गुरुवार, २ जुलै, २०२६
सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी अर्ज करावेत
बीड, दि.2 (जिमाका) :- राज्यस्तरीय योजनेअंतर्गत नवीन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पात्र गोशाळांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासन निर्णयामधील तरतुदींनुसार बीड जिल्ह्यातील केवळ केज तालुक्यातुन पात्र असणाऱ्या गोशाळांचे अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. आर. डी. कदम यांनी दिली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश, लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती, निवड प्रक्रिया तसेच अर्जाचा विहित नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अधिकृत https://schemes.mahagosevaayog.org/revised/govardhan-govansh-application या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र गोशाळांनी आपले अर्ज दि. 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्तक्र. :274 दिनांक : 2 जुलै 2026
हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
बीड, दि.2 (जिमाका) :- माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या ज माती विकास महामंडळाच्या बीड जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भुषण पवार, श्रीमती बांगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती बोराडे, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवाडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी बीड, दि.2 (जिमाका) :- माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या ज माती विकास महामंडळाच्या बीड जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भुषण पवार, श्रीमती बांगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती बोराडे, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवाडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-
हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
बीड, दि.2 (जिमाका) :- माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या ज माती विकास महामंडळाच्या बीड जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भुषण पवार, श्रीमती बांगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती बोराडे, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवाडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
विशेष लेख
विशेष लेख : 01 दिनांक : 2 जुलै 2026
शेतकरी हिताला प्राधान्य देणारी कर्जमुक्ती…
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी करणारी घोषणा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 या अंतर्गत निसर्गाची सर्व रुपे झेलत शेतात राबून आपल्यासाठी अन्न धान्य उत्पादन करणाऱ्या बळीराजाला वेगवेगळया संकटांना सामोरे जावे लागते. या बळीराजाला समर्पित अशी ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे.
आपला देश मौसमी हवामानाच्या प्रदेशात आहे आणि बदलते ऋतूचक्र आणि वेळोवेळी येणारी नैसर्गिक आव्हाने झेलत शेती करणे अतिशय कष्टाचे काम आहेच सोबतच लहरी निसर्गाने अवेळी येणारा पाऊस, अतिवृष्टी तर कधी गारपीट याने पेरलं ते उगवलं तरी त्याला बाजारपेठ मिळणं व योग्य भाव मिळणं यांच संकट त्याच्यासमोर असतं. सतत तणाव सहन करीत शेतकरी मेहनत करीत असताना आणि त्याच्या कष्टाचं मोल जाणून कर्जमुक्तीची योजना शासनाने आणली आहे.
शासनाने याबाबत जे निकष लावले आहेत ते जाणून घेणे महत्वाचे आहे. यात कर्जमुक्तीची व्याप्ती अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशीच ठेवण्यात आली आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग या विभागांकडे याची अंमलबजावणी सोपविण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतर पध्दतीने अर्थात डीबीटी अंतर्गत याचा लाभ मिळणार आहे.
दोन लाख किंवा त्यापेक्षा कमी कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याला त्याच्या बँक खात्यात कर्जाची थकीत रक्कम थेट लाभ स्वरुपात प्राप्त आहे. यासाठी त्याचे बँक खाते आणि आधार क्रमांक संलग्न असणे आवश्यक आ हे. जे शेतकरी नियमितपणे कर्जाचा हप्ता बँकेत नियमितपणे भरतात त्या सर्वांना प्रोत्साहन देण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे त्यानुसार अशा शेतकरी बांधवांना त्यांच्या बँक खात्यात 50 हजार रुपये प्रोत्साहन स्वरुपात दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने शेतकरी केंद्रस्थानी ठेवत अने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आणि त्यासाठी विशेष योजना तयार करुन त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होवून याचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा असे प्रयत्न केले आहेत. आजवरच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हा कर्जमुक्तीचा निर्णय शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यास मदत तर करणार आहेच सोबतच यातून नवी वाट त्यांना मिळेल याचाही या निर्णयात विचार झाला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव या योजनेला देण्यात आले आहे. यालाही विशेष महत्व आहे. लोककल्याणकारी शासन, जलसंधारण, सिंचन आणि ग्रामीण विकासाचा विचार करणाऱ्या आणि शेतकरी हितासाठी काम करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्षात हा निर्णय घेण्यात आला याला विशेष महत्व आहे.
- प्रशांत दैठणकर
प्र.उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी, बीड
-*-*-*-*-
बुधवार, १० जून, २०२६
वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे - जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
* बीड जिल्ह्यात 29.50 लक्ष रोपे तयार
* ‘एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम
* 300 कोटी वृक्षारोपणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
बीड, दि.10 (जिमाका): राष्ट्रीय वन धोरण 1988 च्या उद्दिष्टानुसार राज्याचे वनाच्छादन आणि वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यात 300 कोटी वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यामध्ये आगामी 2026 च्या पावसाळ्यासाठी प्रशासनाने विभागनिहाय वृक्ष लागवडीचे विशेष उद्दिष्ट निश्चित केले असून, संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात वर्ष 2026 च्या पावसाळ्यातील वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रभुदय मुळे, विभागीय वन अधिकारी एस.एम. लखमावाड, प्रादेशिक अधिकारी ए.डी.गरकल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, वर्ष 2026 ते 2047 या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवड अभियाना दरम्यान परिणाम आधारित अंमलबजावणी आराखड्याचा अवलंब करणार आहे, ज्यामध्ये वृक्ष 10 वर्षापर्यंत जतन व संवर्धनाची तरतूद असणार आहे. जेणेकरून लागवड केलेल्या वृक्षांचे दीर्घकालीन अस्तित्त्व आणि वाढ सुनिश्चित होण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील वृक्षारोपण कार्यक्रमात केवळ शासकीय यंत्रणाच नव्हे, तर पर्यावरण स्नेही स्वयंसेवी संस्था यांनाही मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यात यावे. सर्वच विभागांना नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच शालेय स्तरावर एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करावी. अशा सूचनाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केल्या.
वर्ष 2026 ते 2047 या दीर्घकालीन कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शासनाने हरित महाराष्ट्र आयोग या विशेष उद्देशीय स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणेची स्थापना केली आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या जिल्हा पातळीवरील प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नियमित देखरेखीसाठी विशेष सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा स्वतः जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी यांच्याकडे या समितीचे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेसाठी सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर रोपनिर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाकडे 20 लक्ष तर प्रादेशिक वनविभागाकडे 9.50 लक्ष अशी एकूण 29.50 लक्ष रोपे सध्या उपलब्ध असल्याची माहिती उपवनसंरक्षक श्री. बिराजदार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे बैठकीत दिली.
-*-*-*-*-
सारथी संस्थेच्या संशोधकांनी राबविली किल्ले धारूर येथे स्वच्छता मोहीम
बीड,दि.10 (जिमाका) :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीने बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले धारूर येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील आणि उपव्यवस्थापकीय संचालक सुवर्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ६ आणि ८ जून २०२६ रोजी ही मोहीम पार पडली. या मोहिमेदरम्यान एकूण सहा पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी किल्ला परिसरातून सुमारे ८ किलो प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा केला.
राजर्षी शाहू महाराजांची जयंती २६ जून रोजी असून, त्यानिमित्त सारथी संस्थेच्या वतीने २६ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून १ ते ७ जून दरम्यान अधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नजीकच्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. धारूर किल्ल्यावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी किल्ला आणि परिसर पिंजून काढत ४ गोणी कचरा गोळा केला. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तूंचा समावेश होता. संकलित केलेला सर्व कचरा धारूर प्रशासनाच्या सहकार्याने योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आला.
या मोहिमेत सारथी संस्थेच्या ६ पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या मोहिमेचे नेतृत्व गटप्रमुख रामेश्वर झोडगे आणि गटप्रमुख वैशाली घोलप यांनी केले. त्यांच्यासह इतर सदस्यांनी दिलेल्या योगदानामुळे ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
_*_*_*_*_
बुधवार, ३ जून, २०२६
बीड एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती
बीड,दि.3 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागीय कार्यालयाअंतर्गत सन 2026-27 या सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत थेट कामाचा अनुभव मिळविण्याची सुवर्णसंधी बीड जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना या निमित्ताने मिळणार आहे. कौशल्याधारित रोजगाराला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या अधिकृत एम.आय.एस पोर्टलच्या नियमानुसार ही भरती होत आहे. ही निवड प्रक्रिया प्रथम ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी केंद्र सरकारच्या अधिकृत Apprenticeship India.org या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यावी. इंटरनेट किंवा तांत्रिक अडचणी असल्यास उमेदवारांनी थेट विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, बीड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी महामंडळाच्या ०२४४२-२२२५८० या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बीड एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
_*_*_*_*_
वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (HSRP) नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक
बीड, दि.3 (जिमाका) :- केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना दि. 30 जून 2026 पर्यंत ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी धनवे यांनी दिली आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या 6 डिसेंबर 2018 रोजीच्या राजपत्रानुसार, 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट इन-बिल्ट म्हणजेच कंपनीकडूनच बसवून देणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, आता 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व खाजगी तसेच शासकीय वाहनांनाही ही नंबर प्लेट बसवण्यासाठी दि. 30 जून 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या नियमाच्या पार्श्वभूमीवर, सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना विशेष पत्रान्वये सूचित करण्यात आले आहे. आपल्या कार्यालयाच्या अभिलेखावर नोंद असलेल्या आणि 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या सर्व शासकीय वाहनांना विहित मुदतीत म्हणजेच दि. 30 जून 2026 पूर्वी उच्च श्रेणी नोंदणी पाटी बसवून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुदतीपूर्वी हे काम पूर्ण झाल्यास या संदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करणे सोयीचे होईल, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली जनगणना प्रगणकाला स्वतःची माहिती
*सक्रिय सहभागातून करून दिली कर्तव्याची माहिती
बीड, दि.3 (जिमाका) :- बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बुधवार दि. 3 जून 2026 रोजी आपल्या शासकीय निवासस्थानी आलेल्या जनगणना प्रगणकाला स्वतःची व कुटुंबाची संपूर्ण माहिती देऊन नोंदणी पूर्ण केली. या औपचारिक नोंदणीसह बीड जिल्ह्यात जनगणनेच्या राष्ट्रीय मोहिमेला गती मिळाली आहे.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात जनगणनेचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. शासकीय योजनांचे अचूक नियोजन, आखणी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य आधार आहे. जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया मानली जाते. लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, निवास, आरोग्य यासारखी महत्त्वाची माहिती जनगणनेतून मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची नोंद होणे हे देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. आपल्या घरी येणाऱ्या जनगणना प्रगणकाला कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता अचूक, खरी आणि योग्य माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. नागरिकांनी दिलेल्या या सकारात्मक सहकार्यामुळेच ही राष्ट्रीय मोहीम पूर्णपणे यशस्वी होईल, असा दृढ विश्वासही विवेक जॉन्सन यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी जनगणनेशी संबंधित प्रगणक, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
_*_*_*_*_
शुक्रवार, २२ मे, २०२६
विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्यसंस्था
मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
बीड, दि.22 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने ( उस्मानाबाद-लातूर-बीड ) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक-2026 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. याबाबत धाराशिव जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.
निवडणुकीची अधिसूचना दि. 25 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 1 जून 2026 आहे. अर्जांची छाननी दि. 2 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. मतदान दि. 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी सोमवार दि. 22 जून 2026 रोजी होईल. निवडणूक प्रक्रिया दि. 25 जून 2026 रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
बुधवार, २० मे, २०२६
जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी - जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
बीड जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न
बीड, दि.20 (जिमाका) :- जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने चोख नियोजन करावे. तसेच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, प्र.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, कृषी उपसंचालक दादाराव जाधव यांच्यासह संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या तसेच विशिष्ट कंपनीचे उत्पादन घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी. कृषी विभागाच्या भरारी पथकांनी वेळोवेळी कृषी केंद्रांना भेट देऊन तपासणी करावी, तसेच टोल फ्री क्रमांकावर प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. बोगस बियाणांची विक्री रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. कृषी केंद्र दुकानदारांनी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांवर कोणतीही अट लादू नये, अन्यथा संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यात गायरान जमिनीसह इतर ठिकाणी चारा लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच पोकरा योजनेअंतर्गत रेशीम उत्पादनासाठी क्षेत्रवाढ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पीक कर्ज वितरणाबाबतही त्यांनी बँक अधिकाऱ्यांना सूचना देत जिल्ह्यात 100 टक्के पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण करण्यावर भर दिला. कर्ज वितरणात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर नियमानुसार कार्यवाही प्रस्तावित केली जाईल, असे ही त्यांनी सांगितले.
सुरुवातीस प्रास्ताविकात आत्माचे प्रकल्प संचालक तथा प्र. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी खरीप हंगाम जून 2026 पासून सुरू होत असल्याची माहिती दिली. यात बीड जिल्ह्यात 10.68 लाख हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून सरासरी 8.85 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवड केली जाते. असे सांगून त्यांनी बि-बियाणांसह खत साठ्याची माहिती, पिक विमा, पिक कर्ज, मृदा तपासणी, शेतकरी अनुदान वाटप याची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेतीसाठी पोकरा योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असून उत्पादनवाढीसाठी विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
_*_*_*_*_
मंगळवार, १९ मे, २०२६
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश सुरू
बीड, दि. 19 (जिमाका) :- अंबाजोगाई शहरात शिक्षण घेत असलेल्या इयत्ता आठवी पासून पुढील वर्गातील सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अंबाजोगाई येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावेत. काही अडचण आल्यास गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह अंबाजोगाई यांच्याशी संपर्क करावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
तृतीयपंथीयांना बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बीड, दि. 19 (जिमाका) :- तृतीयपंथीय बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळण्यासोबतच त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आर्थिक वर्ष 2026-27 पासून तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय बीज भांडवल योजना लागू करण्यात आली आहे. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी केले आहे.
बीज भांडवल योजनेतर्गत 18 ते 50 वयोगटातील तृतीयपंथीयांना 25 हजार रुपये ते 2 लाखापर्यंतच्या व्यवसायासाठी अर्थसाह्य देण्यात येते. यामध्ये लघु कर्ज योजना, मध्यम कर्ज योजना व दीर्घ कर्ज योजना असे कर्जाचे एकूण तीन प्रकार आहेत. त्यासाठी अनुक्रमे 25 हजार रुपये, 50 हजार रुपये व 2 लाख रुपये अशी आर्थिक मर्यादा विहीत करण्यात आली आहे. या योजनेतून भाजी स्टॉल, चहा/स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स/लॅमिनेशन सेंटर, फ्रूट स्टॉल, पिठाची गिरणी, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मिनी मालवाहतूक टेम्पो, पिठाची गिरणी, वडापाव/ज्यूस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, सलून/ब्युटी पार्लर, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे, लॉन्ड्री/धोबी व्यवसाय, चिकन/मासे विक्री केंद्र, बटाटा वेफर्स बनविणे इत्यादी व्यवसायासाठी कर्ज देय आहे.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये लाभार्थी हिस्सा 5 टक्के, राष्ट्रीयकृत बँकेकडून विहित व्याजदराने 50 टक्के कर्ज व 45 टक्के शासन अनुदानाचा समावेश आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित तृतीयपंथीय व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा किमान दहा वर्ष रहिवासी असणे आवश्यक आहे. संबंधिताकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. या कर्ज योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची तसेच कोणत्याही प्रकारचे तारण ठेवायची गरज नाही. संबंधित लाभार्थी निवडीचे अधिकार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखालील समितीस आहेत. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
बीड, दि. 19 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड मार्फत जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा युवा पुरस्कार, जिल्ह्यातील 1 युवक व 1 युवतीस प्रत्येकी रोख रक्कम 10 हजार रूपये, गौरवपत्र सन्मानचिन्ह पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेसाठी संस्था ही सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबध्द असाव्यात. संस्थेसाठी पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 50 हजार रूपये गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील एकुण सात वर्षाच्या पुरस्कारासाठी दि. 12 मे 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र पुरस्कार प्रस्ताव प्राप्त होण्याच्या अल्प प्रतिसादामुळे दि. 25 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे.
वर्ष 2019-20 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2018 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2020 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2020-21 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2019 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2021 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2021-22 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2020 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2022 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2022-23 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2021 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2023 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2023-24 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दिनांक 01 एप्रिल 2022 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2024 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे, सन 2024-25 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 01 एप्रिल 2023 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2025 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे, सन 2025-26 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 01 एप्रिल 2024 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2026 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे, बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथून अथवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दि. 19 मे 2026 पर्यंत परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी कालिदास होसुरकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
समाज कल्याण विभागाचे आवाहन स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी अंतिम संधी
समाज कल्याण विभागाचे आवाहन
स्वाधार योजनेच्या लाभार्थ्यांना
त्रुटी पुर्ततेसाठी अंतिम संधी
बीड, दि. 19 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी सुधारण्यासाठी शनिवार दि.30 मे 2026 पर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे. अंतिम संधी असल्याने विहीत मुदतीत त्रुटीची पूर्तता न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज हे कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात येतील, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी केले आहे.
इयत्ता अकरावी आणि त्यापुढील व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळण्यासाठी पात्र आहेत, मात्र जागांअभावी त्यांना प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेता यावे यासाठी ही योजना राबविली जाते. या योजनेतून विद्यार्थ्यांना भोजनभत्ता, निवासभत्ता आणि निर्वाहभत्ता या स्वरूपात थेट आर्थिक मदत दिली जाते.
चालू शैक्षणिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रांच्या त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटींची माहिती संबंधित विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन लॉगिनवर पाठविण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप या त्रुटींची पूर्तता केलेली नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी समाजकल्याण विभागाने दि. 30 मे 2026 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनवर ऑनलाईन पद्धतीने त्रुटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे. मुदतीनंतर कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या ऑनलाईन लॉगिनवर जाऊन त्रुटी तपासाव्यात आणि त्या दुरुस्त कराव्यात. ऑनलाईन पूर्तता केल्यानंतर संबंधित कागदपत्रांची हार्डकॉपी घेऊन ती विहीत वेळेत सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड या कार्यालयात जमा करावी. तरी पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ या प्रक्रियेची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
-*-*-*-*-
वृत्त क्र. : दिनांक : 19 मे 2026
जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज
सादर करण्यास मुदतवाढ
बीड, दि. 19 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड मार्फत जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण क्षेत्रात कार्य करणारे युवक, युवती व नोंदणीकृत संस्थांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनातर्फे जिल्हा युवा पुरस्कार, जिल्ह्यातील 1 युवक व 1 युवतीस प्रत्येकी रोख रक्कम 10 हजार रूपये, गौरवपत्र सन्मानचिन्ह पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेसाठी संस्था ही सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 नुसार पंजीबध्द असाव्यात. संस्थेसाठी पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 50 हजार रूपये गौरवपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मागील एकुण सात वर्षाच्या पुरस्कारासाठी दि. 12 मे 2026 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. मात्र पुरस्कार प्रस्ताव प्राप्त होण्याच्या अल्प प्रतिसादामुळे दि. 25 मे 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली आहे.
वर्ष 2019-20 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2018 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2020 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2020-21 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2019 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2021 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2021-22 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2020 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2022 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2022-23 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 1 एप्रिल 2021 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2023 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. सन 2023-24 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दिनांक 01 एप्रिल 2022 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2024 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे, सन 2024-25 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 01 एप्रिल 2023 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2025 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे, सन 2025-26 च्या जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 01 एप्रिल 2024 रोजी 13 वर्षे पुर्ण व 31 मार्च 2026 रोजी 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे, बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक, युवतींनी व नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथून अथवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. 12 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह आपले प्रस्ताव दि. 19 मे 2026 पर्यंत परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी कालिदास होसुरकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त क्र. : दिनांक : 19 मे 2026
तृतीयपंथीयांना बीज भांडवल
योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बीड, दि. 19 (जिमाका) :- तृतीयपंथीय बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळण्यासोबतच त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आर्थिक वर्ष 2026-27 पासून तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसाय बीज भांडवल योजना लागू करण्यात आली आहे. तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप भोगले यांनी केले आहे.
बीज भांडवल योजनेतर्गत 18 ते 50 वयोगटातील तृतीयपंथीयांना 25 हजार रुपये ते 2 लाखापर्यंतच्या व्यवसायासाठी अर्थसाह्य देण्यात येते. यामध्ये लघु कर्ज योजना, मध्यम कर्ज योजना व दीर्घ कर्ज योजना असे कर्जाचे एकूण तीन प्रकार आहेत. त्यासाठी अनुक्रमे 25 हजार रुपये, 50 हजार रुपये व 2 लाख रुपये अशी आर्थिक मर्यादा विहीत करण्यात आली आहे. या योजनेतून भाजी स्टॉल, चहा/स्नॅक्स सेंटर, झेरॉक्स/लॅमिनेशन सेंटर, फ्रूट स्टॉल, पिठाची गिरणी, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी शॉप, मिनी मालवाहतूक टेम्पो, पिठाची गिरणी, वडापाव/ज्यूस सेंटर, बेकरी व्यवसाय, बांगडी दुकान, सलून/ब्युटी पार्लर, मोबाईल शॉपी, मसाले तयार करणे, लॉन्ड्री/धोबी व्यवसाय, चिकन/मासे विक्री केंद्र, बटाटा वेफर्स बनविणे इत्यादी व्यवसायासाठी कर्ज देय आहे.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये लाभार्थी हिस्सा 5 टक्के, राष्ट्रीयकृत बँकेकडून विहित व्याजदराने 50 टक्के कर्ज व 45 टक्के शासन अनुदानाचा समावेश आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित तृतीयपंथीय व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा किमान दहा वर्ष रहिवासी असणे आवश्यक आहे. संबंधिताकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. या कर्ज योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या जामीनदाराची तसेच कोणत्याही प्रकारचे तारण ठेवायची गरज नाही. संबंधित लाभार्थी निवडीचे अधिकार जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखालील समितीस आहेत. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त क्र. : दिनांक : 19 मे 2026
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश सुरू
बीड, दि. 19 (जिमाका) :- अंबाजोगाई शहरात शिक्षण घेत असलेल्या इयत्ता आठवी पासून पुढील वर्गातील सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अंबाजोगाई येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावेत. काही अडचण आल्यास गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह अंबाजोगाई यांच्याशी संपर्क करावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)