायझर लिमिटेडमध्ये दहावी पास व वय 18 ते 30 वर्षाच्या आतील पुरुष उमेदवारांना फिल्ड असिस्टंट पदाच्या 60 जागा व एमपीटीए एज्युकेशन एलटीई पुणे 200 जागा आणि एल ॲण्ड टी फायनान्सियल सर्विसेसमध्ये एसएससी, एचएससी, पदवीधर वय 18 ते 30 दरम्यान असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे मंगळवार दि.24 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड येथे आयोजन करण्यात आले आहे.

            मेळाव्यामध्ये कंपणीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहून पात्र अशा उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन इंट्रीपास घेवून मेळाव्यासाठी नाव नोंदणी केलेले ओळखपत्र व इंट्रीपाससह सर्व शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मुळ व छायांकित प्रतीसह स्वखर्चाने जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जायकवाडी वसाहत, जुने विश्रामगृह,  नगर रोड, बीड येथे दि.24 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे. पात्र बेरोजगार पुरुष उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे जिल्हा कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीडचे सहाय्यक संचालक यांनी कळविले आहे.

गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

फेब्रुवारीसाठी बीड जिल्ह्याला 6 हजार 70 क्विंटल साखर मंजूर



          बीड, दि.19 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एनसीडीईएक्स-ई मार्केटस् लिमिटेड मार्फत ई-लिलावाद्वारे बीड जिल्ह्यासाठी माहे फेब्रुवारी 2017 साठी 6 हजार 70 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर केलेले असून साखर वाहतूक पुरवठादार म्हणून गुरु गणेश ट्रेडिंग कंपनी, बीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            गुरु गणेश ट्रेडिंग कंपनी, बीड यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय धान्य गोदामात साखर  पुरवठा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माहे फेब्रुवारी 2017 साठी 6 हजार 70 क्विंटल मंजूर असलेले साखर नियतन जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे. बीड 1 हजार 80, गेवराई 965, माजलगाव 303, वडवणी(चिंचवण) 248, धारुर 370, अंबाजोगाई 445, केज 751, परळी वैजनाथ 620, पाटोदा 337, आष्टी 470, शिरुर कासार 381 क्विंटल याप्रमाणे तालुक्यांना साखर नियतन पोहोचविण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी,बीड यांनी कळविले आहे.

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पुर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी



            बीड, दि. 19 :- भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 14 ते 23 फेब्रुवारी 2017 या कालावधीत SSB कोर्स क्र. 40 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
            बीड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बीड येथे दि. 8 फेब्रुवारी 2017 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेजवरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची संकेतस्थळावर www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Chick List आणि महत्वाच्या ('Important Dates') यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊन लोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढुन ते पूर्ण भरुन सोबत आणावे.
            केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्ससाठी प्रवेश मिळण्याकरीता खालीलप्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे.

            कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एकझामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकडमी एकझापिनेशन (UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी 'C' सर्टिफिकेट 'A' किंवा 'B' ग्रेड मध्ये पास झालेला असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युयट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांना दूरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क साधावा. असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

विक्रीकर निरीक्षक पुर्व परीक्षेच्या केंद्र परिसरात 144 कलम लागू


            बीड, दि. 19 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक (पुर्व) परीक्षा 2016 ही रविवार दि.29 जानेवारी रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकुण 13 उपकेंद्रातून घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी 4 हजार 272 उमेदवार बसले असून  परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

            आयोगाच्या सुचनेनूसार परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर व अभ्यासाचे इतर साहित्य  परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही तसेच आयोगाच्या सुचनेप्रमाणे  परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहिल. उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,  पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर 10 वाजेपूर्वी उपस्थित रहावे. परीक्षा सुरु झाल्यानंतर केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही. असे बीडचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

बुधवार, १८ जानेवारी, २०१७

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील पर्यवेक्षकीय पदासाठी सरळसेवा भरती




            बीड, दि. 18 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वर्ग-3 पर्यवेक्षक पदांमधील रिक्त जागा सरळसेवा भरतीने भरावयाच्या आहेत. भरतीबाबतची सविस्तर जाहिरात www.msrtcexam.in असून www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची  प्रक्रीया दि.12 जानेवारी ते दि.3 फेब्रुवारी 2017 या कालावधीत सुरु राहील. या संधीचा इच्छुक व पात्र माजी सैनिकांनी लाभ घ्यावा. असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक



            बीड, दि. 18 :- माहे जानेवारी-फेब्रुवारी 2017 मध्ये होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करणेबाबत निर्देश दिले असून जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या 11 पंचायत समित्यांच्या निवडणूकीकरीता पुढील अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

            गेवराई जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादचे उपविभागीय अधिकारी शशीकांत हदगल तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गेवराईचे तहसिलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांची नेमनूक करण्यात आली आहे. माजलगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जालना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.इंगळे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माजलगावचे तहसिलदार नरसिंग झंपलवाड यांची नेमनूक करण्यात आली आहे.            वडवणी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वि.भु.स.अधिकारी श्रीमती शिल्पा करमरकर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वडवणीचे तहसिलदार सतीष थेटे यांची नेमनूक करण्यात आली आहे. बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विकास माने तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बीडच्या तहसिलदार श्रीमती छाया पवार यांची नेमनूक करण्यात आली आहे. शिरुर कासार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम.वासनिक तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिरुर कासारचे तहसिलदार आबासाहेब चौरे यांची नेमनूक करण्यात आली आहे. पाटोदा जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटोदाचे तहसिलदार मुकेश कांबळे यांची नेमनूक करण्यात आली आहे. आष्टी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनिल भोकरे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आष्टीचे तहसिलदार रामेश्वर गोरे यांची नेमनूक करण्यात आली आहे. केज जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लातुरचे जिल्हा उपनिबंधक एस.बी. खरे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धारुरचे तहसिलदार राजाभाऊ कदम यांची नेमनूक करण्यात आली आहे. परळी वैजनाथ जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बीडचे उपनिबंधक अमर शिंदे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परळीचे तहसिलदार विद्याचरण कवडकर यांची नेमनूक करण्यात आली आहे. अंबाजोगाई जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अंबाजोगाईचे तहसिलदार शरद झाडगे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची नेमनूक करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी बीड यांची आदेशात नमुद केले आहे.

मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

कमळापूर जिल्हा औरंगाबाद येथून रामदास सानप हरवला आहे


           

            बीड, दि. 17 :- रामदास ज्ञानदेव सानप 16 वर्षे वयाचा मुलगा रा. कमळापूर, रामप्रसाद शिंदे यांचा वाडा, माऊली नगर ता.गंगापूर जि.औरंगाबाद यास दि.3 सप्टेंबर 2015 रोजी कमळापूर फाटा येथून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. मुलाचे वर्णन उंची 4.8 फुट, रंग गोरा, केस बारीक काळे, चेहरा लांबट, भाषा मराठी व हिंदी, चॉकलेटी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट असे आहे. तरी या वर्णाचा मुलगा दिसून आल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड दुरध्वनी क्र.02442-231933 आणि पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही.गित्ते एएचटीयु, बीड यांच्याशी संपर्क साधावा. असे  पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दिपाली गित्ते यांनी कळविले आहे.

निवडणूक आचारसंहिता कालावधीत शस्त्रात्रे जमा करण्याचे आदेश



बीड, दि. 17 :- राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील 25 जिल्हा‍ परिषद व त्याअंतर्गत 283 पंचायत समिती निवडणूकांचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे. आणि त्याबाबतची आचारसंहिता निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत झाल्यापासून लागु झालेली आहे. निवडणूका शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्याबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.
निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती  कार्यवाही करण्याबाबत भाग-पाच, पोलीस विभागाशी संबंधित मुद्दा क्र.01 अन्वये निवडणूका जाहिर झाल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबत सूचना आहेत.

बीड जिल्हा परिषद व पंचायत समितीत्यांच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे (बँका/महत्वाची कार्यालय/संस्था/विद्युत केंद्र व इतर महत्वाचे कार्यालयाचे शस्त्र परवान्यावरील शस्त्र वगळून) निवडणूक प्रक्रिया शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जमा करणे आवश्यक असल्याने आचारसंहिता कालावधीसाठी जमा करण्याची कार्यवाही पोलीस अधिक्षक, बीड यांनी तात्काळ करावी. तसेच आचारसंहिता कालावधी संपल्यानंतर संबंधितांना त्यांची शस्त्रे परत देण्याची कार्यवाही करावी. असे जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

पोस्टल, सॉर्टींग असिस्टंट पदाच्या भरतीसाठी 29 जानेवारीला चाचणी पुर्नपरीक्षा



            बीड, दि. 17 :- ज्या उमेदवारांनी पोस्टल असिस्टंट, सॉर्टीग असिस्टंट या पदाची टायपिंग व डाटा एंन्ट्री परीक्षा दिली होती त्यांच्यासाठी पुन्हा टायपिंग व डाटा एन्ट्री चाचणी रविवार दि.29 जानेवारी 2017 रोजी नवी मुंबई मधील विविध केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.
            केंद्र कोड अ भारती विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था सेक्टर-7 बेलपाडा, खारघर रेल्वे स्टेशन जवळ, नवी मुंबई येथे सकाळी 9 ते 5.30 या वेळेत एकुण 5 बॅचेसमध्ये घेण्यात येईल. केंद्र कोड ब पिल्लाईज माहिती व तकनीकी विद्यालय, सेक्टर16 नवीन पनवेल, नवी मुंबई येथे सकाळी 9 ते 5.30 या वेळेत एकुण 5 बॅचेसमध्ये घेण्यात येईल. केंद्र कोड क एम.जी.एम. तकनीकी विद्यालय, एक्सप्रेस वे जवळ कामोठे, नवी मुंबई येथे सकाळी 9 ते 5.30 या वेळेत एकुण 5 बॅचेसमध्ये घेण्यात येईल.

            पात्र परीक्षार्थींनी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी www.pasadreexam2017.in या संकेतस्थळाचा वापर करावा. परीक्षार्थींना सरावाकरीता cbtdemo.quizky.net या लिंकवर प्रश्न सरावसंच दि.23 ते 25 जानेवारी 2017 या कालावधीत उपलब्ध असेल. असे डी.जी.चासकर, सहाय्यक निदेशक (भर्ती), चिफ पोस्टमास्तर जनरल, (दुरध्वनी 022-22621056) महाराष्ट्र सर्कल, मुंबई-400001 यांनी कळविले आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरच्या परवानगीची कार्यवाही




            बीड, दि. 17 :- मा.राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भिय आदेशान्वये माहे जानेवारी, फेब्रुवारी 2017 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या कार्यक्रमाची अधिसुचना प्रसिध्द झाली असून निवडणूकीच्या कालावधीमध्ये निवडणूक क्षेत्रामध्ये हेलिकॉप्टर उतरविणे तसेच उडान करण्यासाठी परवानगीची सर्व कार्यवाही संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 यांनी त्यांच्या हद्दीपावेतो करावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

सोमवार, १६ जानेवारी, २०१७

17 जानेवारी रोजी राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी बैठकीचे आयोजन




            बीड, दि. 16 :- बीड तालुक्यातील घेण्यात येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद, बीड सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी मा.राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवार दि.17 जानेवारी 2017 रोजी सायंकाळी 5 वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नगर रोड, बीड येथील सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. असे तहसीलदार, बीड यांनी कळविले आहे.

जानेवारी महिन्याचे रॉकेल नियतन मंजूर



            बीड, दि. 16 :- माहे जानेवारी 2017 महिन्यासाठीचे जिल्ह्यातील पात्र घाऊक, अर्धघाऊक व तालुकानिहाय वाटप करण्यासाठी  उर्वरीत 40 टक्के म्हणजेच 780 के.एल. नियतन बीड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. रॉकेलच्या घाऊक विक्रेत्यांनी महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत 60 टक्के, 11 ते 17 तारखेपर्यंत 85 टक्के तर 18 ते 25 तारखेपर्यंत 100 टक्के रॉकेलची उचल करावी.  तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या रॉकेलचे नियतन याप्रमाणे.

            आष्टी-63 के.एल, पाटोदा-27, शिरुर-33, बीड-162, गेवराई-111, माजलगाव-75, वडवणी-36, धारुर-42, केज-78, अंबाजोगाई-81 तर परळी तालुक्यासाठी 72 के.एल. रॉकेलचे मासिक नियतन मंजूर करण्यात आले आहे.  सर्व विक्रेत्यांनी रॉकेल पुरवठा झाल्याचे दर्शनी भागात सूचना फलकावर ग्राहकांच्या माहितीसाठी लावावी.   त्याचबरोबर घाऊक अथवा अर्धघाऊक रॉकेल डिलर्स यांच्याकडून वितरण व्यवस्थेसंदर्भात गंभीर स्वरुपाचे दोष आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये कारवाई करावी.  त्याचबरोबर तहसिलच्या पुरवठा विभागाने दुकानांना अचानक भेटी देऊन रॉकेल पुरवठ्याबाबत खात्री करावी.  तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे. 

ई-पोस मशीनमुळे धान्य वाटपात पारदर्शकता - जिल्हाधिकारी नवल किशोर राम






          बीड दि. 16 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ई-पोस मशीनद्वारे जिल्हयात धान्य वाटपास सुरुवात होत आहे. या प्रणालीमुळे धान्यवाटपात पारदर्शकता येऊन लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेत मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
          बीड तालुक्यातील कुमशी येथील  रास्तभाव दुकानात ई-पोस मशीनद्वारे धान्य वाटप वितरण शुभारंभ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी  ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी विकास माने, सहाय्यक पुरवठा अधिकारी  अविनाश शिंगटे,  तहसिलदार छाया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
           यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, ई-पोस मशीन हे अद्ययावत तंत्रज्ञान सार्वजनिक वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असल्याने याबाबतचे योग्य प्रशिक्षण सर्व रास्तभाव दुकानदारांना मिळणे आवश्यक आहे. या मशीनद्वारे धान्य वाटप होणार असल्याने धान्य वाटपात पारदर्शकता येऊन गैरव्यवहाराला आळा बसणार  आहे. तसेच ग्राहकाने आपल्या हक्काबाबत जागृत राहिले पाहिजे व आपल्या मिळणाऱ्या योजनांचा लाभ वेळेवर घेतला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी  सांगितले.
          जिल्ह्यातील  नागरिकांना जवळपास लोकांना आधार क्रमांक मिळाला असून आधार सिडींगचे कामही मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्यामुळे ई-पोस मशीनद्वारे धान्य वाटप सुरु झाल्याने लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.  पुरवठा विभाग ई-पोस मशीनद्वारे धान्य वाटप सुरु करुन खऱ्या खुऱ्या लाभार्थ्यांपर्यंत जात आहे व त्यामुळे पारदर्शकपणे धान्य पुरवठा होऊन पुरवठा विभागाची प्रतिमा बदलण्यास मदत होणार आहे असे सांगुन  सर्वसामान्य लाभार्थी महिला व पुरुषांनी ई-पोस मशीनचा वापर करुन आपल्या हक्काचे धान्य घ्यावे, असे आवाहनही  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी केले.
          यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत म्हणाले की,  पुरवठा विभागाने अत्यंत परिश्रम घेऊन जिल्हयातील  लाभार्थ्यांचे आधार क्रमांक सिडींगचे काम केलेले असून  ज्या लाभार्थ्यांचे अधार क्रमांक सिडींग करण्याचे राहिले आहे अशा लाभार्थ्यांनी तात्काळ आधार कार्ड सिडींगचे काम करुन घ्यावे. त्यामुळे यापुढील कालावधीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सर्व रास्तभाव दुकानांतुन ई-पोस मशीनद्वारे धान्य वाटप होणार असल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          प्रारंभी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ई-पोस मशीनची फित कापून धान्य वाटपाचा शुभारंभ केला व प्रातिनिधीक स्वरुपात त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले. या कार्यक्रमास नायब तहसिलदार (पुरवठा) परवीण पठाण, तांत्रिक अधिकारी प्रवीण सेंगर, धान्य दुकानदार आर. पी. ढोरमारे यांच्यासह पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी परिसरातील लाभार्थी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.