बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

अपंग कल्याण राज्य पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत


                   
          बीड, दि. 23 :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सन 1982 पासून प्रतिवर्षी अपंग राज्य पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी दि.3 डिसेंबर या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सन 2017 वर्षातील पुरस्कार देण्यात येणार असल्याने पात्र अपंग व्यक्ती, संस्था, अपंगाचे नियुक्तक यांनी दि.8 सप्टेंबर 2017 पर्यत अर्ज सादर करावेत.
          स्वयंउद्योग करणाऱ्या अपंग व्यक्ती किंवा अपंग कर्मचारी यांना उत्कृष्ट अपंग कर्मचारी/ स्वयंउद्योजक पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार शासकीय, निमशासकीय क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रामधील अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर व मतिमंद प्रवर्गातील व्यक्तींना देण्यात येतो. तसेच जास्तीत जास्त अपंग व्यक्तींना त्यांच्या आस्थापनेत नोकरी उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय, सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील संस्थेला उत्कृष्ट नियुक्तक म्हणून पुरस्कार दिला जातो. पुरस्कारासाठी करावयाच्या अर्जाचे नमुने जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात दि.28 ऑगस्ट 2017 पर्यंत उपलब्ध आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर आहे. असे बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा