बुधवार, २ ऑगस्ट, २०१७

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी विशेष घटक योजनेची अंमलबजावणी




            बीड, दि. 2 :- शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमातंर्गत कलम 11 अ अन्वये अनुसूचित जाती व नवबौध्द समाज घटकातील दारिद्ररेषेखालील  लाभधारकांना रोजगार उपलब्ध करुन देऊन त्यांना दारिद्ररेषेच्या वर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ राज्यात विशेष घटक योजना या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील लाभधारकांना त्यांच्या ग्रामोद्योग उभारणीकरीता त्याच्या गरजे इतपत  50 हजार रुपयांपर्यंत वित्त सहाय्य वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करुन देते. या कर्जावर मंडळामार्फत विशेष केंद्रीय सहाय्यातून रक्कम 10 हजार रुपयांपर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या 50 टक्के अनुदान रक्कम देण्यात येत आहे. विशेष घटक योजनेसाठी  10 हजार पर्यंत अथवा मंजूर कर्जाच्या 50 टक्के अनुदान रक्कम देण्यात येत आहे. विशेष घटक योजनेसाठी जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे  प्रमाणपत्र तहसीलदार यांचे ग्रामीण भागासाठी  40 हजार 500, शहरी भागासाठी 50 हजार 500, कोटेशन, जागेचा पी.टी.आर, दारिद्र रेषेचे प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक असून  या कागदपत्रासह पात्रताधारक अर्जदारांनी जिल्हा कार्यालय फोन क्र. 0240-222517 वर संपर्क साधावा किंवा मंडळाच्या जिल्हा कार्यालय द्वारा-जिल्हा उद्योग केंद्र, बंशीरगंज, बीड येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा आवश्यक पुर्तता करुन दयावी असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा