शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदानासाठी सुट्टी जाहीर


बीड, दि. 10 :- मा. राज्य निवडणूक आयोगाने बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 11 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर निवडणूकांचे मतदान निवडणूक विभ्ज्ञाग (60) निर्वाचक गण (120) मध्ये दिनांक गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी होत असून राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभागीय मुंबई अधिसुचना दिनांक 8 फेब्रुवारी 2017 अन्वये मतदानाच्या दिवशी शासकीय सुटी जाहिर केली आहे.

तसेच उद्योग, उर्जा व कामगार विभाग मंत्रालय मुंबई यांचे परिपत्रक क्रमांक मतदान 2017/प्र.क्र.13/कामगार-9, दिनांक 9 फेब्रुवारी 2017 द्वारे दुकाने, खाजगी आस्थापना, निवासी हॉटेल,खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी दोन तासांची सवलत कामाच्या तासातून देण्यास सूचित केलेले आहे. सर्व संबंधितांनी याची  नोंद घेऊन त्यांच्या आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना अशी सवलत देण्याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा