गुरुवार, २ जुलै, २०२६
सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी अर्ज करावेत
बीड, दि.2 (जिमाका) :- राज्यस्तरीय योजनेअंतर्गत नवीन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पात्र गोशाळांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शासन निर्णयामधील तरतुदींनुसार बीड जिल्ह्यातील केवळ केज तालुक्यातुन पात्र असणाऱ्या गोशाळांचे अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. आर. डी. कदम यांनी दिली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश, लाभार्थी गोशाळेच्या निवडीच्या अटी व शर्ती, निवड प्रक्रिया तसेच अर्जाचा विहित नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अधिकृत https://schemes.mahagosevaayog.org/revised/govardhan-govansh-application या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र गोशाळांनी आपले अर्ज दि. 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्तक्र. :274 दिनांक : 2 जुलै 2026
हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
बीड, दि.2 (जिमाका) :- माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंती वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या ज माती विकास महामंडळाच्या बीड जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भुषण पवार, श्रीमती बांगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती बोराडे, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवाडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा