बुधवार, ३० नोव्हेंबर, २०१६

1 ते 7 डिसेंबर सप्ताहाचे आयोजन जागतिक एड्स दिनी 1 डिसेंबरला बीड येथे जनजागृती रॅली


बीड दि. 30 :- जागतिक एड्स दिन म्हणून 1 डिसेंबर सर्वत्र पाळला जातो. या वर्षीचे घोषवाक्य ''होऊन सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध'' असे आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत जागतिक एड्स दिन व सप्ताह साजरा करण्यासाठी दि.1 ते 8 डिसेंबर 2016 या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि.1 डिसेंबर रोजी सकाळी ठिक 8 वाजता एड्स प्रतिबंधात्मक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रॅली शिवाजी पुतळ्यापासून सुरु होऊन कारंजा-बालभिम चौक-धोंडीपूरा-माळीवेस-सुभाष रोड-साठे चौक -शिवाजी पुतळा मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रॅलीचा समारोप होईल. रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी सहभाग नोंदवावा.
शुक्रवार दि.2 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता रांगोळी स्पर्धा, शनिवार दि.3 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता निबंध स्पर्धा, सोमवार दि.5 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता घोषवाक्य स्पर्धा या सर्व स्पर्धा एचआयव्ही व एड्स या विषयावर असून जिल्हा रुग्णालयातील धन्वंतरी सभागृह या ठिकाणी घेण्यात येतील. या स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे येणाऱ्या प्रथम तिन विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. बुधवार दि.7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता जिल्हा रुग्णालय येथे मेनबत्ती रॅलीचे आयोजन केले आहे. गुरुवार दि.8 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जागतिक एड्स दिन व सप्ताहाच्या स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येईल आणि कार्यक्रमाचा समारोप होईल.

शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनींनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी केले आहे. असे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती साधना गंगावणे यांनी कळविले आहे. 

एड्स प्रतिबंध : एकसंघ लढा

एड्स प्रतिबंध : एकसंघ लढा
                          - अनिल आलुरकर
                                                जिल्हा माहिती अधिकारी,बीड

    1 डिसेंबर हा दिवस संपुर्ण जगभर जागतिक एड्स नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो. 1 डिसेंबर पासून सर्वत्र एड्स नियंत्रण जनजागृतीसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानिमित्ताने हा लेख देण्यात येत आहे.

       अलिकडच्या काळात एका असाध्य आजाराने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. त्या भस्मासूराचे नाव आहे. एड्स ! आता हया नावाला न ओळखणारा व्यक्ती शोधुन जगात सापडणार नाही. इतकी एड्स बद्दल जनजागृती झाली आहे. तरीपण प्रतिबंधात्मक उपाय योजनांबद्दल जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी 1 डिसेंबर 2008 पासून जागतिक एड्स नियंत्रण दिन सप्ताह जगभर साजरा केला जात आहे.
          जागतिक आरोग्य संघटनेने सर्वप्रथम 1988 साली जागतिक एड्स नियंत्रण दिनाची घोषणा केली. त्यानंतर पुढे दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस संपूर्ण जगभर एड्स नियंत्रण दिन म्हणून आयोजित केला जातो.
          जागतिक एड्स कार्यक्रमात घोषित वचननाम्यानुसार सर्व राष्ट्रांनी आपल्या राष्ट्रीय एड्स कार्यक्रमांतर्गत जोमाने कार्य करावे, अशी ग्वाही दिल्यानंतर नवीनच तयार झालेल्या जागतिक सुकाणू समितीने विविध राष्ट्रांचे प्रमुख व प्रतिनिधी यांनी एड्स कार्यक्रमासाठी एकदिलाने काम करण्याचा केलेला करार हा एड्सच्या जागतिक साथीच्या नियंत्रणासाठी एक महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळे जगभर सर्वत्र एड्समुळे होत असलेल्या नुकसानीची तीव्रता जाणून तातडीने पावले उचलण्यासाठी प्रमाणिक, प्रभावी नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे संकेत दिले गेले. यापूर्वी विविध राष्ट्रांनी आपापल्या राष्ट्रामध्ये एड्स विरुध्द लढा हा केवळ राष्ट्रांचा नसून जागतिक लढा आहे व त्यासाठी जागतिक पातळीवर एकत्रित लढा उभारण्याची आवश्यकता आग्रहाने मांडली.
एड्स विरुध्द लढा
          आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेल्या घोषणापत्रात एड्स विषयी गैरसमजुती व भेदभाव दूर करणे व आरोग्यासाठी पायाभूत सोयींमध्ये वाढ करणे, एचआयव्ही/एड्स बाधित व्यक्तिंना आवश्यक सेवा, शुश्रूषा देणे इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव आहे. अनेक वेळा या वचननाम्यामध्ये वेळापत्रकानुसार कामाची आखणी केल्यामुळे हा वचननामा एक प्रभावी हत्यार असून एड्स विरुध्द लढयामध्ये सामिल झालेल्या समाजातील सर्व घटकांना त्याचा आधार मिळतो.
          एड्स विरुध्द लढयामध्ये हे घोषणापत्र पुन्हा-पुन्हा समाजातील सर्व घटकांच्या सहभागाबद्दल आग्रही आहे. राष्ट्रातील सरकारी, सामाजिक तसेच जागतिक संघटना, मजूर संघटना, धामिर्क गट, पत्रकार आणि सर्वात महत्वाचा गट म्हणजे एचआयव्ही/एड्स बाधित स्त्री-पुरुष या सर्वांनी एकदिलाने एकत्रितपणे काम करण्याचा ध्यास घेवून आपल्या वचनपूर्तीसाठी प्रामाणिकपणे काम करुन संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विशेष अधिवेशनात ठरविल्याप्रमाणे उद्दिष्टपूर्ती होईपर्यंत सतत कार्यरत रहावयाचे आहे. हा एड्स विरुध्द उद्दिष्टपूर्तीचा लढा केवळ राजकारणी नेत्यांचा नाही तर आपणा सर्वांचा आहे. या लढयामध्ये आपल्या सर्वांचे हे कर्तव्यच आहे. आम्हाला आशा आहे की, आपण सर्वजण वचन पाळाल. संयुक्त राष्ट्राचे महासचिव श्री. कोफी अन्नान यांनी एड्स साठी विशेष सभेत एड्स जगातील सर्वांचा शत्रु आहे व त्याच्या विरुध्द लढा हीच आपली सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे असे म्हंटले आहे.
एड्स कार्यक्रमाची कार्यप्रणाली
          एड्स कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट हे एड्स साथीच्या विरोधात सर्वांना प्रोत्साहित करुन दीर्घकाळापर्यंत लढा देत राहण्यासाठी प्रेरणा देणे हे आहे.
          सर्व सहभागी गटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करुन मदतीच्या कक्षा रुंदावण्याचे या कार्यक्रमाचे ध्येय आहे. जनजागृती करुन पूर्वीच्या ध्येय धोरणांची माहिती व वचनांची आठवण करुन देवून उद्दिष्टपूर्तीसाठी एड्स विरुध्द लढण्याचे यात आव्हान केले आहे. या वचनांसाठी राष्ट्रीय सरकारांना देखील आठवण करुन देवून जबाबदारीची जाणीव करुन देण्यात येत आहे.
कार्यक्रमाची उद्दीष्टे
       एचआयव्ही/एड्स विरुध्दच्या लढयात राष्ट्रीय सरकार व नेत्यांनी ठरविलेल्या धोरण, उदिष्टपूर्तीसाठी ते कार्यरत राहतील याची खात्री करुन देणे, एड्स विरुध्द कार्यक्रमांच्या परस्पर सहकार्याने स्थानिक प्रयत्नांची जागतिक प्रभावासाठी सांगड घालणे, एचआयव्ही/एड्स लढयासाठी आवश्यक असलेल्या सर्व सहाय्यक घटक उपलब्ध करुन देणे, एचआयव्ही/एड्स विरुध्द लढयासाठी समाजाचा प्रत्यक्ष सहभाग वाढवून त्याच्या कक्षा रुंदावणे व अधिक प्रबळ करणे. UNAIDS (युएनएड्स) हा जागतिक एड्स कार्यक्रमाचा प्रमुख तांत्रिक सल्लागार आहे. तथापि या कार्यक्रमात अनेक महत्वाचे घटक उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यरत आहेत. यामध्ये राष्ट्रीय / सामाजिक कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सहकारी संस्था व सरकारे, एड्सचे प्रचारक व कार्यकर्ते, राष्ट्रीय एड्स नियंत्रण / प्रतिबंध कार्यक्रम, एड्स संघटना व सामाजिक संघटना, अशासकीय ऐच्छिक कार्य संघटना, जागतिक सहकारी गट उदा. ग्लोबल युनियन्स एड्स कार्यक्रम व ग्लोबल मुव्हमेंट फॉर चिल्ड्रेंन, सर्वसाधारण जनता, एचआयव्ही / एड्स बाधित व्यक्ती व त्यांच्या संघटना, महत्वाच्या / प्रतिष्ठित व्यक्ती, मालक व मजूर, धामिर्क संघटना, आरोग्य कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी, पत्रकार, जीएफएटीएम दी ग्लोबल फंड टू फाईट एड्स टी.बी / मलेरिया आदि कार्यरत आहेत.
          यावर्षीचे घोषवाक्य "होऊन सारे एकसंघ, करुया एचआयव्हीचा प्रतिबंध"असे आहे. म्हणजे नवीन एचआयव्ही संसर्ग होऊ द्यायचा नाही, कलंक आणि भेदभाव शुन्यावर आणने व एडसने होणाऱ्या मृत्युचे प्रमाण शुन्यावर आणणे असे आहे.सर्वांच्या सक्रीय सहभागाने एचआयव्ही / एड्स विरुध्दचा लढा अधिक तीव्र करुन या जागतिक समस्येचे समुळ उच्चाटन करण्याचा आपला प्रयत्न राहावा. भावी काळात हया आजाराचा प्रसार होवू नये याची  दक्षता घेण्याची आज नितांत गरज आहे. ही गरज ओळखून सुज्ञ जनतेने लढ्यात सहभागी व्हावे हीच अपेक्षा.

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०१६

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 29 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.1 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता औरंगाबाद येथून परळी  निवासस्थान येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता वाहनाने वानटाकळी ता.परळी जि.बीड येथे आगमन व मुख्यमंत्री ग्रामीण रस्ता योजनेचे कामांच्या भुमीपुजनास उपस्थिती. दुपारी 12 वाजता वाहनाने परळी निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता परळी निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वाजता वाहनाने जे.के.गार्डन परळीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता आगमन व श्री.शिवाजी गुट्टे यांच्या कन्येच्या विवाहास उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता वाहनाने परळी निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता परळी येथून वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर




            बीड दि. 29 :-  शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, इतर लोकसेवा आयोग, कर्मचारी चयन आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरुन आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येवून उमेदवाराचे नुकसान होणार नाही.
            अंदाजित वेळापत्रक परीक्षेचे नाव, जाहिरात प्रसिध्दीचा दिनांक, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा,दिनांक पुढीलप्रमाणे आहेत. तांत्रिक सहायक परीक्षा-2016 ची जाहिरात आक्टोबर 2016 मध्ये प्रसिध्द झाली असून मुख्य परीक्षा रविवार 15 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. विक्रीकर निरीक्षक परीक्षा-2016 ची जाहिरात नोव्हेंबर 2016,पूर्व परीक्षा रविवार दिनांक 29 जानेवारी 2016 रोजी तर मुख्य परीक्षा रविवार दि. 28 मे 2016 रोजी. राज्य सेवा परीक्षा-2017 ची जाहिरात डिसेंबर 2016 मध्ये प्रसिध्द होणार असून पूर्व परीक्षा रविवार दि. 2 एप्रिल 2017 रोजी तर मुख्य परीक्षा शनिवार दि.16 सप्टेंबर, रविवार दि.17 सप्टेंबर व सोमवार दि.18 सप्टेंबर 2017 रोजी होणार आहे. पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 ची जाहिरात जानेवारी 2017,पूर्व परीक्षा रविवार 12 मार्च 2017, मुख्य परीक्षा रविवार 11 जून 2017.
  सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा-2017,जाहिरात जानेवारी 2017, पूर्व परीक्षा रविवार 30 एप्रिल 2017, मुख्य परीक्षा रविवार 6 ऑगस्ट 2017. लिपिक-टंकलेखक परीक्षा-2017, जाहिरात फेब्रुवारी 2017, पूर्व परीक्षा रविवार 14 मे 2017, मुख्य परीक्षा रविवार 3 सप्टेंबर 2017. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2017, जाहिरात फेब्रुवारी 2017, पूर्व परीक्षा रविवार 21 मे 2017, मुख्य परीक्षा रविवार 8 ऑक्टोबर 2017. दुय्यम निरीक्षक,राज्य् उत्पादन शुल्क, गट-क परीक्षा-2017, जाहिरात फेब्रुवारी 2017, पूर्व परीक्षा रविवार 2 जुलै 2017, मुख्य परीक्षा रविवार 15 ऑक्टोबर 2017. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा-2017, जाहिरात मार्च 2017, पूर्व परीक्षा रविवार 4 जून 2017, मुख्य परीक्षा रविवान 24 सप्टेंबर 2017. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2017 जाहिरात मार्च 2017, पूर्व परीक्षा रविवार 9 जुलै 2017. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2017 रविवार 26 नोव्हेंबर 2017. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2017 रविवार 26 नोव्हेंबर 2017. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2017 रविवार 17 डिसेंबर 2017. महाराष्ट्र विद्युत, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2017 रविवार 24 डिसेंबर 2017. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017, जाहिरात एप्रिल 2017, मुख्य परीक्षा रविवार 25 जून 2017. सहायक कक्ष अधिकारी,विक्रीकर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा-2017, जाहिरात एप्रिल 2017, पूर्व परीक्षा रविवार 16 जुलै 2017. पोलीस उप निरीक्षक मुख्य परीक्षा-2017 रविवार 5 नोव्हेंबर 2017. सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा-2017 रविवार 10 डिसेंबर 2017. विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा रविवार 7 जानेवारी 2018. कर सहायक परीक्षा-2017, जाहिरात एप्रिल 2017, पूर्व परीक्षा रविवार 20 ऑगस्ट 2017, मुख्य परीक्षा रविवार 31 डिसेंबर 2017. महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा-2017 जाहिरात एप्रिल 2017, पूर्व परीक्षा रविवार 30 जुलै 2017, मुख्य परीक्षा रविवार 17 डिसेंबर 2017. विक्रीकर निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017, जाहिरात सप्टेंबर 2017, मुख्य परीक्षा रविवार 5 नोव्हेंबर 2017. 
शासनाकडून संबंधित पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल. या गृहितकाच्या आधारे उपरोक्त अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित दिनांकास पदे विज्ञापित करणे व पुढील वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल असे सचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी कळविले आहे.

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०१६

जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयाचे क्रांतीनगर येथे स्थलांतर



बीड दि. 28 :- बीड येथील जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालय श्रीमती कमलबाई बाभूळगांवकर यांच्या श्रीराम नगरातील आशिर्वाद निवास येथे कार्यरत होते. या कार्यालयाचे स्थलांतर झाले असून नवीन पत्ता   ॲड.सुधाकरराव देशमुख यांची इमारत पहिला मजला, तहसील कार्यालयाच्या पाठीमागे, क्रांतीनगर, बीड असा आहे. असे बीडचे जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख डॉ. विजय वीर यांनी कळविले आहे.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०१६

नगर परिषद निवडणूक -2016 मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करण्याचे आवाहन




बीड दि. 26 :- बीड नगर परिषद निवडणूक-2016 चे मतदान दि.27 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 7 ते 5 या वेळेत होत असून बीड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात राहणाऱ्या काही मतदारांची नावे ग्रामीण व शहरी भागात दोन ठिकाणी आढळुन येत आहेत. त्यांनी शहरात नाव ठेवायचे आहे की ग्रामीण भागात याची खात्री करुन एकाच ठिकाणी नाव ठेवणे गरजेचे आहे. मतदारांनी आपले मतदान एकाच ठिकाणी करावे. जर एखाद्या मतदाराने शहरी भागात बीड नगर  परिषद सार्वत्रिक निवडणूकीत मतदान केल्यास व ग्रामीण भागात आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत दोन्ही ‍ठिकाणी दोन वेळेस मतदान केल्याचे आढळुन आल्यास निवडणूक अधिनियमान्वये त्यांच्या विरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. असे बीड निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती छाया पवार, प्रशांत खांडकेकर यांनी कळविले आहे.

नगर परिषद निवडणूक-2016 निवडणूक प्रक्रियेवर प्रशासनाची करडी नजर - जिल्हाधिकारी नवल किशोर राम




बीड दि. 26 :- नगर परिषद निवडणूका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. निवडणूकीसाठीच्या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेवर व्हिडीओ तसेच सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
नगर परिषद निवडणूकीच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज धारुर येथील तहसील कार्यालयात आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी धारुरचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजाभाऊ कदम, पोलीस उप अधिक्षक श्रीमती अंजुमआरा शेख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, नायब तहसीलदार सुहास हजारे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, गट विकास अधिकारी तथा आचारसंहिता पथक प्रमुख श्रीमती. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, निवडणूकीच्या कामामध्ये कोणीही प्रकारची दिरंगाई, हलगर्जीपणा करताना दिसून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यासह इतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच मतमोजणी केंद्रातील व्यवस्था व सुरक्षा कक्ष याबाबत विशेष दक्षता घ्यावी. मतमोजणी केंद्रामध्ये व्हिडीओ कॅमेरा आणि सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी आचारसंहिता पथक, निवडणूक खर्च, पोलीस बंदोबस्त, मतदान यंत्रे, व्हिडीयो चित्रीकरण, व्होटर स्लीप, भरारी पथक, वाहन व्यवस्था, निवडणूकीच्या कामाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
धारुर शहरात 8 प्रभाग असून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 17 आहे तर मतदानासाठी 21 मतदान केंद्रे आहेत. धारुर शहरामध्ये एकूण मतदार संख्या 15 हजार 933 असून यापैकी 7 हजार 548 स्त्री मतदार असून 8 हजार 385 पुरुष मतदार असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली. या बैठकीस निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेले झोनल ऑफीसर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीपुर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी धारुर येथील मतदान केंद्रे व मतमोजणी केद्राला भेट देऊन तेथील निवडणुकीच्या कामाबाबतच्या पुर्वतयारीची पाहणी केली.

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

डिसेंबरसाठी बीड जिल्ह्याला 6 हजार 74 क्विंटल साखर मंजूर



          बीड, दि.25 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एनसीडीईएक्स-ई मार्केटस् लिमिटेड मार्फत         ई-लिलावाद्वारे बीड जिल्ह्यासाठी माहे डिसेंबर 2016 साठी 6 हजार 74 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर केलेले असून साखर वाहतूक पुरवठादार म्हणून राज ट्रेडर्स, चौसाळा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            राज ट्रेडर्स, चौसाळा यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय धान्य गोदामात साखर  पुरवठा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माहे डिसेंबर 2016 साठी 6 हजार 74 क्विंटल मंजूर असलेले साखर नियतन जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात आले आहे. बीड 1 हजार 168, गेवराई 954, माजलगाव 300, वडवणी(चिंचवण) 246, धारुर 366, अंबाजोगाई 440, केज 743, परळी वैजनाथ 613, पाटोदा 334, आष्टी 532, शिरुर कासार 378 क्विंटल याप्रमाणे तालुक्यांना साखर नियतन पोहोचविण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगारांसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षणाचे आयोजन



            बीड, दि. 25 :- ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, बीड यांच्यावतीने दि. 2 ते 22 डिसेंबर 2016 या कालावधीत महिलांसाठी ड्रेस डिझायनिंग, दि.14 ते 19 डिसेंबर  या कालावधीत शेळी पालन प्रशिक्षण, 25 ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीत  ग्रामीण उद्योजकता विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. 
            प्रशिक्षणा दरम्यान उमेदवाराला योग्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास तसेच संबधित क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांकडून मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन वर्ष मार्गदर्शन, पाठपुरावा करण्यात येईल. प्रशिक्षणासाठी उमेदवार सुशिक्षित बेरोजगार असावा.  त्याचे शिक्षण सुरु नसावे. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असावे व ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.  उमेदवाराचे वय 18 ते 45 दरम्यान असावे. प्रशिक्षणार्थ्यास व्यवसाय करण्याची आवड असावी. तसेच या प्रशिक्षणासाठी कमाल 35 उमेदवारांची उपस्थिती आवश्यक आहे.

            या प्रशिक्षण वर्गाचे अर्ज विस्तार अधिकारी, तालुका पंचा समिती तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे उपलब्ध असून भरलेले अर्ज दि. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत सादर करावेत. असे बीडच्या स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एम.पी. वाघमारे यांनी कळविले आहे. 

डिसेंबरसाठी बीड जिल्ह्याला 6 हजार 74 क्विंटल साखर मंजूर



          बीड, दि.25 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एनसीडीईएक्स-ई मार्केटस् लिमिटेड मार्फत         ई-लिलावाद्वारे बीड जिल्ह्यासाठी माहे डिसेंबर 2016 साठी 6 हजार 74 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर केलेले असून साखर वाहतूक पुरवठादार म्हणून राज ट्रेडर्स, चौसाळा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            राज ट्रेडर्स, चौसाळा यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय धान्य गोदामात साखर  पुरवठा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माहे डिसेंबर 2016 साठी 6 हजार 74 क्विंटल मंजूर असलेले साखर नियतन जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात आले आहे. बीड 1 हजार 168, गेवराई 954, माजलगाव 300, वडवणी(चिंचवण) 246, धारुर 366, अंबाजोगाई 440, केज 743, परळी वैजनाथ 613, पाटोदा 334, आष्टी 532, शिरुर कासार 378 क्विंटल याप्रमाणे तालुक्यांना साखर नियतन पोहोचविण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिवस साजरा



            बीड, दि. 25 : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह उपस्थितीतांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले.

            यावेळी नायब तहसिलदार आर.जी. नवगीरे, श्री.मोराळे, शारदा दळवी, श्री.कलीम यांच्यासह कोषागार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

अंबाजोगाई नगर परिषद निवडणूक-2016 पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा




बीड दि. 24 :- अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणूकीच्या पुर्वतयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसिलदार शरद झाडके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामेश्वर झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगर परिषद निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व दक्ष राहून काम करावे. आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच निवडणक प्रक्रीयेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या.
 यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी आचारसंहिता, निवडणूक खर्च, वाहन व्यवस्था, मतदान यंत्र सुरक्षा कक्ष, साहित्य वाटप, भरारी पथक याबाबत सविस्तर आढावा घेतला व योग्य त्या सुचना केल्या.

बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी राम यांनी अंबाजोगाई शहरातील तीन मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

परळी नगर परिषद निवडणूक-2016 निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



बीड दि. 24 :- परळी नगर परिषदेची निवडणूक शांततेत व निर्भय वातारणामध्ये पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे दिवसापर्यंत दक्ष राहून करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
परळी नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद निवडणूकीच्या पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी परळी तहसिल कार्यालयात घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी परळीचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.बी.डी.बिक्कड, अपर पोलीस अधीक्षक श्रीहरी बालाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, निवडणूकीचे काम करतांना अत्यंत जागरुक राहून करावे निवडणूका शांततामय व निर्भय वातारणात पार पडतील अशी भावना मतदारांमध्ये निर्माण करण्यासाठी सकारात्मकपणे व समन्वयाने काम करावे. मतदारांना कोणी प्रलोभन दाखवित असेल किंवा त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी कोणीही चुकीचे काम करीत असल्याचे किंवा कामांमध्ये दिरंगाई करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्‍यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना यावेळी देऊन निवडणूकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत निवडणूक कामावर लक्ष ठेवण्याच्या सुचना झोनल अधिकाऱ्यांना दिल्या.
निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या झोनल अधिकाऱ्यांची निवडणूकीमध्ये मोठी जबाबदारी आहे. झोनल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेबाबत आढावा घ्यावा. मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच यासोबतच मतदान केंद्राच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाशी समन्वय ठेवावा अशा सुचनाही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केल्या.
निवडणूकीमध्ये काही मतदान केंद्रावर चार मतदान करावयाचे असल्याने अशा मतदान केंद्रावर जाऊन मतदाराचे प्रात्यक्षिक मतदारांना करुन दाखवावे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिपूर्ण प्रशिक्षण द्यावे असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले. मतदानापूर्वी व्होटर स्लीप शंभर टक्के वाटप कराव्यात. ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नाहीत अशा मतदारांची योग्य ती ओळख पटवून मतदान करु द्यावे असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले.
संवेदनशील मतदान केंद्रावर व्हिडीओ कॅमेराची व्यवस्था ठेवावी तसेच आवश्यकता भासल्यास सीसीटीव्ही कॅमेरेही बसवावेत आणि या संवेदनशील केंद्रावर योग्य तो पोलीस बंदोबस्त  ठेऊन विशेष दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी निवडणूक आचारसंहिता, खर्च, भरारी पथक, वाहन पथक, साहित्य पथक, मतदान यंत्र सुरक्षा कक्ष याबाबत सविस्तर आढावा घेतला व सुचना केल्या.
परळी नगर परिषद निवडणूकीमध्ये 16 प्रभागामधून 33 सदस्य व 1 नगराध्यक्ष निवडणून द्यावयाचे आहेत. यासाठी 83 मतदान केंद्रे आहेत. यापैकी काही मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे म्हणून तयार करण्यात आली आहेत. परळी शहरात एकुण 66,249 मतदार असून यापैकी 35564 पुरुष तर 30,695 स्त्री मतदार आहेत. तर 10 झोनल ऑफीसरच्या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली.
या बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी राम यांनी परळी शहरातील 4 मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.                                                     

जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द




बीड दि. 24 :- राज्य निवडणूक आयोगाच्या दि.18 ऑगस्ट 2016 च्या आदेशात नमुद केल्याप्रमाणे बीड जिल्हा परिषद निवडणूक विभागाची अंतिम प्रभाग रचना परिशिष्ट 11 (ब) अनुसूची आरक्षणासह व पंचायत समिती निर्वाचक गणाची अंतीम प्रभाग रचना परिशिष्ट 12 (ब) अनुसूची आरक्षणासह राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमानूसार दि.25 नोव्हेंबर 2016 रोजी असाधारण राजपत्रात, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (beed.nic) व जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद कार्यालय, तहसिल कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

शिधापत्रिका धारकाने योजनेचा लाभ सोडल्याने अभिनंदन




बीड दि. 24 :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना शासनामार्फत स्वस्त दरात अन्न-धान्य पुरवठा करण्यात येतो. शासन आदेशाप्रमाणे बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना गरज उत्पन्नवाढ झाली असत्यास योजनेचा लाभ सोडण्याचे अवाहन केल्याप्रमाणे बीड शहरातील स्वस्त धान्य दुकान क्र.7 अंत्योदय योजनेचे पात्र  लाभधारक गोरखनाथ दामोधर चिंचोलकर यांनी योजनेस प्रतिसाद देत आपले अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिका लाभ सोडून एपीएल शिधापत्रिकेत बदल करुन घेतला. तहसिलदार, बीड व नायब तहसिलदार (पुरवठा) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०१६

ध्वनीप्रदुषण नियमांची अंमलबजावणी तहसीलदारस्तरावर समित्या गठीत



बीड दि. 23 :- जनहित याचिका क्र. 173/2010 डॉ. महेश बेडेकर विरुध्द  महाराष्ट्र शासन व इतर या न्यायालयीन प्रकरणी ध्वनी प्रदुषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मा. उच्च न्यायालय यांनी दिनांक 10,11,12 व दि. 16 ऑगस्ट 2016 अन्वये आदेश पारीत केले आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या महसूल व  वन विभागाच्या उप सचिव यांच्या दिनांक 14 सप्टेंबर 2016 रोजीचा पत्रातील परिच्छेद क्र. क्र. 94 मधील मुद्दा क्र. 1,3,14,18,19,20,22 आणि 27 येथे दिलेल्या निर्देशानुसार संबंधित विभागाने सदर मुद्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत  निर्देश दिले आहेत. डॉ. महेश बेडेकर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर या न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे तंतोतंत व काटेकोरपणे पालन होण्यासाठी तसेच नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ध्वनी प्रदुषण विषयक स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीचे संबंधित नगर परिषद किंवा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हे सदस्य सचिव आहेत तर गट विकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक हे समितीचे सदस्य आहेत.

तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील या तपासणी समितीने ध्वनी प्रदुषण विषयक नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक सणापुर्वी लोकांकडून उभारण्यात येणाऱ्या मंडपांची नियमितरित्या तपासणी करावी. तसेच तपासणीच्या तारखा व गोषवारा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. मा. उच्च न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करुन ध्वनी प्रदुषण विषयक नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबत उचित कार्यवाही करावी. याबाबत परस्परांमध्ये समन्वय ठेऊन मा. उच्च न्यायालयाच्या अवमान होणार नाही याची दक्षता तसेच याबाबत वेळोवळी अहवाल सादर करावा असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

7 डिसेंबरला प्रकल्पग्रस्तांनी आपली बाजू मांडण्यासाठी हजर रहावे


                                           
बीड, दि. 23 :- मौजे कळसंबर, भंडारवाडी, हिवरापहाडी, बोरफडी, सोनपेठवाडी, सोमनाथवाडी, पिंपळवाडी, वडगाव क. वायभटवाडी, अंजनवती व बावी ता.जि.बीड येथील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील रिट याचिका क्र.942/2015 आयोध्या प्रकाश मुंडे विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणा संदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या यादीतील उपजिल्हाधिकारी (सामान्य), बीड यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीतील नावे असणाऱ्या व्यक्ती संदर्भात मुंबईचा धारणा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 चे कलम 8 अन्वये भंग झालेले खरेदी विक्री व्यवहारावर आधारीत नोंदविण्यात आलेले फेरफार आहेत. मंजूर करण्यात आलेले फेरफार बाबत महसूल संहिता 1966 वे कलम 257 अन्वये पुनरीक्षणाची कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी, बीड यांनी परवानगी दिलेली आहे. या फेरुाराशी हितसंबंधित व्यक्तींना सुनावणीची व कागदपत्रे सादर करुन आपले म्हणने मांडण्यासाठी संधी मिळावी म्हणून उपविभागीय अधिकारी, बीड यांनी नोटिसा दिलेल्या आहेत.

वरील गावातील नोंदविण्यात आलेल्या फेर फार बाबत कलम 257 च्या तरतुदीस अनुसरुन हिसंबंधितांना आपली बाजू मांडण्यास संधी मिळावी म्हणून संबंधितांनी स्वत: अथवा वकीलाद्वारे उपविभागीय कार्यालय, बीड येथे दि.7 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता हजर रहावे व आपली बाजू मांडावी. नोटीसा निर्गमित करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी उपविभागीय अधिकारी, बीड कार्यालयात सुचना फलकावर तसेच गावातील तलाठी सज्जावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही यादी कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असे बीडचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

नोव्हेंबर महिन्याचे रॉकेल नियतन मंजूर



            बीड, दि. 23 :- माहे नोव्हेंबर 2016 महिन्यासाठीचे जिल्ह्यातील पात्र घाऊक, अर्धघाऊक व तालुकानिहाय वाटप करण्यासाठी  उर्वरीत 40 टक्के म्हणजेच 768 के.एल. नियतन बीड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. रॉकेलच्या घाऊक विक्रेत्यांनी महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत 60 टक्के, 11 ते 17 तारखेपर्यंत 85 टक्के तर 18 ते 25 तारखेपर्यंत 100 टक्के रॉकेलची उचल करावी.  तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या रॉकेलचे नियतन याप्रमाणे.

            आष्टी-78 के.एल, पाटोदा-36, शिरुर-36, बीड-150, गेवराई-93, माजलगाव-81, वडवणी-33, धारुर-48, केज-66, अंबाजोगाई-81 तर परळी तालुक्यासाठी 66 के.एल. रॉकेलचे मासिक नियतन मंजूर करण्यात आले आहे.  सर्व विक्रेत्यांनी रॉकेल पुरवठा झाल्याचे दर्शनी भागात सूचना फलकावर ग्राहकांच्या माहितीसाठी लावावी. त्याचबरोबर घाऊक अथवा अर्धघाऊक रॉकेल डिलर्स यांच्याकडून वितरण व्यवस्थेसंदर्भात गंभीर स्वरुपाचे दोष आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये कारवाई करावी.  त्याचबरोबर तहसिलच्या पुरवठा विभागाने दुकानांना अचानक भेटी देऊन रॉकेल पुरवठ्याबाबत खात्री करावी.  तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे. 

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

गेवराई नगर परिषद निवडणूक-2016 निवडणूक कामाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा





बीड दि. 19 :- नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज गेवराई येथील निवडणूकीच्या पुर्वतयारीचा गेवराई येथे प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा औरंगाबाद येथील उपजिल्हाधिकारी तथा वनजमाबंदी अधिकारी श्रीमती शोभा ठाकूर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. आषिशकुमार बिरादार,  नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, पोलीस उप अधिक्षक राजकुमार चाफेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेवराई नगर परिषद इमारत येथील सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी गेवराई नगर परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अधिकारी -कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, इतर वेळी काम करताना झालेली चुक दुरुस्‍त करता येते परंतु निवडणुकीच्या कामामध्ये झालेली चूक दुरस्त करण्याची संधी मिळत नाही. निवडणूकीतील कामातील चूकीमुळे थेट कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे निवडणूकीचे काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. निवडणूकीच्या कामामध्ये कोणीही प्रकारची दिरंगाई, हलगर्जीपणा करताना दिसून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याने सर्वांनी जबाबदारीने काम करावे. तसेच गेवराई शहरातील  मतदान केंद्रांपैकी किमान  5 मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र (मॉडेल बुथ) म्हणून तयार करावीत असे जिल्हाधिकारी  नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितले.
 या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी आचारसंहिता पथक, निवडणूक खर्च, पोलीस बंदोबस्त, मतदान यंत्रे, व्हिडीयो चित्रीकरण, व्होटर स्लीप, भरारी पथक, वाहन व्यवस्था, निवडणूकीच्या कामाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
गेवराई शहरात 9 प्रभाग असून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 19 आहे तर मतदानासाठी 21 मतदान केंद्रे आहेत. गेवराई शहरामध्ये एकूण मतदार संख्या 23 हजार 397 असून यापैकी 11 हजार 327 स्त्री मतदार असून 12 हजार 69 पुरुष मतदार असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शोभा ठाकूर यांनी दिली. या बैठकीस निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेले झोनल ऑफीसर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीपुर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गेवराई  शहरातील चार मतदान केंद्रे व मतमोजणी केद्राला भेट देऊन तेथील निवडणुकीच्या कामाबाबतच्या पुर्वतयारीची पाहणी केली.

माजलगाव नगर परिषद निवडणूक-2016 निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जबाबदारीने व दक्ष राहून काम करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम




बीड दि. 19 :- नगर परिषदेची निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक जागरूकपणे करावे.तसेच या कामामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई व गैरप्रकार होणार नाहीत यासाठी दक्ष रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज माजलगाव येथील निवडणूकीच्या पुर्वतयारीचा बैठकीत आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा माजलगावचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे, अपर पोलीस अधिक्षक श्रीहरी बालाजी, तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एन.जी.झंपलवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी बी.सी. गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, नगर परिषद निवडणूका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यासह इतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. निवडणूकीच्या कामामध्ये कोणीही प्रकारची दिरंगाई, हलगर्जीपणा करताना दिसून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले असल्याने सर्वांची जबाबदारीने काम करावे अशा सूचना केल्या.
निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या झोनल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेबाबत माहिती घ्यावी. मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणारी यासाठी योग्य त्या        सोयी-सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच मतमोजणी केंद्रातील व्यवस्था व सुरक्षा कक्ष याबाबत विशेष दक्षता घ्यावी. माजलगाव शहरातील 46 मतदान केंद्रांपैकी किमान  5 मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र         (मॉडेल बुथ) म्हणून तयार करावीत असे जिल्हाधिकारी  नवल किशोर राम यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी आचारसंहिता पथक, निवडणूक खर्च, पोलीस बंदोबस्त, मतदान यंत्रे, व्हिडीयो चित्रीकरण, व्होटर स्लीप, भरारी पथक, वाहन व्यवस्था, निवडणूकीच्या कामाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण याबाबत सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
माजलगाव शहरात 12 प्रभाग असून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 24 आहे तर मतदानासाठी 46 मतदान केंद्रे आहेत. माजलगाव शहरामध्ये एकूण मतदार संख्या 33 हजार 531 असून यापैकी 15 हजार 830 स्त्री मतदार असून 17 हजार 701 पुरुष मतदार असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली. या बैठकीस निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेले झोनल ऑफीसर, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीपुर्वी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माजलगाव शहरातील चार मतदान केंद्रे व मतमोजणी केद्राला भेट देऊन तेथील निवडणुकीच्या कामाबाबतच्या पुर्वतयारीची पाहणी केली.

स्व. इंदिरा गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन






बीड, दि. 19 :- माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच त्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना श्री. सुर्यवंशी यांनी  राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त रविंद्र शिंदे, नायब तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, श्री. लिमकर, ए.एन. शेख यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०१६

स्वस्त धान्य दुकानदारांची तहसिल कार्यालयात बैठक संपन्न


     
बीड, दि. 18 :- बीडच्या तहसिलदार आणि पुरवठा विभागाच्या नायब तहसिलदार यांनी गोदाम निहाय स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेतली. यामध्ये शासन परिपत्रकानूसार ऑनलाईन राशनकार्ड वितरण होणार असल्यामुळे दुकानदारनिहाय कार्ड धारकांची छाननी होणार असल्याचे सांगुन स्वस्त धान्य दुकानदारांना सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्ड धारकांच्या यादीतुन नोकरदार, स्थलांतरीत व मयत लोकांची नावे तात्काळ कमी करण्याचे आदेश दिले तसेच अद्यापही बहुतांश कार्ड धारकानी कुटुंबियाचे आधारकार्ड जमा केले नसल्याचे दिसून येते. अशा कार्ड धारकांचे धान्य, रॉकेल थांबविण्यात येईल अशा सुचना दिल्या तसेच कार्डधारकांच्या याद्याचे जाहिर वाचन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  स्थलांतरीत व मयत, लग्न झालेल्या मुलींची नावे कमी करण्यास स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज करावे किंवा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात संपर्क साधावा तसेच ज्या व्यक्तीचे उत्पन्न 39 हजार रुपयापेक्षा जास्त आहे आणि बीपीएल, एएवाय आणि अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत असेल त्यांनी स्वत:हून आपले कार्ड बंद करुन घ्यावे जेणेकरुन गरीब लोकांना याचा फायदा होईल अशीही सुचना बैठकीत देण्यात आली. राशनकार्ड हे आधारक्रमांकाशी जोडून घेऊन प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा आधारक्रमांकाशी न जोडल्यास शासनाचे अन्न धान्य, रॉकेल तथा विविध योजनेचा लाभ घेता येणार नाही असेही सांगितले. पुरवठा विभागाच्या नायब तहसिलदार प्रविण पठाण स्वस्त धान्य दुकानदार यांच्या दुकानास भेट देऊन या कामकाजाची पाहणी करणार आहेत. या बैठकीस सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. असे बीडचे तहसीलदार यांनी कळविले आहे.

न.प.निवडणूकीच्या कामकाजाचा घेतला आढावा निवडणूक यंत्रणा व पोलीस विभागाने समन्वयाने निवडणूकीस सज्ज व्हावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



     
बीड, दि. 18 :- बीड जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी विषयक पूर्व तयारीचा आढावा सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून घेतांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणूक यंत्रणा व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम करावे व निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे असे आवाहन केले.
नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, नगर परिषद निवडणूकीसाठी सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीज, अपंगांसाठी रॅम्पची व्यवस्था चोख असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी सर्व मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी करावी व तेथील पोलीस बंदोबस्ताविषयी आराखडा तयार करावा. पोलीस विभागाने संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्राची माहिती घ्यावी. मागील काळातील घटनांची माहिती घेऊन अशा केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवावा. निवडणूकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे अत्यंत आवश्यक असून त्यादृष्टीने पोलीस विभाग व उपविभागीय दंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्याची गरज आहे असे ही ते म्हणाले.
स्थिर तपासणी पथके व अचानक तपासणी करणारी पथके जास्त सक्रीय करण्याची सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने मतपत्रिका छपाई, पोस्टल मत पत्रिका, मतदान यंत्र सिलींग, मतदार पत्रिका, प्रशिक्षण, जनजागृती उमेदवारांकडील निवडणूक खर्च तपासणी इत्यादी बाबीविषयी सविस्तर आढावा घेतला. मतदारांना या निवडणूकीत एकापेक्षा जास्त वेळा मतदान करावे लागणार असल्याने मतदान प्रक्रीयेविषयी त्यांनाही प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगून त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याची सुचना केली. आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण निवडणूक यंत्रेणेने अधिक प्रभावीपणे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सर्व नगर परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक हे मतदान केंद्रांना भेटी देवून प्रत्यक्ष आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले. मतदान व मतमोजणीच्या प्रक्रीयेसाठी सर्व ठिकाणी व्यवस्था चोख राहिल यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी करण्यात आल्या.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक निरीक्षक, पोलीस अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६

जिल्हा नियोजन अधिकारी श्री.अगवाने बीडला रुजू


                                           
बीड, दि. 17 :- बीड जिल्ह्याचे नूतन जिल्हा नियोजन अधिकारी या पदावर श्री.बी. के.अगवाने रुजु झाले आहेत.

यापूर्वी नांदेड येथे जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी लातूर, उस्मानाबाद येथे जिल्हा नियोजन अधिकारी म्हणून काम केलेले आहे. बीड येथे 2001 ते 2003 मध्ये त्यांनी जिल्हा सांख्यिकी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. मुळचे लातूर जिल्ह्यातील असलेले श्री. अगवाने यांना नियोजन विभागातील कामाचा दांडगा अनुभव आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्याच्या नियोजन विभागाच्या कामाला चांगली गती येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नगर परिषद निवडणूकीनिमित्त जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



            बीड, दि. 17 :- जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी वैजनाथ, माजलगाव, गेवराई, धारुर या ठिकाणी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया व मतमोजणी संबंधाने शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील नगर परिषद क्षेत्राच्या हद्दीतील अबकारी विभागाच्या सर्व देशी दारु, विदेशी दारु, परवाना कक्ष, बिअर शॉपी, एफएल-1, एफएल-2, सीएल-2 इत्यादी मद्य विक्रीची दुकाने व वाहतुकीसाठी  दि. 26 नोव्हेंबर 2016 मतदानाच्या पूर्वीचा दिवस, दि. 27 नोव्हेंबर मतदानाचा संपुर्ण दिवस बंद ठेवावी तसेच दि. 28 नोव्हेंबर 2016 मतमोजणीच्या दिवशी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे तेथे मतमोजणी संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

            अनुज्ञप्ती धारकाने वरील दिनांकास अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे. 

निवडणुक प्रशिक्षणाचे 20 ऐवजी 19 नोव्हेबर रोजी आयोजन




            बीड, दि. 17 :-बीड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि.27 नोव्हेंबर 2016 रोजी होत आहे.या अनुषंगाने मतदान केंद्रावर काम करणाऱ्या केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी-1,2,3 यांना दुसरे प्रशिक्षण दि.20 नोव्हेंबर 2016 रोजी आयोजित केले होते परंतू काही अपरिहार्य कारणास्तव हे प्रशिक्षण 19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे आयोजित केले आहे. या बदलाची नोंद घेवून प्रशिक्षणास हजर रहावे. असे बीड नगर परिषद निवडणूक-2016 चे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

देवस्थान व धर्मादाय संस्थांना प्राप्त होणारी देणगी त्याच दिवशी बँकेत जमा करण्याचे आवाहन



बीड, दि. 17 :- भारत सरकार यांच्या निर्देशानूसार राज्यातील सर्व देवस्थाने आणि धर्मादाय संस्था यांच्याकडे दररोज दान, देणगी स्वरुपात प्राप्त होणाऱ्या चलनी नोटा आणि नाणी ही कोणत्याही परिस्थितीत त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये जमा करावी. या आदेशाचे राज्यातील सर्व देवस्थान व धर्मादाय संस्थांनी पालन करणे बंधनकारक आहे. असे बीड विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त यांनी कळविले आहे.

पोलीस विभागाकडून अंमलबजावणी ध्वनी प्रदुषणाबाबत नागरिकांना आवाहन करणारे फलक प्रसिध्द


                                           

बीड, दि. 17 :- जनहीत याचीका क्र.173/2010 (डॉ.महेश बेडेकर विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर) यामध्ये मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी ध्वनी प्रदुषन नियमन व नियंत्रन सन 2010 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याकरीता निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आगामी येणारे ख्रिसमस व  इतर सण, उत्सव तसेच 31 डिसेंबर दिवशी ध्वनी प्रदुषणामुळे होणारे नुकसान कायद्यातील शिक्षेच्या तरतुदी व तक्रार देणेकरीता उालब्ध केलेल्या सुविधा बाबत बीड जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या दर्शनी भागात माहिती फलक लावण्यात आला असून नागरिकांनी ध्वनी प्रदुषण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बीड पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०१६

प्रकल्पग्रस्तांनी आपली बाजू मांडण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी हजर रहावे


                                           
बीड, दि. 16 :- मौजे कळसंबर, भंडारवाडी, हिवरापहाडी, बोरफडी, सोनपेठवाडी, सोमनाथवाडी, पिंपळवाडी, वडगाव क. वायभटवाडी, अंजनवती व बावी ता.जि.बीड येथील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील रिट याचिका क्र.942/2015 आयोध्या प्रकाश मुंडे विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणा संदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या यादीतील उपजिल्हाधिकारी (सामान्य), बीड यांच्याकडून प्राप्त झालेल्या यादीतील नावे असणाऱ्या व्यक्ती संदर्भात मुंबईचा धारणा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 चे कलम 8 अन्वये भंग झालेले खरेदी विक्री व्यवहारावर आधारीत नोंदविण्यात आलेले फेरफार आहेत. मंजूर करण्यात आलेले फेरफार बाबत महसूल संहिता 1966 वे कलम 257 अन्वये पुनरीक्षणाची कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी, बीड यांनी परवानगी दिलेली आहे. या फेरुाराशी हितसंबंधित व्यक्तींना सुनावणीची व कागदपत्रे सादर करुन आपले म्हणने मांडण्यासाठी संधी मिळावी म्हणून उपविभागीय अधिकारी, बीड यांनी नोटिसा दिलेल्या आहेत.

वरील गावातील नोंदविण्यात आलेल्या फेर फार बाबत कलम 257 च्या तरतुदीस अनुसरुन हिसंबंधितांना आपली बाजू मांडण्यास संधी मिळावी म्हणून संबंधितांनी स्वत: अथवा वकीलाद्वारे उपविभागीय कार्यालय, बीड येथे दि.19 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता हजर रहावे व आपली बाजू मांडावी. नोटीसा निर्गमित करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी उपविभागीय अधिकारी, बीड कार्यालयात सुचना फलकावर तसेच गावातील तलाठी सज्जावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही यादी कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असे बीडचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

त्रैमासिक विवरणपत्रे 30 दिवसाच्या आत सादर करणे बंधनकारक



बीड, दि. 16:- बीड जिल्ह्यातील सर्व केंद्र शासन, राज्य शासन, निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकृत उपक्रम, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व खाजगी आस्थापनांनी सेवायोजन कार्यालयात (रिक्त पदे अधिसुचित करणारा) कायदा 1959 नियमावली 1960 नूसार प्रत्येक तिमाहीस त्रैमासीक विवरणपत्रे 30 दिवसाच्या आत सेवायोजन कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.

माहे सप्टेंबर 2016 अखेरचे ई-आर-1 दि.30 नोव्हेंबर 2016 पर्यंत सादर करावे अन्यथा संबंधित आस्थापनेवर कार्यवाही होऊ शकते. शासकीय कार्यालयातील ई-आर-2 भरण्याकरीता संबंधित कार्यालयास सादर करावयाची ई-आर-1 प्रोसेस करुन प्रिंट घेतल्या नंतर ई-आर-2 भरण्यात यावा. ई-आर-2 भरताना उच्च पदानूसार (उदा-कार्यालय प्रमुख, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई) याप्रमाणे भरण्यात यावा विभागाची वेबसाईट http://www.maharojgar.gov.in यावर भरण्यात यावा. ई-आर-1 ची एक प्रत व ई-आर-2 च्या दोन प्रती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड या कार्यालयात सादर करुन प्रमाणपत्र घ्यावे तसेच प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2016 च्या वेतन देयकाबरोबर सादर करणे आवश्यक आहे याची आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक यांनी कळविले आहे.

नागरिकांनी ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे पालन करावे


            बीड, दि. 16:- मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र.173/2010 च्या सुनावणी दरम्यान आदेश दिला आहे की, सर्व धार्मीक उत्सव, कार्यक्रम सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी साजरे होत असताना ध्वनी प्रदुषणाचा त्रास नागरिकांना होऊन ते सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांच्या आजुबाजूस सुध्दा ध्वनी प्रदुषनाची पातळी मोजुन कार्यवाही करावी.

            बीड जिल्ह्यातील 27पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना ध्वनी प्रदुषणाची कार्यवाही करण्याकरीता प्राधिकृत केले असून पोलीस अधिकाऱ्यांची नावे, पोलीस स्टेशनचे फोन क्रमांक याची माहिती बीड जिल्हा पोलीस दलाच्या www.beedpolice.in या आणि जिल्हाधिकारी, बीड (bmkamble.rdcbeed@gmail.com) यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी ध्वनी प्रदुषणाची तक्रार ते राहत असलेल्या पोलीस स्टेशनच्या टेलीफोनवर, ई-मेलवर तसेच बीड जिल्हा नियंत्रण कक्षाच्या फोन क्र.100 तसेच भ्रमणध्वनी 7249089102 या वर एसएमएस, व्हॉटस अपद्वारे देता येईल. ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कार्यवाही होऊन गुन्हा दाखल होतो. गुन्हा सिध्द झाल्यास त्यास 5 वर्षे कैद किंवा 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते याची नागरिकांनी नोंद घेवून आगामी काळात येणारे ख्रिसमस व इतर सण, उत्सव त्याचप्रमाणे 31 डिसेंबर दिवशी ध्वनीप्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस अधिक्षक, बीड यांनी केले आहे.

23 नोव्हेंबर रोजी शालेय थांगता व चायक्वांदोच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन



            बीड, दि. 16:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्यावतीने आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, बीड व थांगता असोसिएशन ऑफ बीड आणि चायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2016-17 या वर्षातील जिल्हास्तरीय शालेय थांगता (14, 17  व 19 वर्षे मुले व मुली) आणि चायक्वांदो (17 व 19 वर्षे मुले/मुली) या दोन्ही खेळांच्या स्पर्धेचे आयोजन दि.23 नोव्हेंबर 2016 रोजी पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालय, आष्टी जि.बीड येथे आयोजित केले असून खेळाडूंनी सकाळी 9 वाजता स्पर्धेच्या ठिकाणी ओळखपत्र व प्रवेशिकेसह उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा संघटनेने केले आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०१६

बालदिन व बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त कार्यक्रम संपन्न



             बीड दि. 15 :- बालदिन व 14 ते 21 नोव्हेंबर बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प, जिल्हाधिकारी कार्यालय,बीड यांच्यावतीने बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती रॅली व चित्ररथाचे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
            बालदिनानिमित्त आयोजित रॅलीच्या उदघाटन प्रसंगी बालकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व बालकामगार ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी बालकामगार प्रथा विरोधी रॅलीस हिरवा झेंडा दाखवुन रॅलीस सुरुवात करण्यात आली. या उदघाटन प्रसंगी प्रमुख उदघाटन बालकल्याण समितीचे अध्यक्ष दत्ता नलावडे, शिक्षणाधिकारी विक्रम सारुक, महिला व बालकल्याण पर्यवेक्षक सुदाम निर्मळ, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे संचालक ओमप्रकाश गिरी, बालकामगार प्रकल्प समितीचे सदस्य राजकुमार घायाळ, तत्वशिल कांबळे, अतुल कुलकर्णी, पी.आर.जोशी, सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.            
            समारोप प्रसंगी बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर म्हणाले की, बीडची ओळख ही ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून आहे. कामगाराचा मुलगा परत कामगार होऊ नये, बालमजुर होऊ नये यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबविले जात असून राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम होत आहे. समाज आणि शासन यांनी संयुक्त प्रयत्न करुन कामगाराचा मुलगा कामगार न राहता अधिकारी व्हावा यासाठी विशेष प्रयत्न करावेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
            बालदिनानिमित्त निरंतर शिक्षणचे शिक्षणाधिकारी विक्रम सारुक म्हणाले की,  बालकांना शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. शासन व समाजाने एकत्र येऊन बालकामगार व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्याचे पवित्र कार्य सर्वांनी एकजुटीने करावे  असेही त्यांनी सांगितले. उदघाटन प्रसंगी प्रास्ताविक करतांना संचालक श्री.गिरी म्हणाले की, बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्हाभरात चित्ररथाच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून बालमजूरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात येत आहे तसेच राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

            कार्यक्रमाच्या प्रथम बालकामगार प्रथाविरोधी रॅली शिवाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे जावून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे रॅली व बालदिन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी,कर्मचारी आणि शहरातील सामाजिक संस्था, संघटना, बालप्रेमी नागरीक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती तुरुकमारे यांनी केले तर आभार श्री.साबळे यांनी मानले. 

जिल्हा शल्यचिकित्सकांचे आवाहन स्वयंस्फुर्तीने जिल्हा रुग्णालयात रक्तदान व रक्तदान शिबीराचे आयोजन करावे


             बीड दि. 15 :- जिल्हा रुग्णालयातील जिल्हा रक्तपेढीत स्वयंस्फुर्तीने रक्तदान करुन तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

            जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता तसेच जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी मधील रक्त पिशव्यांची व रक्त घटकांची मागणी लक्षात घेता रक्त व रक्त घटकाच्या पिशव्यांचा साठा कमी आहे. थेलेसिमिया, रक्तक्षय, रुग्णांना रक्त व रक्त घटकांची तात्काळ आवश्यकता असते त्याची पूर्तता उपलब्ध साठ्यामधून करणे आवश्यक असते. परंतू जिल्हा रक्तपेढी येथे रक्त पिशवी व रक्त घटकांची कमतरता असल्याने रुग्णांना रक्त पुरवठा करण्यामध्ये अडचण निर्माण आहेत आहे. तरी दात्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधून रक्तदान करावे. असे बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळविले आहे.

निवडणुकीच्या कामातील कर्मचाऱ्यांनी 24 तासाच्या आत तहसील कार्यालयात हजर रहावे



             बीड दि. 15 :-बीड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक दि.27 नोव्हेंबर 2016 रोजी होत असून त्याअनुषंगाने मतदान केंद्रावर काम करणाऱ्या केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2, 3 यांच्यासाठी दि.13 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या निवडणूकीच्या काम करणेसाठी व प्रशिक्षणासाठी हजर राहण्याबाबत संबंधितास आदेश दिले आहेत परंतू आदेश प्राप्त होऊनही निवडणूकीच्या राष्ट्रीय कार्यक्रमास जे कर्मचारी, अधिकारी गैरहजर राहिले आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस पोहोच होत आहे. तसेच जे कर्मचारी आहेत ते 24 तासाचे आत बीड तहसील कार्यालयात हजर होणार नाहीत त्यांच्या विरुध्द करवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून सहाय्यक निवडणूक अधिकारी, बीड यांची नेमणूक करण्यात आली आहे. असे बीड नगर परिषद निवडणूक 2016 चे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.