मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७

स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते संपन्न





          बीड, दि. 15:- स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
            यावेळी जिल्हा पोलीस जी.श्रीधर, जिल्हा परिषद अध्यक्षा  श्रीमती सविता गोल्हार, उपाध्यक्षा श्रीमती जयश्री मस्के, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
            प्रारंभी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेवून आस्थेवाईकपणे त्यांची विचारपूस केली.        
            संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2016-17 मधील जिल्हास्तरीय पुरस्कार पात्र ग्रामपंचायतीना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये ग्रामपंचायत टाकळी देशमुख ता.परळी सरपंच श्रीमती सुवर्णा भीकाजी कलगुडे ग्रामसेवक प्रकाश बंकटराव करपे. द्वितिय पुरस्कार-ग्रामपंचायत ताडसोन्ना ता.बीड सरपंच श्रीमती द्रौपदी सोमनाथ माने, ग्रामसेवक संतोष नाथा शिंदे. तृतीय पुरस्कार विभागून- ग्रामपचायत गुंधावाडी ता.बीड सरपंच आप्पासाहेब नामदेव माने, ग्रामसेवक इनकर पुष्पराज विश्वनाथ. ग्रामपंचायत देवगाव ता.वडवणी सरपंच श्रीमती कैवल्याबाई रघुनाथ सुरवसे.  ग्रामसेवक रामहरी व्यंकटी मंत्री यांना प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह व पुष्पगुछ देवून सत्कार करुन पुरस्कार देण्यात आले.
            शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात आणि विभागात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यामध्ये सीनीयर जी इंग्लीश स्कुल प्राशा अंबाजोगाईचा विद्यार्थी पार्थ मनोजकुमार बडगीने, स्वामी विवेकानंद प्राशा अंबाजोगाईची विद्यार्थींनी गौरी धनंजय देशमुख, वसुंधरा प्राशा आष्टीचा मुकुंद हेमंत देशमुख, वसुंधरा प्राशा आष्टीचा शेख जिशान सलीम, वसुंधरा प्राशा आष्टीचा प्रणव हनुमंत केदार, वसुंधरा प्राशा आष्टीचा संस्कार रघुनाथ मुटकुळे आणि पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील वसुंधरा प्राशा आष्टीचा सय्यद मेहक सलीयोद्दीन, वसुंधरा प्राशा आष्टीचा दिशा हनुमंत केदार, प्रगती विद्यालय बीडची विद्यार्थींनी कल्याणी दिलीप कंठाळे, प्रगती विद्यालय बीडची विद्यार्थी सुशांत श्रीराम आघाव, भेल सेकंडरी स्कुल परळी येथील सिध्दार्थी प्रविण तापडिया यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला.  
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संगीता धसे व गणेश धस यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय मुख्य कार्यक्रमास जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा