बीड, दि. 3 :- डिजीटल इंडिया अंतर्गत ई-फेरफार प्रकल्पाची
अंमलबजावणी राज्यात सुरु असून या योजनेअंतर्गत महाराष्ट्र दिनापासून अचूक संगणकीकृत
गा.न.नं.7/12 साठी चावडी वाचनाची विशेष मोहिम राबविण्यात आली आहे.
कार्यक्रमानूसार दि.1 ते 15 मे 2017 कालावधीत आपला संगणकीकृत गा.न.नं.7/12 अचूक
असल्याची खात्री करण्यासाठी www.mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट
देवून काही आक्षेप असल्यास गावच्या तलाठ्यांशी संपर्क साधावा. दि.15 मे ते 15 जून या
कालावधीत शिवाय संगणकीकृत गा.न.नं.7/12 चे चावडी वाचन करण्यात येवून आक्षेप असल्यास
तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. दि.16 जून ते 31 जुलै कालावधीत संगणकीकृत गा.न.नं.7/12
मधील माहितीत प्राप्त आक्षेपांचा विचार करुन आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल आणि दि.1
ऑगस्ट 2017 पासून डिजीटल स्वाक्षरीत संगणकीकृत गा.न.नं.7/12 खातेदारांसाठी उपलब्ध होईल.
असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा