बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

सुशिक्षीत बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्रात व्यवसायाकरीता कर्ज प्रस्ताव सादर करावेत



            बीड, दि. 2 :- जिल्हा उद्योग केंद्र बीड मार्फत सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींकडून शासनाच्या सुधारीत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेतंर्गत व्यवसायाकरीता कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

            सुधारीत बीज भांडवल योजना या योजनेतंर्गत व्यवसाय, उद्योग व सेवाकरीता अनुक्रमे  25 लाख व 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिल्या जाते, अर्जदाराचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असावे, अर्जदाराचे  सेवायोजन कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी, अर्जदाराचे  शिक्षण इयत्ता 7 च्या पुढे असावे, अर्जदारास कर्ज मंजूर झाल्यास बँकेमार्फत 75 टक्के व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत 15 टक्के ते 20 टक्के सुधारीत बीज भांडवल मिळेल. जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना ही योजना उद्योग व सेवा करीता लागु आहे, अर्जदाराचे वय 18 ते 50 च्या दरम्यान असावे, अर्जदार ग्रामीण भागातील व ग्रामीण कारागीर असावा, अर्जदार शिक्षित, निरक्षर असावा, अर्जदारास कर्ज  मंजूर झाल्यास बँके मार्फत 75 टक्के, 65 टक्के कर्ज  व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत 20 ते 30 टक्के मार्जीन मनी बीज भांडवल मिळेल, तरी या योजनतंर्गत इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, बीड यांनी कळविले आहे.

११ टिप्पण्या:

  1. Sir mala Pani filter cha business karaycha ahe ..Maja education BA , Ded zala ahe..tar mala tya business sathi loan pahije ahe

    उत्तर द्याहटवा
  2. सर मला मेडिकल स्टोअर चालु करायचे आहे. माझे शिक्षण डी. फार्मसी आणि बी. फार्मसी झाले आहे. तरी मी अनुसूचित जाती (मांग) आहे.तर या साठी कर्ज मिळेल का? कृपया कळवा

    उत्तर द्याहटवा
  3. सर माझी एक बहीण आहे ती विधवा आहे तिचे शिक्षण दहावी पास आहे तिला शिवणकाम आणि हस्त कला येते तिला लेडीज बुटीक टाकण्यासाठी आम्ही लोहार आहे तरी आपल्या कडून तिला लोन मिळेल ❓कृपया आम्हाला कळवा हि नम्र विनंती ��

    उत्तर द्याहटवा
  4. योजनाची जाहिरात पाठवावे
    नक्की कोण कोणती योजना आहे ते

    उत्तर द्याहटवा
  5. मला चिप्सची फॅक्टरी टाकायची आहे तर लोन मिळवण्यासाठी काय करावे लागेल

    उत्तर द्याहटवा