बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



          बीड, दि. 23 :- जिल्ह्यात गणेश मुर्तीची स्थापना दि.25 ऑगस्ट 2017 रोजी होत आहे व गणेश मुर्तीचे विसर्जन दि.5 सप्टेंबर रोजी होत असल्याने जिल्ह्यात कायदा  व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व अबकारी विभागाच्या सर्व देशी दारु, विदेशी दारु, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, सीएल-2 सीएल-3, बियर शॉपी, ताडी आदी अनुज्ञप्ती गणेश मुर्ती स्थापनेचा दिवस दि. 25 ऑगस्ट व गणेश विसर्जन दि.5 सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर मौजे लिंबा गणेश क्षेत्रातील भालचंद्र गणेश मंडळाचे गणेश विसर्जन असल्याने दि.31 ऑगस्ट रोजी तर माजलगाव तालुक्यातील टेंबे गणेश मंडळाची मिरवणूक दि.7 सप्टेंबर रोजी असल्याने तालुका क्षेत्रातील मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद राहतील असेही आदेशात नमुद केले आहे. अनुज्ञप्ती धारकाने वरील दिनांकास अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात.  आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा