खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर
विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
बीड, दि. 2 :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड यांच्यावतीने
खो-खो खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर दि.5
ते 15 मे 2017 या कालावधीत बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलातील खो-खो मैदानी आयोजित
करण्यात आले आहे.
शिबीरामध्ये 12 ते 17 वर्ष वयोगटातील शालेय मुला-मुलींना
मोफत प्रवेश देण्यात येणार असून क्रीडा कार्यालयातील तज्ञ क्रीडा मार्गदर्शकांद्वारे
सकाळ व सायंकाळच्या सत्रात तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील
सर्व शाळा, खेळाच्या विविध संघटना आणि क्रीडा मंडळांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. असे
बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा