गुरुवार, १६ जुलै, २०२६

पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेचे उद्घाटन

बीड दि.16(जिमाका) :- वाढत्या लोकसंख्येमुळे आणि बाजारपेठांच्या विस्तारामुळे प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी (सिंगल युज प्लास्टिक) मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेचे अधिकृत उद्घाटन पर्यावरण, वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. एकल वापर प्लास्टीक बंदी विशेष मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी सतिश सोनी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा आणि 5 नगरपंचायती अशा एकूण 11 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'सिंगल युज प्लास्टिक मुक्त शहर' ही संकल्पना राबवली जात आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेची अंमलबजावणी पुढील 3 टप्प्यात केली जाईल. टप्पा 1 मध्ये 15 ते 25 जुलै कालावधीत व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येईल. टप्पा 2 मध्ये 26 जुलै ते 5 ऑगस्ट कालावधीत व्यापारी प्रतिष्ठाने आणि बाजारपेठांमध्ये विशेष तपासणी व दंडात्मक कारवाई राबविण्यात येईल. तर टप्पा 3 मध्ये 6 ते 15 ऑगस्ट कालावधीत प्लास्टिकमुक्त शहर संकल्पनेतंर्गत विविध विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कापडी व पर्यावरणपूरक पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देणे. व्यापारी, शाळा, महाविद्यालये आणि स्वयंसेवी संस्थांना मोहिमेत जोडणे. प्लास्टिक संकलन करणे आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे. ही मोहिमेची वैशिष्ट्ये आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी संभाजी वाघमारे यांनी यावेळी दिली. सार्वजनिक आरोग्य आणि घनकचरा व्यवस्थापनासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. -*-*-*-*-

बुधवार, ८ जुलै, २०२६

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभासाठी ‘अॅग्रीस्टॅक’ नोंदणी बंधनकारक बीड, दि.8 (जिमाका) :- राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आता आधार कार्ड आणि अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या क्रमांकाशिवाय कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळणार नाही. तरी बीड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ही नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक सतिश तोटावार यांनी केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज, जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत होते आणि 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना लाभ मिळेल. जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, एका किंवा अनेक बँकांमधील मिळून जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची मुद्दल व व्याजासह थकबाकी थेट कर्ज खात्यात जमा करून शेतकरी कर्जमुक्त केले जातील. तसेच ज्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत पीक कर्जाची उचल करून वेळेत परतफेड केली आहे, त्यांना कमाल 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी प्रथम आपला आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार लिंक झाल्यानंतर अॅग्रीस्टॅक पोर्टलवर जाऊन आपली नोंदणी पूर्ण करावी. नोंदणीनंतर मिळणारा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आपल्या पीक कर्ज खाते असलेल्या बँकेत जमा करावा. ज्या शेतकऱ्यांकडे आधीपासूनच हा नोंदणी क्रमांक उपलब्ध आहे, परंतु त्यांनी तो अद्याप बँकेत जमा केलेला नाही, त्यांनीही तो त्वरित बँकेकडे सुपूर्द करावा. या क्रमांकाशिवाय कोणत्याही परिस्थितीत योजनेचा लाभ खात्यात जमा होणार नसल्याने शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. असेही जिल्हा उपनिबंधक, बीड यांनी कळविले आहे. -*-*-*-*- वृत्त क्र. :278 दिनांक : 8 जुलै 2026 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वितरीत बीड, दि.8 (जिमाका) :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 23 व्या हप्त्याअंतर्गत दि.20 जुन 2026 रोजी बीड जिल्ह्यातील पात्र 3,79,398 लाभार्थी शेतकऱ्यांना 75,87, 96, 000 रुपये वितरीत करण्यात आले आहेत. अशी माहिती पीएम किसान जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी दिली. बीड जिल्ह्यात तालुकानिहाय शेतकरी लाभार्थी संख्या अंबाजोगाई-31205, आष्टी-45836, बीड-57999, धारुर-18612, गेवराई-57609, केज-44724, माजलगाव-33238, परळी-26343, पाटोदा -22684, शिरुर कासार-26536, आणि वडवणी-15612 या प्रमाणे आहे. असेही कळविले आहे. -*-*-*-*- वृत्त क्र. :279 दिनांक : 8 जुलै 2026 इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या उमेदवारांना आवाहन बीड, दि.8 (जिमाका) :- राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत विविध 13 उपकंपन्यांमार्फत बीड जिल्ह्यात सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे बीड जिल्हा व्यवस्थापक बी. एस. भोसले यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ या महामंडळाअंतर्गत मुख्य महामंडळ, कंपनी व 13 उपकंपन्या मार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 20 टक्के बिज भांडवल कर्ज योजना, 1 लक्ष थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व महिला स्वंयसिध्दी व्याज परतावा योजना अशा एकुण सहा योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी 1 लक्ष थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व महिला स्वंयसिध्दी व्याज परतावा योजना या पुर्णपणे ऑनलाईन स्वरुपाच्या असुन इतर मागास प्रवर्गातील पात्र अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. उर्वरीत बिजभांडवल योजना हि ऑफलाईन स्वरुपाच्या असून त्याचे अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. याबात अधिक माहितीकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्रामगृहासमोर, नगर रोड, बीड दुरध्वनी क्रमांक 02442-232624 येथे संपर्क साधावा, असेही कळविले आहे. -*-*-*-*-

गुरुवार, २ जुलै, २०२६

सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी अर्ज करावेत

बीड, दि.2 (जिमाका) :- राज्यस्तरीय योजनेअंतर्गत नवीन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पात्र गोशाळांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासन निर्णयामधील तरतुदींनुसार बीड जिल्ह्यातील केवळ केज तालुक्यातुन पात्र असणाऱ्या गोशाळांचे अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. आर. डी. कदम यांनी दिली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश, लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती, निवड प्रक्रिया तसेच अर्जाचा विहित नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अधिकृत https://schemes.mahagosevaayog.org/revised/govardhan-govansh-application या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र गोशाळांनी आपले अर्ज दि. 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*- वृत्तक्र. :274 दिनांक : 2 जुलै 2026 हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी बीड, दि.2 (जिमाका) :- माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या ज माती विकास महामंडळाच्या बीड जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भुषण पवार, श्रीमती बांगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती बोराडे, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवाडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी बीड, दि.2 (जिमाका) :- माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या ज माती विकास महामंडळाच्या बीड जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भुषण पवार, श्रीमती बांगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती बोराडे, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवाडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी बीड, दि.2 (जिमाका) :- माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या ज माती विकास महामंडळाच्या बीड जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भुषण पवार, श्रीमती बांगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती बोराडे, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवाडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

विशेष लेख

विशेष लेख : 01 दिनांक : 2 जुलै 2026 शेतकरी हिताला प्राधान्य देणारी कर्जमुक्ती… राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करणारी घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 या अंतर्गत निसर्गाची सर्व रुपे झेलत शेतात राबून आपल्यासाठी अन्न धान्य उत्पादन करणाऱ्या बळीराजाला वेगवेगळया संकटांना सामोरे जावे लागते. या बळीराजाला समर्पित अशी ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे. आपला देश मौसमी हवामानाच्या प्रदेशात आहे आणि बदलते ऋतूचक्र आणि वेळोवेळी येणारी नैसर्गिक आव्हाने झेलत शेती करणे अतिशय कष्टाचे काम आहेच सोबतच लहरी निसर्गाने अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी तर कधी गारपीट याने पेरलं ते उगवलं तरी त्याला बाजारपेठ मिळणं व योग्य भाव मिळणं यांच संकट त्याच्यासमोर असतं. सतत तणाव सहन करीत शेतकरी मेहनत करीत असताना आणि त्याच्या कष्टाचं मोल जाणून कर्जमुक्तीची योजना शासनाने आणली आहे. शासनाने याबाबत जे निकष लावले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहे. यात कर्जमुक्तीची व्याप्ती अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशीच ठेवण्यात आली आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग या विभागांकडे याची अंमलबजावणी सोपविण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतर पध्दतीने अर्थात डीबीटी अंतर्गत याचा लाभ मिळणार आहे. दोन लाख किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यात कर्जाची थकीत रक्कम थेट लाभ स्वरुपात प्राप्त आहे. यासाठी त्याचे बँक खाते आणि आधार क्रमांक संलग्न असणे आवश्यक आ हे. जे शेतकरी नियमितपणे कर्जाचा हप्ता बँकेत नियमितपणे भरतात त्या सर्वांना प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे त्यानुसार अशा शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहन स्वरुपात दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने शेतकरी केंद्रस्थानी ठेवत अने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आणि त्यासाठी विशेष योजना तयार करुन त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होवून याचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा असे प्रयत्न केले आहेत. आजवरच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हा कर्जमुक्तीचा निर्णय शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यास मदत तर करणार आहेच सोबतच यातून नवी वाट त्यांना मिळेल याचाही या निर्णयात विचार झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेला देण्यात आले आहे. यालाही विशेष महत्व आहे. लोककल्याणकारी शासन, जलसंधारण, सिंचन आणि ग्रामीण विकासाचा विचार करणाऱ्या आणि शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्षात हा निर्णय घेण्यात आला याला विशेष महत्व आहे. - प्रशांत दैठणकर प्र.उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी, बीड -*-*-*-*-