बीड, दि.
4 :- जि.प.पं.स. निवडणूक 2017 अंतर्गत बीड, गेवराई, वडवणी तालुक्यांसाठी राज्य निवडणूक
आयोगाने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक तथा औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.6 फेब्रुवारी
2017 रोजी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथून गेवराईकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते 12.30 वाजता
गेवराई येथे आगमन प्राप्त नामनिर्देशन पत्रांचा आढावा, निवडणूक कामाचा निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी
यांच्या समवेत बैठक आढावा व बीडकडे प्रयाण. दुपारी 1.15 ते 2.15 वाजता बीड येथे आगमन व बीड तालुक्यात प्राप्त नामनिर्देशन
पत्राच्या अनुषंगाने आढावा, निवडणूक कामाचा निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी
यांचे समवेत बैठक आढावा. दुपारी 2.15 ते 3.15 वाजता राखीव व वडवणीकडे प्रयाण. दुपारी
3.15 ते 4.15 वाजता वडवणी येथे आगमन व वडवणी तालुक्यातील प्राप्त नामनिर्देशन पत्राच्या
अनुषंगाने आढावा, निवडणूक कामाचा निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या
समवेत बैठक आढावा. दुपारी 4.30 वाजता बीडकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता बीड येथे
आगमन व मुक्काम.
मंगळवार दि.7 फेब्रुवारी
2017 रोजी सकाळी 10 ते 11.30 वाजता जिल्हाधिकारी यांची भेट व प्राप्त हरकतीचा आढावा,
निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या समवेत उमेदवारी अर्ज (अपील नसलेले)
माघार घेतलेल्या नामनिर्देशनाचा आढावा. सकाळी 11.30 वाजता वडवणीकडे प्रयाण. दुपारी
12.30 ते 1.30 वाजता वडवणी येथे आगमन उमेदवारी अर्ज (अपील नसलेले) माघार घेतलेल्या
नामनिर्देशनाचा आढावा. दुपारी 1.30 ते 2.30 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता गेवराईकडे
प्रयाण. दुपारी 4.15 ते सायंकाळी 5.30 वाजता गेवराई येथे आगमन उमेदवारी अर्ज (अपील
नसलेले) माघार घेतलेल्या नामनिर्देशनाचा आढावा व निवडणूक पूर्व तयारी कामाचा आढावा.
दुपारी 5.30 वाजता गेवराई येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा