मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

मौखिक आरोग्य मासअंतर्गत जिल्हा रुग्णालयात मोफत पेस्ट व ब्रशचे वाटप


                        
          बीड, दि.7 :- राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमातर्गंत मौखिक आरोग्य मास दि.1 ते 30 नोव्हेबर 2017 या कालावधीत राबविण्यात येत असून इंडीयन डेंटल असोसीएशन शाखा बीड आणि जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णांची तपासणी करुन त्यांना टुथ पेस्ट व ब्रशचे वाटप जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
          कार्यक्रमामध्ये तोंडाची व दाताची निगा कशी ठेवावी तसेच दात घासण्याच्या विविध शास्त्रोक्त पध्दतीवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या नागरिकांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या मार्फत टुथपेस्ट व टुथ ब्रसचे वाटपही यावेळी करण्यात आले. तसेच हा कार्यक्रम विविध शाळेत आयोजित करुन विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी आणि मोफत टुथ पेस्ट आणि टुथ ब्रसचे वाटप करण्याचे नियोजित आहे. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पाटील, विभागप्रमुख डॉ.सत्येंद्र दबडगावकर, इंडियन डेंटल असोसीएशनचे डॉ. अशोक उनवणे, डॉ.राजीव खामकर, डॉ.शहादेव जगताप यांच्यासह रुग्णालयातील डॉ.सुजाता नरवणे, डॉ.अमोल बनसोडे आदि उपस्थित होते. असे जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा