मंगळवार, १९ मे, २०२६

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश सुरू

बीड, दि. 19 (जिमाका) :- अंबाजोगाई शहरात शिक्षण घेत असलेल्या इयत्ता आठवी पासून पुढील वर्गातील सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अंबाजोगाई येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावेत. काही अडचण आल्यास गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकिय वसतिगृह अंबाजोगाई यांच्याशी संपर्क करावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा