मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०१७

रमाई आवास घरकुल योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत


          बीड, दि.7 :-जिल्ह्यातील ग्रामीण भागाकरीता 4 हजार आणि शहरी भागासाठी 800 प्रमाणे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करावेत.
          ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह संबंधित ग्रामसेवकामार्फत पंचायत समितीमध्ये प्रस्ताव सादर करावेत व पंचायत समितीमार्फत सदरील प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये सादर करण्यात येतील. शहरी भागातील लाभार्थ्यांनी प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये सादर करावेत त्यांनतर हे प्रस्ताव मंजूरीकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे सादर करण्यात येतील.
          प्रस्तावासोबत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी ग्रामसभा ठराव, जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, ओळखपत्र, पीटीआर सातबारा किंवा आठ अ, उत्पन्न प्रमाणपत्र, ग्रामसेवकांनी दिलेले लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र व कच्चे घर अथवा बेघर असल्याचे प्रमाणपत्र, जॉबकार्ड, बँक पासबूक झेरॉक्स तर शहरी भागातील लाभार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, ओळखपत्र, दारिद्ररेषेखालील कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, 100 रुपयाच्या बाँन्डवर लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, पीटीआर, पीआर कार्ड आदि कागदपत्रे सादर करावी. गरजू व पात्र ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी ग्रामसेवकास संपर्क साधून प्रस्ताव सादर करावेत तसेच शहरी भागातील लाभार्थ्यांनी संबंधित नगरपरिषद,  नगरपंचायतीमध्ये प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्याधिकारी व  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांनी केले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा