सोमवार, ३ एप्रिल, २०१७

सामाजिक न्याय विभागाकडून राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन



          बीड, दि. 3 :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण कार्यालय, बीड आणि गुरुकिल्ली ॲकॅडमी, बीडच्या माध्यमातून राज्यस्तरीय सामान्यज्ञान  परीक्षा 2017 चे आयोजन  करण्यात आले असून यात एकुण 5 लक्ष रुपयापेक्षा अधिक बक्षिसाचा  समावेश करण्यात आला आहे.

          प्रथम बक्षिस 1 लाख रुपये, द्वितीय बक्षिस 51हजार रुपये, तृतिय बक्षिस 21 हजार रुपये असे देण्यात येणार आहेत. तर उत्तेजनार्थ बक्षिस म्हणून 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 हजारची बक्षिसे, 200 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 500 रुपयांची बक्षिसे, 1000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 100 रुपयांची बक्षीसे आणि 2000विद्यार्थ्यांना चालु घडामोडी पुस्तक बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहे. या व्यतिरीक्त प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यांना 10 हजार किंमतीचे ऑनलाईन प्रश्नपत्रिका 100 संच देण्यात येतील. सहभागी प्रत्येक इच्छुक विद्यार्थ्यांना 5 महिने कालावधीचे मोफत एमपीएससी पुर्व  व मुख्य परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील पाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले एका वर्षासाठी दत्तक घेण्यात येणार आहेत. ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2017 आहे. बँकेत शुल्क भरण्याची शेवटची तारीख 21  एप्रिल बँकेच्या वेळेनूसार राहील. लेखी परीक्षा दि.25 जून 2017 रोजी नियोजित आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. असे बीड समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा