शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

बीड जि.प.पं.स. निवडणूकीसाठी केंद्रीय आचारसंहिता कक्षाची स्थापना



            बीड, दि. 3 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम जाहिर झाला असून त्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार  जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आचार संहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटिल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9423471153 असून या आचार संहिता कक्षात एकुण 36 कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

            आचारसंहिता कक्ष 24 तास कार्यरत ठेवणे, कक्षामध्ये 1 नोडल अधिकारी व 3 अधिकारी-कर्मचारी कार्यरत असावेत, दूरचित्रवाणी संच केबल कनेक्शनसह कार्यरत ठेवावा, सोशल मिडियावर प्रसारित होणाऱ्या जाहिरातीवर नजर ठेवणे, वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीची कात्रणे आयोगास पाठविणे, आचारसंहितेच्या अनुषंगाने दाखल झालेल्या तक्रारीच्याअनुषंगाने कार्यवाहीचा अहवाल रोज आयोगास सादर करण्याची जबाबदारी या आचारसंहिता कक्षाची राहिल असे निर्देश  राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. नागरिकांना आचारसंहिता भंगाची तक्रार या कक्षाकडे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा