शुक्रवार, १३ जुलै, २०१८


बनकारंजा येथे उभारण्यात येणारे शहिद जवानाचे स्मारक
जिल्हयातील नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणार
                   --जिल्हाधिकारी एम.डी. सिंह
          बीड,दि,13:- शहीद जवान कॉन्स्टेबल सुभाष रंगनाथराव नागरगोजे यांचे स्मारक बनकारंजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात  उभारण्यात येणार असून हे स्मारक जिल्ह्यातील नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणार. तसेच महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्मारकासाठी एक दिवसाचे वेतन 6 लाख 14 हजाराचा निधी देऊन सैनिकाप्रति असलेली आदराची भावना निधीच्या माध्यमातून दाखवून दिली  आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एमडी सिंह यांनी केले.
           जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवान यांचे स्मारक उभारण्यासाठी संकलन केलेला निधी वितरणाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे,  सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट आलोक कुमार,  निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश नि-हाळी, विकास माने, केज तहसीलदार अविनाश कांबळे, शहिद जवानाचे बंधू नवनाथ नागरगोजे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
                  पुढे बोलतांना  एम. डी. सिंह म्हणले की शहीद जवान कॉ. सुभाष नागरगोजे यांचे स्मारक उभारण्यासाठी केज तालुक्यातील बनकारंजा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात जागा निश्चित केली असून हे स्मारक जिल्हयातील नागरिकांना व पुढील पिढींसाठी मार्गदशर्दक ठरणार आहे. स्मारक उभारणीसाठी महसूल विभागातील अधिकारी/कर्मचा-यांनी आपले एक दिवसाचे वेतन देवून अंत्यत कमी वेळात 6 लक्ष 14 हजाराचा निधी जमा करुन  एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे, बनकारंजा येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी समिती नेमण्यात आली आहे, या समितीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे स्मारक उभारण्याचे काम होणार असून  या  स्मारकाचे काम 21 आक्टोबंर 2018 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्यचे श्री सिंह यांनी यावेळी सांगितले.
               यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे म्हणाले की, शहीद जवान कॉन्स्टेबल सुभाष रंगनाथराव नागरगोजे यांनी देशासाठी आपले बलीदान दिले असून त्यांचे स्मारक हे शाळेतील विद्यार्थी, तरुणांना देशसेवेची नवी दिशा दाखविण्याचे काम करेल. यावेळी सी.आय.एस.एफचे डेप्युटी कमाडंन्ट अलोक कुमार आपल्या मनोगतात म्हणाले  बनकरंजा येथील स्मारक हे समाजातील सर्वच नागरिकांसाठी  प्रेरणास्त्रोत ठरेल,शहीद जवानाचे बलीदान हे नेहमीच पुढील पिढीला देशसेवेसाठी प्रवृत करत राहील. शहीद जवानाचे बंधू नवनाथ नागरगोजे यांनी आपल्या भावना  व्यक्त करतांना सांगितले माझे बंधू कान्स्टेबल सुभाष रंगनाथराव नागरगोजे हे देशाचे रक्षण करता करता शितलपूर वेस्ट बंगाल येथे चकमकीत शहीद झाले असे त्यांनी सांगितले.  
      यावेळी उपिस्थित मान्यवरांच्या हस्ते  महसूल विभागाकडून जमा झालेल्या 6 लक्ष 14 हजाराचा निधीचा धनादेश बनकरंजाचे सरपंच रवी मानिक नागरगोजे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. या कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारी/कर्मचारी, पत्रकार  तसेच बनकरंजा येथील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बुधवार, ११ जुलै, २०१८

पर्यटन व तीर्थस्थळी  जातांना पर्यटकांनी दक्षता घ्यावी
पर्यटन मंत्र्यानी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे केल्या  सूचना
            बीड,दि,11:-  जिल्हयातील कपीलधार आणि पाटोदा तालुक्यातील सौताडा हे पर्यंटकासाठी अवर्णीय आनंद देणारे  पर्यटन प तिर्थस्थळ  असून येथे दर्शनासाठी  भाविकांची व तेथील धब धबा पाहण्यासाठी पर्यटनप्रेमी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी जातांना पर्यटकांच्या जीवीतास कोणताही  धोका होऊ नये  यासाठी  पर्यटकांनी स्वत:ची काळजी,दक्षता घेतली पाहिजे त्याठिकाणी  असलेल्या व्यवस्थापक,पुजारी  किंवा या पर्यटन स्थळाचे काम पाहणा-या  जबाबदार व्यक्तींनी  पर्यटकांना धोक्या संदर्भात सूचना द्याव्यात, अशा सूचना राज्याचे रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी  नागपूर  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे पर्यटन,तिर्थस्थळाबाबत चर्चा करतांना दिल्या.  या व्हिडीओ कॉन्फरसिंगला जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, जिल्हा नियोजन अधिकारी बालाजी आगवाने,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. *******

शनिवार, ७ जुलै, २०१८


अनुसूचित जाती जमाती आयोगाचे विधी सदस्य
न्यायमुर्ती सी.एल.थूल यांच्या अध्यक्षतेखली आढावा बैठक संपन्न
                                               
            बीड,दि, 6:- अनुसूचित जाती जमाती आयोगाचे विधी सदस्य न्यायमुर्ती सी.एल.थूल यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1998 व सुधारित 2016 तसेच नागरी  हक्क संरक्षण कायद्यातंर्गत मागील 5 वर्षातील प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.
             या बैठकीस जिल्हाधिकारी एम.डी.सिंह,जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे,अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे,उपविभागीय अधिकारी विकास माने, महेंद्रकुामार कांबळे, गणेश नि-हाळी, जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय राख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर,श्रीमती भाग्यश्री नवटके,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्यासह संबधित अधिकारी  उपस्थित होते.
                 या आढावा बैठकीमध्ये  अनुसूचित जाती जमाती आयोग विधी सदस्य, न्यायमुर्ती सी.एल.थूल  यांनी  पोलीस अधीक्षक बीड यांनी अनुसूचित जाती जमाती  प्रतीबंध कायदा 1989 व सुधारित 2016 तसेच नागरी हक्क संरक्षण कायद्यातंर्गत मागील पाच वर्षातील प्रलंबित, तपासात प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित व निकाल लागलेल्या प्रकरणाची तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांनी या कायद्यातंर्गत पिडीतांना शासकीय आर्थिक मदत, जमिनी विषयक, पुर्नवसनाबाबत मागील पाच वर्षात केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती  संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून जाणून घेऊन संबधितांना योग्य त्या सूचना केल्या.
                    जिल्हयातील अनुसूचित जाती जमातीच्या नगरिकांवर होणा-या अत्याचारावर प्रतिबंध झाला पाहिजे. या प्रकरणातील गुन्हेगारांना वेळीच शिक्षा होण्यासाठी सर्व संबधित विभागाच्या अधिका-यांनी समन्वयाने काम केले पाहिजे. या समाजातील पिडीतांना न्याय मिळवून देण्यासाठी व गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा  होण्यासाठी अशी प्रकरणे स्पेशल कोर्ट किंवा फास्टट्रॅक  कोर्टाच्या  माध्यमातून निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून अनुसूचित जाती जमातीच्या मुलांच्या  बीड, गेवराई, आष्टी येथील शासकीय वसतीगृहासाठी जमिन तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही संबंधित विभागाच्या अधिका-यांनी करावी, असेही  न्यायामुर्ती श्री.थुल यांनी  यावेळी सांगितले.
             यावेळी जिल्हाधिकारी यांनी  जिल्हयातील अनुसूचित जाती जमातीच्या समाजातील नागरिकांवरील अत्याचार थांबविण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येणा-या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.    ********