शुक्रवार, २२ मे, २०२६

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर बीड, दि.22 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने ( उस्मानाबाद-लातूर-बीड ) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक-2026 कार्यक्रमाची घोषणा केली आहे. याबाबत धाराशिव जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. निवडणुकीची अधिसूचना दि. 25 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. 1 जून 2026 आहे. अर्जांची छाननी दि. 2 जून रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून 2026 निश्चित करण्यात आली आहे. मतदान दि. 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. मतमोजणी सोमवार दि. 22 जून 2026 रोजी होईल. निवडणूक प्रक्रिया दि. 25 जून 2026 रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांनी कळविले आहे. -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा