बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

खरीप हंगाम 2017-2018 शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी 4 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ



बीड,दि.2:-खरीप हंगाम 2017 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी बीड जिल्हयात दि. युनायटेड इंडिया इंन्शुरंन्स कंपणी लि,पुणे या विमा कंपणीमार्फत राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनामध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतीम मुदत 31 जुलै 2017 वरुन  कृषि व पदुम विभागाच्या दि. दि.1 जुलै2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये दि.5 ऑगस्ट 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापी वरील शासन निर्णय अधिक्रमित करुन प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2017 मध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभागाची मुदत पुढील अटी व शर्तीवर   दि. 4 ऑगस्ट 2017 पर्यंत  मुदत वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रस्तुत मुदतवाढ केवळ बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठीच देण्यात आली आहे. मुदत वाढीच्या कालावधी दरम्यान केवळ ऑनलाईन पध्दतीने www.agri-insurance.gov.in या संकेतस्थळावर (पोर्टलवर) जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून अथवा स्वत:शेतकऱ्यांनी थेट भरलेले अर्जच मान्य करण्यात येणार आहेत. अर्जदार शेतकऱ्याकडील पिक पेरणी प्रमाणपत्र दि.31 जुलै2017 अथवा त्यापुर्वीचे असणे आवश्यक आहे. तसेच मुदतवाढीच्या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या अर्जाबाबतची माहीती स्वतंत्र ठेवण्यात यावी.

 ज्या शेतकऱ्यांनी  पिक विमा रक्कम भरणा केली नाही अशा जिल्हयातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता  तात्काळ जनसुविधा केंद्राच्या माध्यमातून अथवा स्वत:शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज ऑनलाईन भरणा करुन प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी, बीड यांनी केले आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा