बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हास्तरीय समितीमार्फत शाळांचे सर्वेक्षण



            बीड, दि. 2 :- राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाकडून तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्पपरिणामाबद्दल जनजागृती केली जात असून याची सुरुवात म्हणून दि.31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी बीड शहरातील चंपावती विद्यालय, भगवान विद्यालय व शिवाजी विद्यालयास समन्वय समितीचे सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भेटी देऊन वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केले.

            शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांनी तंबाखुच्या  व्यसनापासून दूर राहण्यासाठी शाळेमध्ये तंबाखु नियंत्रण कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. शाळेपासून 100 या  उत्तर परिसरात तंबाखु जन्य पदार्थ विक्री व सेवनास बंदी घालण्यास आली आहे. तसेच शाळेच्या परिसरात दर्शनीय भागात 60 सेंटीमीटर बाय 30 सेंटीमीटर चा तंबाखु विरोधी फलक बंधनकारक आहे. या संदर्भात तपासणी करण्यात आली. या विशेष मोहिम तपासणीसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सत्येद्र दबडगांवकर, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अभिमन्यु केरुरे, तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे डॉ.अमोल बन्सोडे, समन्वयक कृष्णा शेडगे हे उपस्थित होते. या कार्यक्रमास चंपावती विद्यालयाचे मुख्याधापक आर.आर.वाघमारे व उपमुख्याधापक आर.एस. कदम याचे वरील विशेष मोहिमेसाठी सहकार्य लाभले.             विद्यार्थ्यांनी निर्व्यसनी राहून आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व तंबाखु विरोधी जनजागृतीसाठी शाळेमध्ये घोषवाक्य, भिंतीचित्र निबंध स्पर्धा घेण्याचे मानस देखील शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा