मा. उच्च न्यायालयाची ध्वनी प्रदुषणाबाबत सुचना
धार्मीक उत्सव, कार्यक्रमातून
होणारे ध्वनी प्रदुषण टाळावे
बीड, दि. 10 :- मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या
आदेशान्वये सर्व धार्मीक उत्सव, कार्यक्रम सार्वजनिक अथवा खाजगी ठिकाणी साजरे होत असताना
ध्वनी प्रदुषणाचा त्रास नागरिकांना होवू नये तसेच सार्वजनिक किंवा खाजगी ठिकाणी होत
असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणच्या आजूबाजूस सुध्दा ध्वनी प्रदुषणाची पातळी मोजून कायदेशीर
कार्यवाही होऊ शकते. यामुळे ध्वनी प्रदुषण टाळावे.
बीड जिल्ह्यातील
27 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकाऱ्यांना ध्वनी प्रदुषणाची कार्यवाही करण्याकरीता प्राधिकृत
केले असून पोलीस अधिकाऱ्यांची नाव, दुरध्वनी क्रमांकांची माहिती बीड पोलीस दलाच्या
www.beedpolice.com या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पोलीस
स्टेशनच हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी ध्वनी प्रदुषणाची तक्रार ते राहत असलेल्या पोलीस
स्टेशनच्या दुरध्वनी, ई-मेलवर तसेच जिल्हा पोलीस दल नियंत्रण कक्षाच्या दुरध्वनी क्रमांक
100 तसेच भ्रमणध्वनी 7249089102 वर एसएमएस, वॉटसॲपद्वारे देता येईल. ध्वनी प्रदुषण
कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कार्यवाही होवून गुन्हा दाखल होतो. गुन्हा शाबितीनंतर
5 वर्ष कैद किंवा 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा होवू शकते यांची नागरिकांनी दक्षता घेवून
आगामी काळात येणाऱ्या सण, उत्सवाच्या काळात ध्वनी प्रदुषण होणार नाही यांची दक्षता
घ्यावी. असे पोलीस अधिक्षक, बीड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा