बीड, दि. 8 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या
पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार
दि.9 एप्रिल 2017 रोजी औरंगाबाद येथून वाहनाने शासकीय विश्रामगृह, बीड येथे सायंकाळी
6 वाजता आगमन व राखीव. सायंकाळी 6.30 वाजता श्री.सुरेश नवले, माजी राज्यमंत्री यांच्या
कन्येच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता वाहनाने परळीकडे प्रयाण.
रात्री 9.30 वाजता परळी निवासस्थानी आगमन व राखीव.
सोमवार
दि.10 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता वाहनाने ता.अंबाजोगाईकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता
आगमन व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन उदघाटनास उपस्थिती. दुपारी 10.30 वाजता अपर
पोलीस अधिक्षक कार्यालय व अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्टेशन उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 12 वाजता वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता श्री.संदिप टाक यांच्या
परळी निवासस्थानी आगमन व परळी सराफ असोसिएशनतर्फे सत्कार सोहळ्यास उपस्थिती. दुपारी
2.30 वाजता परळी शहर येथे भाजपा आयोजित सशक्तीकरण व गरीबकल्याण अभियानास उपस्थिती व
पत्रकार परिषद. दुपारी 4वाजता अभ्यागतांचे भेटीसाठी राखीव. सायंकाळी 6 वाजता भाजपा
पदाधिकारी यांच्या भेटीसाठी राखीव व मुक्काम.
मंगळवार
दि.11 एप्रिल रोजी परळी येथे राखीव. दुपारी 3 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा