बीड,
दि. 8 :- राष्ट्रीय
निवृत्तीवेतन योजनेच्या परिणामकारक अंमलबजवणीसाठी व राष्ट्रीय निवृत्ती वेतनधारकांच्या
जागृती आणि सुविधेकरीता दिनांक 1 ते 15 फेब्रुवारी 2017 या कालावधीमध्ये बीड जिल्हा
कोषागार कार्यालयात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला
आहे. या सेवा पंधरवाड्यात आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट
देऊन आपल्या शंकांचे निरसन करु शकतात. तसेच या सेवा पंधरवाड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी
जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने सोमवार,
दिनांक 13 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन
समिती सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील
सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा कोषागार
अधिकारी डी.डी. माडे यांनी केले आहे.
-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा