सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

9 फेब्रुवारी रोजी रेडिओ किसान दिन कार्यक्रम


            बीड, दि. 6 :- आकाशवाणी केंद्र, बीड आणी प्रकल्प संचालक आत्मा यांच्यावतीने गुरुवार दि. 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बळीराजा प्रशिक्षण केंद्र वडवाडी ता.जि.बीड येथे किसानवाणी दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

            कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधिकारी नवल किशोर राम , सेवा निवृत्त औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगटमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी रमेश भताने आणी आत्माचे प्रकल्प संचालक भास्कर कोळेकर उपस्थित राहणार आहेत. किसानवाणी दिनाच्या निमित्ताने बीड जिल्हयातील प्रगतीशील शेतक-यांना किसान मित्र पुरस्कार देवून गौरण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ परभणी येथील कृषी विध्यावेत्ता डॉ. ए.व्ही.गुटटे, डॉ.विलास टाकणखार, सहयोगी प्राध्यापक कृ.म.अंबाजोगाई / डॉ. शैलेश केंडे सहा. उपायोक्त्‍पशुसंवर्धन आणी दुग्धशास्त्र विभाग आणी भास्कर कोळेकर प्रकल्प संचालक आत्मा उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला शेतक-यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा आणी आकाशवाणी बीड चे सहा. संचालक विजय सपकाळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा