शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदानासाठी सुट्टी जाहीर


बीड, दि. 10 :- मा. राज्य निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर निवडणूकांचे मतदान निवडणूक विभ्ज्ञाग (60) निर्वाचक गण (120) मध्ये दिनांक गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी होत असून राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागीय मुंबई अधिसुचना दिनांक 8 फेब्रुवारी 2017 अन्वये मतदानाच्या दिवशी शासकीय सुटी जाहिर केली आहे.

तसेच उद्योग, उर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक मतदान 2017/प्र.क्र.13/कामगार-9, दिनांक 9 फेब्रुवारी 2017 द्वारे दुकाने, खाजगी आस्थापना, निवासी हॉटेल,खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी दोन तासांची सवलत कामाच्या तासातून देण्यास सूचित केलेले आहे. सर्व संबंधितांनी याची  नोंद घेऊन त्यांच्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना अशी सवलत देण्याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

निवडणूक निरीक्षक पी.एल.सोरमारे यांचा आष्टी,पाटोदा,शिरुर,केज दौरा




            बीड, दि. 10 :- ‍जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक-2017 बीड जिल्ह्यासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक पी.एल. सोरमारे हे दिनांक 11 ते 12 फेब्रुवारी 2017 या कालावधीत बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरुर (का) व केज तालुक्यांना भेटी देणार आहेत. मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जि.प. पं.स. सार्वत्रिक निवडणूका पार पडत असल्याची, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची तसेच नागरिकांच्या मतदान  प्रक्रियेबाबत काही अडचणी, हरकती, सूचना असल्यास त्याची माहिती नागरिकांकडून घेणार आहेत.      तरी नागरिकानी, उमेदवारांनी आपल्या सूचना, तक्रारी प्रत्यक्ष भेटून लेखी किंवा विशाल भोसले (संपर्क अधिकारी मो.नं. 9422150888), निवडणूक निरीक्षक पी.एल.सोरमारे (मो.नं.9921699981) या  क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मतदान शांततेत होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत - जिल्हाधिकारी नवल किशोर राम






            बीड, दि. 10 :- ‍जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी होणारे मतदान धारुर तालुक्यात शांततामय वातावरणात होण्यासाठी यंत्रणेनी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
            जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राम यांनी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या समवेत धारुर तालुक्याचा शुक्रवारी दौरा केला. यावेळी तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबादचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) टी.के.नवले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी,कक्ष अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित  होते. तहसील कार्यालयातील सभागृहात निवडणूक कामकाजाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अत्यंत सतर्क राहून मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष लक्ष द्यावे. धारुर तालुक्यातील सर्व मतदान केद्रांच्या ठिकाणी सुविधा निर्माण कराव्यात. यासोबतच तालुक्यात आचारसंहितेचा भंग होणार  नाही याची दक्षता घ्यावी. अशी प्रकरणे लक्षात आल्यास भंग करणाऱ्यांविरुध्द कडक कार्यवाही करण्यात यावी. दहशत व धाकदपटशाची माहिती मिळाल्यास प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी. निवडणूक प्रक्रीयेला बाधा येणाऱ्या संभाव्य घडामोडीकडे यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे असेही जिल्हाधिकारी राम यांनी सुचित केले.
            धारुर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 3 गट आणि पंचायत समितीचे 6 गण आहेत. यासाठी तालुक्यात 105 मतदान केंद्र स्थापन करण्यात येत असून यापैकी 19 संवेदनशील आणि 6 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. याठिकाणी जास्तीत जास्त कडक बंदोबस्त लावण्याच्या तसेच सीसीटीव्ही व व्हिडीओ कॅमेरे लावण्याच्या  सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिल्या.

            पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनीही या बैठकीत मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताविषयी पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले. जिल्हाधिकारी राम व पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी मतमोजणी केंद्र व स्ट्राँगरुमची पाहणी केली. याशिवाय त्यांनी धारुर तालुक्यातील जहांगीरमोहा व अंबेवडगाव येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली व निवडणूक अधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना केल्या.

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हाधिकारी राम यांच्या हस्ते शाळेत जंतनाशक गोळ्यांचे वाटप





            बीड, दि. 10 :- बालकांमध्ये मातीतून प्रसारीत होणाऱ्या कृमीदोषांवर प्रतिबंध करण्यासाठी बीड जिल्ह्यात 10 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी या दोन दिवशी दोन टप्प्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते बीड शहरातील अशोक नगर येथील जिल्हा परिषद प्राथामिक शाळेतील बालकांना गोळ्या वितरीत करण्यात आल्या. यावेळी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
             जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार 1 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांमध्ये मातीतून प्रसारीत होणाऱ्या आतड्यांच्या कृमी दोष आढळून आला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. या कृमी दोषांचा संसर्ग दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे होऊन बालकांचे आरोग्य धोक्यात येते. यामुळे राज्यभरात 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येत आहे. या दिवशी राहिलेल्या बालकांना 15 फेब्रुवारी रोजी दुसऱ्या टप्प्यात गोळ्या खायला दिल्या जाणार आहेत.  बीड जिल्ह्यात साधारणत: 7 लाख 83 हजार 497 अपेक्षित लाभार्थी बालकांची संख्या असून आज दिवसभर अंगणवाडी केंद्र व शाळांमधील बालकांना गोळ्या वितरीत करण्यात आल्या.  1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांना या जंतनाशक गोळ्या आवश्यक त्या प्रमाणात वयानुसार दिल्या जाणार आहेत.

            अशोक नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींना गोळ्या वाटप करुन खाऊ घालण्यात आल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी मधुकर मोराळे, विस्तार अधिकारी सिध्देश्वर माटे, मुख्याध्यापक मदन लांडगे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात 13 फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन

            बीड, दि. 8 :- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या परिणामकारक अंमलबजवणीसाठी व राष्ट्रीय निवृत्ती वेतनधारकांच्या जागृती आणि सुविधेकरीता दिनांक 1 ते 15 फेब्रुवारी 2017 या कालावधीमध्ये बीड जिल्हा कोषागार कार्यालयात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे. या सेवा पंधरवाड्यात आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या शंकांचे निरसन करु शकतात. तसेच या सेवा पंधरवाड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने सोमवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डी.डी. माडे यांनी केले आहे.

-*-*-*-

वेतन पडताळणी पथकाचा बीड दौरा

          बीड, दि. 8 :-  सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद येथील वेतन पडताळणी पथक दि. 8 ते 10 फेब्रुवारी 2017 या कालावधीत बीड येथे येणार आहे. या दौऱ्यामध्ये हे पथक दिनांक 8 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सेवापुस्तकांची पडताळणी करणार असून दि. 9 ते 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा व तालुकास्तरावरील कार्यालयातील सेवापुस्तकांची पडताळणी करणार आहे.
            जिल्हयातील संबधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करताना महाकोषमधील व वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगईन करावे, डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम व पासवर्ड यांचा वापर करावा. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणी करावयाची आहेत त्या कर्मचाऱ्यांचा सेवार्थ एम्प्लॉयर आय.डी. टाकून सबमिट करुन वेतन पडताळणी पथक, औरंगाबाद यांच्या नावे तयार होणारे पत्र पडताळणी करावयाच्या सेवापुस्तकांसोबत सादर करावे  व सेवापुस्तकांची पडताळणी करुन घ्यावी असे सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

निवडणूक काळात बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी -जिल्हाधिकारी नवल किशोर राम


            बीड, दि. 8 :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कालावधीत बीड जिल्ह्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
            बीड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून आज झालेल्या विशेष बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            निवडणूक कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाहीच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी राम यांनी सर्व उपविभाग व तालुकानिहाय प्रत्येक कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 प्रमाणे 63 प्रकरणात जिल्ह्यात कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्ह्यात 1297 शस्त्र परवानाधारक असून 1165 शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करण्यात आलेली आहेत. उर्वरित शस्त्रे जमा करण्यात येत आहेत. कलम 107 च्या 440, कलम 109 च्या 56, व कलम 110 च्या 42 प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच कलम 144 नुसार 63 प्रकरणात कार्यवाही झाली आहे. कलम 56 अन्वये 70 आणि कलम 57 अन्वये 29 हद्दपारीची प्रकरणे निर्णयस्तरावर आहेत. मुंबई दारुबंदी अधिनियम अंतर्गत कलम 93 ची 9 प्रकरणे असून त्यावर कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
            कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या हद्दपारीच्या प्रकरणांबाबत संबंधित उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी संयुक्तपणे आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. आवश्यकतेप्रमाणे संबंधितांना नोटीस निर्गमित करावेत. हद्दपार केलेल्या लोकांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदानाच्या दिवशी दोन तासाचा कालावधीसाठी मतदानासाठी गावात येण्याची मुभा देण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिली.
            निवडणूकीच्या  मतदान काळात विशेष पोलीस बंदोबस्त आवश्यक असणार असून मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात यावी. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी जादा सुरक्षा व्यवस्था राहील. आवश्यकत्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरा पथक, सीसीटीव्ही यंत्रणा सारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिले.
            मतदान केंद्राच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पोलीस कर्मचारी तैनात करतांना वाढीव लागणारी पोलीस पथकांची कुमक आणि राज्य राखीव पोलीस दल व इतर मनुष्यबळाच्या गरजेचा आराखडा तयार करण्यात यावा असे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी मतदान केंद्रनिहाय परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. याशिवाय मतमोजणी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेचाही यावेळी आढावा घेऊन उपयुक्त सूचना देण्यात आल्या.
            या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) राजेंद्र वाघ, अप्पर पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, डॉ. हरी बालाजी, वैभव कलुबर्मे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

फेब्रुवारी महिन्याचे रॉकेल नियतन मंजूर


                बीड, दि. 7 :- माहे फेब्रुवारी 2017 महिन्यासाठीचे जिल्ह्यातील पात्र घाऊक, अर्धघाऊक व तालुकानिहाय वाटप करण्यासाठी  1296 के.एल. नियतन बीड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. रॉकेलच्या घाऊक विक्रेत्यांनी महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत 60 टक्के, 11 ते 17 तारखेपर्यंत 85 टक्के तर 18 ते 25 तारखेपर्यंत 100 टक्के रॉकेलची उचल करावी.  तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या रॉकेलचे नियतन याप्रमाणे.
            आष्टी-141 के.एल, पाटोदा-66, शिरुर-57, बीड-204 गेवराई-165, माजलगाव-135, वडवणी-72, धारुर-84, केज-108, अंबाजोगाई-141 तर परळी तालुक्यासाठी 123 के.एल. रॉकेलचे मासिक नियतन मंजूर करण्यात आले आहे.  सर्व विक्रेत्यांनी रॉकेल पुरवठा झाल्याचे दर्शनी भागात सूचना फलकावर ग्राहकांच्या माहितीसाठी लावावी.   त्याचबरोबर घाऊक अथवा अर्धघाऊक रॉकेल डिलर्स यांच्याकडून वितरण व्यवस्थेसंदर्भात गंभीर स्वरुपाचे दोष आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये कारवाई करावी.  त्याचबरोबर तहसिलच्या पुरवठा विभागाने दुकानांना अचानक भेटी देऊन रॉकेल पुरवठ्याबाबत खात्री करावी.  तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

-*-*-*-*-

बीड जिल्ह्यातील निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक, निवडणूक निरीक्षक तसेच संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती


बीड, दि. 7 :- औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी बीड जिल्ह्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून  औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधूकर राजे आर्दड यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या कार्यकक्षेत बीड, गेवराई आणि वडवणी तालुके असतील. त्यांचे सपंर्क अधिकारी म्हणून बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422284816 असा आहे.
आष्टी, पाटोदा, शिरुर आणि केज या तालुक्यांसाठी निवडणुक निरीक्षक म्हणून औरंगाबादचे अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून लघुसिंचन उपविभाग धारुरचे उपविभागीय अधिकारी सतिष देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9823056006 असा आहे.
अंबाजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ आणि धारुर तालुक्यांसाठी  उस्मानाबादचे अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी  डॉ. बी.डी. बिक्कड यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक  9765931000 आणि 9432727212 असे आहेत.
निवडणूकीशी संबंधित उमेदवार किंवा  नागरिकांना काही अडचण असल्यास किंवा संपर्क साधावयाचा असल्यास त्यांनी वरीलप्रमाणे निवडणूक निरीक्षक अथवा त्यांच्या संपर्क अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

9 फेब्रुवारी रोजी रेडिओ किसान दिन कार्यक्रम


            बीड, दि. 6 :- आकाशवाणी केंद्र, बीड आणी प्रकल्प संचालक आत्मा यांच्यावतीने गुरुवार दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बळीराजा प्रशिक्षण केंद्र वडवाडी ता.जि.बीड येथे किसानवाणी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

            कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी नवल किशोर राम , सेवा निवृत्त औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगटमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने आणी आत्माचे प्रकल्प संचालक भास्कर कोळेकर उपस्थित राहणार आहेत. किसानवाणी दिनाच्या निमित्ताने बीड जिल्हयातील प्रगतीशील शेतक-यांना किसान मित्र पुरस्कार देवून गौरण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ परभणी येथील कृषी विध्यावेत्ता डॉ. ए.व्ही.गुटटे, डॉ.विलास टाकणखार, सहयोगी प्राध्यापक कृ.म.अंबाजोगाई / डॉ. शैलेश केंडे सहा. उपायोक्त्‍पशुसंवर्धन आणी दुग्धशास्त्र विभाग आणी भास्कर कोळेकर प्रकल्प संचालक आत्मा उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला शेतक-यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा आणी आकाशवाणी बीड चे सहा. संचालक विजय सपकाळे यांनी केले आहे.

बीड जि.प.पं.स. निवडणूकीसाठी केंद्रीय आचारसंहिता कक्षाची स्थापना



            बीड, दि. 6 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला असून त्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार  जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटिल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा सुधारीत भ्रमणध्वनी क्रमांक 9421471153 असून या आचार संहिता कक्षात एकुण 36 कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

            आचारसंहिता कक्ष 24 तास कार्यरत ठेवणे, कक्षामध्ये 1 नोडल अधिकारी व 3 अधिकारी-कर्मचारी कार्यरत असावेत, दूरचित्रवाणी संच केबल कनेक्शनसह कार्यरत ठेवावा, सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या जाहिरातीवर नजर ठेवणे, वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीची कात्रणे आयोगास पाठविणे, आचारसंहितेच्या अनुषंगाने दाखल झालेल्या तक्रारीच्याअनुषंगाने कार्यवाहीचा अहवाल रोज आयोगास सादर करण्याची जबाबदारी या आचारसंहिता कक्षाची राहिल असे निर्देश  राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नागरिकांना आचारसंहिता भंगाची तक्रार या कक्षाकडे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुख्य निवडणूक निरीक्षक यांचेकडे नागरिकांना संपर्क करता येईल



बीड, दि. 6 :- जि.प.पं.स. सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक मधुकरराजे अर्दड गेवराई, बीड व वडवणी या तालुक्यात जि.प.पं.स.निवडणूकीचे कामकाजसंदर्भात दौरा करीत आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेणार आहेत. त्या अनुषंगाने उमदेवार अथवा नागरिकांना जि.प.पं.स. निवडणूकीबाबत काही अडचणी असल्यास त्यांनी मुख्य निवडणूक निरीक्षक यांचा मोबाईल नं.9545476555 वर संपर्क साधावा तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी प्रशांत खांडकेकर यांचा मोबाईल नं.9422284816 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापणा



बीड, दि. 4 :- जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला असून निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी स्थापण करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय 18002332604, बीड तहसिल कार्यालय 02442-222204, गेवराई तहसिल कार्यालय 02447-262041, आष्टी तहसिल कार्यालय 02441-282542, शिरुर कासार तहसिल कार्यालय 02444-259359, केज तहसिल कार्यालय 02445-252244, परळी वैजनाथ तहसिल कार्यालय 02446-222830, धारुर तहसिल कार्यालय 02445-244186, अंबाजोगाई तहसिल कार्यालय 02446-247084, माजलगाव तहसिल कार्यालय 02443-234052, पाटोदा तहसिल कार्यालय 02444-242521, वडवणी तहसिल कार्यालय 02443-257503 या प्रमाणे नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक असून जनतेने आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारीसाठी संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

मुख्य निवडणूक निरीक्षक मधुकर राजे अर्दड यांचा निवडणूक दौरा कार्यक्रम


बीड, दि. 4 :- जि.प.पं.स. निवडणूक 2017 अंतर्गत बीड, गेवराई, वडवणी तालुक्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक तथा औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.6 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथून गेवराईकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते 12.30 वाजता गेवराई येथे आगमन प्राप्त नामनिर्देशन पत्रांचा आढावा, निवडणूक  कामाचा निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक आढावा व बीडकडे प्रयाण. दुपारी 1.15 ते 2.15  वाजता बीड येथे आगमन व बीड तालुक्यात प्राप्त नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगाने आढावा, निवडणूक कामाचा निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी यांचे समवेत बैठक आढावा. दुपारी 2.15 ते 3.15 वाजता राखीव व वडवणीकडे प्रयाण. दुपारी 3.15 ते 4.15 वाजता वडवणी येथे आगमन व वडवणी तालुक्यातील प्राप्त नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगाने आढावा, निवडणूक कामाचा निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक आढावा. दुपारी 4.30 वाजता बीडकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता बीड येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार दि.7 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10 ते 11.30 वाजता जिल्हाधिकारी यांची भेट व प्राप्त हरकतीचा आढावा, निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत उमेदवारी अर्ज (अपील नसलेले) माघार घेतलेल्या नामनिर्देशनाचा आढावा. सकाळी 11.30 वाजता वडवणीकडे प्रयाण. दुपारी 12.30 ते 1.30 वाजता वडवणी येथे आगमन उमेदवारी अर्ज (अपील नसलेले) माघार घेतलेल्या नामनिर्देशनाचा आढावा. दुपारी 1.30 ते 2.30 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता गेवराईकडे प्रयाण. दुपारी 4.15 ते सायंकाळी 5.30 वाजता गेवराई येथे आगमन उमेदवारी अर्ज (अपील नसलेले) माघार घेतलेल्या नामनिर्देशनाचा आढावा व निवडणूक पूर्व तयारी कामाचा आढावा. दुपारी 5.30 वाजता गेवराई येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.

बीड, औरंगाबाद, जालना, उस्मानाबादचा आढावा निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी दक्ष रहावे - राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया










बीड, दि. 4 :- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीडसह औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पूर्वतयारीचा आढावा घेताना राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष रहावे असे आवाहन केले.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी ही बैठक घेतली. यावेळी  त्यांच्या समवेत अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम (बीड), डॉ. प्रशांत ननावरे (उस्मानाबाद), शिवाजी जोंधळे (जालना), अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे (औरंगाबाद), पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (बीड), पंकज देशमुख (उस्मानाबाद), ज्योतीप्रिया सिंग (जालना), नवीनचंद्र रेड्डी (औरंगाबाद) यांनी आपआपल्या जिल्ह्यातील निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा सादर केला. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय नोडल अधिकारी तथा उपायुक्त पारस बोथरा यांनी औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यातील निवडणूकीच्या पूर्वतयारीचे सविस्तर सादरीकरण केले.
राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीचे महत्व विषद करुन सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी या निवडणूका महत्वाच्या असल्याचे सांगून ते म्हणाले की, या निवडणूकीत संगणकीकरणाचा उपयोग मोठया प्रमाणात झाल्यामुळे उमेदवारांचे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गत निवडणूकीच्या तुलनेने उमेदवारांचे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण कमी  होत आहे. मतदार मोठया प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजावतील यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने राज्यात मतदारजागृती मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात मतदारांना विविध माध्यमातून  जागृत करण्यात येत आहे. पारंपारिक माध्यमे आणि आधुनिक माध्यमे वापरण्याबरोबरच मतदारांना मतदान चिठ्ठीचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने निवडणूक प्रक्रीया सुरळीत होण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, व्हिडीयो पथके, चेक पोस्ट इत्यादी प्रकारच्या उपाययोजना  कराव्यात. निवडणूक काळात होणाऱ्या मोठया  आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी बँकांची मदत घ्यावी. पोस्टल मतपत्रिकांचे वाटप वेळेवर होईल व निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांना मतदानापासून वंचित राहू लागू नये यासाठी नियोजन करावे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती करुन त्याठिकाणी जास्तीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असे सांगून उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे व नियमबाह्य बाबी दिसून आल्यास कठोर कारवाई करावी असेही आयुक्त सहारिया म्हणाले.
निवडणूकीच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील अनुषंगाने महसुल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या नियोजन करुन निवडणूकीत भयमुक्त वातावरण राहील याची दक्षता घ्यावी अशी सूचना करुन राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी विविध बाबीविषयी सखोल मार्गदर्शनही केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगर परिषद निवडणूकीत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल जिल्हाधिकारी राम, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी (अंबाजोगाई), मुख्याधिकारी रामनिवास झंवर, भिघोत आणि नगर प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बैठकीस निवडणूक निरीक्षक व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सेवा पंधरवाड्याचे आयोजन




बीड, दि. 3 :- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणी व राष्ट्रीय निवृत्तीवेतन धारकांच्या जागृती, सुविधाकरीता दि.1 ते 15 फेब्रुवारी 2017 या कालावधीमध्ये कोषागार कार्यालय, बीड येथे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. या सेवा पंधरवाड्यात आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देवून आपल्या शंकाचे समाधान करुन शकतात. एनपीएस मोबाईल ॲप डाऊनलोड करुन सुविधेचा वापर करावा. तसेच सेवा पंधरवाड्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डी.डी.माडे यांनी केले आहे.

जि.प. व पं.स. निवडणूकीबाबत जिल्हाधिकारी यांच्या विविध विभागांना पूर्वतयारीच्या सुचना



            बीड, दि. 3 :- बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पूर्व तयारीसाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना कामाचे वाटप करुन जिल्हाधिकारी बीड यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने यंत्रणा व व्यवस्था चोख करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
            राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका 2017 निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग 60 व पंचायत समिती निर्वाचक गण 120 असे असून गुरुवार दि.16 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत  मतदान होत असून मतदान समाप्तीनंतर मतमोजणी दि.23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून (ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानूसार राहिल.) तसेच निवडून आलेल्या सदस्यांची नावे मंगळवार दि.28 फेब्रुवारी 2017 पर्यंत प्रसिध्द करण्यात येतील. त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये आणि निवडणूका व मतमोजणी खुल्या वातावरणात पार पडाव्यात त्यादृष्टीने संबंधितांनी खालील प्रमाणे कार्यवाही अनुसरण्यातची सुचना देण्यात आली.

            निवडणूका निर्भय मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी लोकसभा निवडणूकांच्या वेळी ज्याप्रमाणे कार्यवाही केली जाते त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या वेळी सर्व आवश्यक बाबीवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या इमारती गळणार नाहीत व मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदान पथकास कुठल्याही अडचण येणार नाही याची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प.बीड व संबंधित बांधकाम विभागाची राहिल. मतदान केंद्र व निवडणूकीच्या वेळी पुरेसा बंदोबस्त पुरवणे व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक, बीड यांची राहिल. निवडणूक असलेल्या ठिकाणी आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी पथकाची स्थापना, तालुकास्तरीय आचारसंहिता अंमलबजावणी कक्षाची स्थापना तसेच आचारसंहिता भंगाच्या तक्रारीचा दैनंदिन अहवाल पाठविणे ही संबंधित तहसीलदार यांची जबाबदारी राहिल. मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत राहिल याची जबाबदारी अधिक्षक अभियंता, म.रा.वि.म.बीड यांची राहिल. मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदाना दिवशी, मतमोजणीच्या दिवशी निवडणूक असलेल्या क्षेत्रामधील गावासहित दारु विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील याची जबाबदारी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क,बीड यांची राहिल.  मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याची जबाबदारी संबंधित तालुका उप निबधक सहकारी संस्था यांची राहिल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे भरल्यापासून होणाऱ्या दैनिक खर्चाची माहिती संबंधित तहसील कार्यालयातील खर्च तपासणाऱ्या पथकास सादर करणे जरुरी आहे. तसेच मतमोजणी संपल्यानंतर पुढील 30 दिवसाच्या आत खर्चाचा हिशोब विहीत शपथपत्रासहीत सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांवर राहिल. तसेच मुदतीत खर्च सादर न केल्यास  त्या उमेदवारांना निरर्ह करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांची राहिल. असे जिल्हाधिकारी,  बीड यांनी संबंधिताना लेखी सुचना दिल्या  आहेत.

बीड जि.प.पं.स. निवडणूकीसाठी केंद्रीय आचारसंहिता कक्षाची स्थापना



            बीड, दि. 3 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला असून त्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार  जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटिल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9423471153 असून या आचार संहिता कक्षात एकुण 36 कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

            आचारसंहिता कक्ष 24 तास कार्यरत ठेवणे, कक्षामध्ये 1 नोडल अधिकारी व 3 अधिकारी-कर्मचारी कार्यरत असावेत, दूरचित्रवाणी संच केबल कनेक्शनसह कार्यरत ठेवावा, सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या जाहिरातीवर नजर ठेवणे, वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीची कात्रणे आयोगास पाठविणे, आचारसंहितेच्या अनुषंगाने दाखल झालेल्या तक्रारीच्याअनुषंगाने कार्यवाहीचा अहवाल रोज आयोगास सादर करण्याची जबाबदारी या आचारसंहिता कक्षाची राहिल असे निर्देश  राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नागरिकांना आचारसंहिता भंगाची तक्रार या कक्षाकडे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत बीड जिल्ह्यात 89 टक्के मतदान



            बीड, दि. 3 :- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी बीड जिल्ह्यात जवळपास 89 टक्के मतदान झाले आहे.
            औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघासाठी बीड जिल्ह्यात एकुण 60 मतदान केंद्रावर अत्यंत शांततामय वातारणात मतदान झाले. जिल्ह्यात सुमारे 10 हजार 395 मतदार असून यापैकी जवळपास 9 हजार 265 म्हणजे अंदाजे 89.13 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी मतदान प्रक्रीयेवर बारकाईने लक्ष ठेवून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. पोलीस विभागानेही कडक बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी यांनी काही मतदान केंद्राला भेटी देवून पाहणी केली.

            निवडणूकीची मतमोजणी 6 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे होणार आहे.

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

आस्थापनामधील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती न देणाऱ्या कार्यालय प्रमुखांवर कारवाई प्रस्तावित



            बीड, दि. 2 :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी, बीड आणि तालुक्यातील सर्व केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या आस्थापनेवरील कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, बीड यांच्याकडे सादर केलेली नाही. अशा संबंधित कार्यालयांना कारणे दाखवा नोटिस देण्यात येवून माहिती सादर केलेली नाही अशा कार्यालय प्रमुखावर नियमानूसार पोलीस कारवाई करण्याचे प्रस्तावित केले आहे.

            दि.27 जानेवारी 2017 रोजीच्या प्रशिक्षणासाठी जे अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहिले अशा कर्मचाऱ्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे अर्ज केले आहे अशा कर्मचाऱ्यांचे संबंधित कार्यालय प्रमुखांमार्फत स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकिय मंडळ, वैद्यकिय महाविद्यालय, अंबाजोगाई जि.बीड यांचे वैद्यकियदृष्ट्या पात्रतेचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात येवून संबंधिताचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.