बीड, दि. 8 :- सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद येथील वेतन
पडताळणी पथक दि. 8 ते 10 फेब्रुवारी 2017 या कालावधीत बीड येथे येणार आहे. या दौऱ्यामध्ये
हे पथक दिनांक 8 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सेवापुस्तकांची
पडताळणी करणार असून दि. 9 ते 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा व तालुकास्तरावरील कार्यालयातील
सेवापुस्तकांची पडताळणी करणार आहे.
जिल्हयातील
संबधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करताना महाकोषमधील
व वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगईन करावे, डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात
येत असलेले युजरनेम व पासवर्ड यांचा वापर करावा. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणी
करावयाची आहेत त्या कर्मचाऱ्यांचा सेवार्थ एम्प्लॉयर आय.डी. टाकून सबमिट करुन वेतन
पडताळणी पथक, औरंगाबाद यांच्या नावे तयार होणारे पत्र पडताळणी करावयाच्या सेवापुस्तकांसोबत
सादर करावे व सेवापुस्तकांची पडताळणी करुन
घ्यावी असे सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा