बुधवार, ९ ऑगस्ट, २०१७

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकडून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना आवाहन



          बीड, दि. 8 :- भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता अंतर्गत शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी कार्यन्वित असलेल्या अर्थ सहाय्याच्या  समान निधी व असमान निधी योजनांमधून ग्रंथालय संचालनालय,  महाराष्ट्र राज्य , नगर भवन, मुंबई यांच्या मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.nic.in या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.
          राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी संबधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in  संकेतस्थळ पहावे, ग्रंथालयांनी समाननिधी व असमाननिधी योजनेसाठी विहित पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेमधील प्रस्ताव चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दि.24 ऑगस्ट 2017 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत असे आवाहन किरण गं. धांडोरे, ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई यांनी राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा