बीड,
दि. 7 :- माहे
फेब्रुवारी 2017
महिन्यासाठीचे जिल्ह्यातील पात्र घाऊक, अर्धघाऊक व तालुकानिहाय वाटप करण्यासाठी 1296 के.एल. नियतन बीड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात
आले आहे. रॉकेलच्या घाऊक विक्रेत्यांनी महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत 60 टक्के,
11 ते 17 तारखेपर्यंत 85 टक्के तर 18 ते 25 तारखेपर्यंत 100 टक्के रॉकेलची उचल करावी. तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या रॉकेलचे नियतन
याप्रमाणे.
आष्टी-141
के.एल, पाटोदा-66,
शिरुर-57,
बीड-204
गेवराई-165,
माजलगाव-135,
वडवणी-72,
धारुर-84,
केज-108,
अंबाजोगाई-141 तर
परळी तालुक्यासाठी 123
के.एल. रॉकेलचे मासिक नियतन मंजूर करण्यात आले आहे. सर्व विक्रेत्यांनी रॉकेल पुरवठा झाल्याचे दर्शनी
भागात सूचना फलकावर ग्राहकांच्या माहितीसाठी लावावी. त्याचबरोबर घाऊक अथवा अर्धघाऊक रॉकेल डिलर्स यांच्याकडून
वितरण व्यवस्थेसंदर्भात गंभीर स्वरुपाचे दोष आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक
वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये कारवाई करावी. त्याचबरोबर तहसिलच्या पुरवठा विभागाने दुकानांना
अचानक भेटी देऊन रॉकेल पुरवठ्याबाबत खात्री करावी. तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे
जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.
-*-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा