बीड, दि.
3 :- बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पूर्व तयारीसाठी
विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना कामाचे वाटप करुन जिल्हाधिकारी बीड यांनी सर्व संबंधित
विभागाच्या अधिकाऱ्यांना मतदान व मतमोजणीच्या अनुषंगाने यंत्रणा व व्यवस्था चोख करण्याच्या
सुचना दिल्या आहेत.
राज्य
निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक
निवडणूका 2017 निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक विभाग 60 व पंचायत समिती
निर्वाचक गण 120 असे असून गुरुवार दि.16 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान होत असून मतदान समाप्तीनंतर मतमोजणी दि.23
फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून (ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार
निश्चित करतील त्यानूसार राहिल.) तसेच निवडून आलेल्या सदस्यांची नावे मंगळवार दि.28
फेब्रुवारी 2017 पर्यंत प्रसिध्द करण्यात येतील. त्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
उदभवू नये आणि निवडणूका व मतमोजणी खुल्या वातावरणात पार पडाव्यात त्यादृष्टीने संबंधितांनी
खालील प्रमाणे कार्यवाही अनुसरण्यातची सुचना देण्यात आली.
निवडणूका
निर्भय मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी लोकसभा निवडणूकांच्या वेळी ज्याप्रमाणे
कार्यवाही केली जाते त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांच्या वेळी सर्व
आवश्यक बाबीवर कार्यवाही करणे आवश्यक आहे. मतदान केंद्राच्या इमारती गळणार नाहीत व
मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदान पथकास कुठल्याही अडचण येणार नाही याची जबाबदारी उपमुख्य
कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प.बीड व संबंधित बांधकाम विभागाची राहिल. मतदान केंद्र
व निवडणूकीच्या वेळी पुरेसा बंदोबस्त पुरवणे व प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जबाबदारी
पोलीस अधिक्षक, बीड यांची राहिल. निवडणूक असलेल्या ठिकाणी आचारसंहितेची अंमलबजावणीसाठी
पथकाची स्थापना, तालुकास्तरीय आचारसंहिता अंमलबजावणी कक्षाची स्थापना तसेच आचारसंहिता
भंगाच्या तक्रारीचा दैनंदिन अहवाल पाठविणे ही संबंधित तहसीलदार यांची जबाबदारी राहिल.
मतदानाच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या दिवशी, मतमोजणीच्या दिवशी विद्युत पुरवठा सुरळीत
राहिल याची जबाबदारी अधिक्षक अभियंता, म.रा.वि.म.बीड यांची राहिल. मतदानाच्या आदल्या
दिवशी, मतदाना दिवशी, मतमोजणीच्या दिवशी निवडणूक असलेल्या क्षेत्रामधील गावासहित दारु
विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद राहतील याची जबाबदारी अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क,बीड यांची
राहिल. मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याची
जबाबदारी संबंधित तालुका उप निबधक सहकारी संस्था यांची राहिल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी
नामनिर्देशनपत्रे भरल्यापासून होणाऱ्या दैनिक खर्चाची माहिती संबंधित तहसील कार्यालयातील
खर्च तपासणाऱ्या पथकास सादर करणे जरुरी आहे. तसेच मतमोजणी संपल्यानंतर पुढील 30 दिवसाच्या
आत खर्चाचा हिशोब विहीत शपथपत्रासहीत सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांवर राहिल.
तसेच मुदतीत खर्च सादर न केल्यास त्या उमेदवारांना
निरर्ह करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांची राहिल.
असे जिल्हाधिकारी, बीड यांनी संबंधिताना लेखी
सुचना दिल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा