मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

बीड जिल्ह्यातील निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक, निवडणूक निरीक्षक तसेच संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती


बीड, दि. 7 :- औरंगाबाद विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 साठी बीड जिल्ह्यासाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून  औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधूकर राजे आर्दड यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या कार्यकक्षेत बीड, गेवराई आणि वडवणी तालुके असतील. त्यांचे सपंर्क अधिकारी म्हणून बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9422284816 असा आहे.
आष्टी, पाटोदा, शिरुर आणि केज या तालुक्यांसाठी निवडणुक निरीक्षक म्हणून औरंगाबादचे अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून लघुसिंचन उपविभाग धारुरचे उपविभागीय अधिकारी सतिष देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9823056006 असा आहे.
अंबाजोगाई, माजलगाव, परळी वैजनाथ आणि धारुर तालुक्यांसाठी  उस्मानाबादचे अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी  डॉ. बी.डी. बिक्कड यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक  9765931000 आणि 9432727212 असे आहेत.
निवडणूकीशी संबंधित उमेदवार किंवा  नागरिकांना काही अडचण असल्यास किंवा संपर्क साधावयाचा असल्यास त्यांनी वरीलप्रमाणे निवडणूक निरीक्षक अथवा त्यांच्या संपर्क अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा