गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

आस्थापनामधील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती न देणाऱ्या कार्यालय प्रमुखांवर कारवाई प्रस्तावित



            बीड, दि. 2 :- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 कार्यक्रमाच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी, बीड आणि तालुक्यातील सर्व केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या आस्थापनेवरील कार्यरत सर्व अधिकारी, कर्मचारी यांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, बीड यांच्याकडे सादर केलेली नाही. अशा संबंधित कार्यालयांना कारणे दाखवा नोटिस देण्यात येवून माहिती सादर केलेली नाही अशा कार्यालय प्रमुखावर नियमानूसार पोलीस कारवाई करण्याचे प्रस्तावित केले आहे.

            दि.27 जानेवारी 2017 रोजीच्या प्रशिक्षणासाठी जे अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहिले अशा कर्मचाऱ्यांना नोटिस बजावण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांनी आजारी असल्याचे अर्ज केले आहे अशा कर्मचाऱ्यांचे संबंधित कार्यालय प्रमुखांमार्फत स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकिय मंडळ, वैद्यकिय महाविद्यालय, अंबाजोगाई जि.बीड यांचे वैद्यकियदृष्ट्या पात्रतेचे प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात येवून संबंधिताचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा