बीड, दि. 3 :- राज्याच्या ग्रामविकास
आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड
जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि.4 जानेवारी 2017 रोजी सकाळी 9 वाजता परळी निवासस्थान
येथून अंबाजोगाई मार्गे ता.केजकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता मौजे सावळेश्वर ता.केज
येथे आगमन व रस्त्याचे भूमिपूजनास उपस्थिती. सकाळी 10 वाजता मौजे पैठण ता.केज येथे
आगमन व रस्त्याचे भूमिपूजनास उपस्थिती. सकाळी 10.15 वाजता मौजे युसुफ वडगाव ता.केज
येथे आगमन व रस्त्याचे भूमिपूजनास उपस्थिती व सभा. सकाळी 10.45 वाजता मौजे गोटेगाव
ता.केज येथे आगमन व रस्त्याचे भूमिपूजनास उपस्थिती. सकाळी 11 वाजता मौजे साळेगाव ता.केज
येथे आगमन व रस्त्याचे भूमिपूजनास उपस्थिती. सकाळी 11.15 वाजता केज येथील पंचायत समितीच्या
नविन इमारतीच्या भूमिपूजनास उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता टाकळी ता.केज येथे आगमन व
रस्त्याचे भूमिपूजनास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता मस्साजोग ता.केजे येथे आगमन व रस्त्याचे
भूमिपूजनास उपस्थिती. दुपारी 12.45 वाजता मौजे सारुक पाटी ता.केज येथे सीएमजीएसवाय
अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजनास उपस्थिती. दुपारी 1.10 वाजता मौजे दहिफळ (वड) फाटा ता.केज
येथे आगमन सीएमजीएसवाय अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजनास उपस्थिती व सभा. दुपारी 1.30 वाजता
मौजे तांदळ्याची वाडी ता.केज येथे आगमन व रस्त्याचे भूमिपूजनास उपस्थिती. दुपारी
1.50 वाजता मौजे डोईफोडवाडी ता.केज येथे आगमन व सीएमजीएसवाय अंतर्गत रस्त्याचे भूमिपजूनास
उपस्थिती. दुपारी 2.15 वाजता मौजे येळंबघाट माऊली चौक ता.केज येथे आगमन व रस्त्याचे
भूमिपूजनास उपस्थिती. दुपारी 2.40 वाजता मौजे चाकरवाडी ता.बीड येथे आगमन व रस्त्याचे
पुलाचे भूमिपूजनास उपस्थिती. दुपारी 3.10 वाजता जेबा पिंप्री-चांदेगाव ता.बीड येथे
33 केव्ही सब स्टेशनचे भूमिपूजन. दुपारी 3.45 वाजता मौजे चांदेगाव येथे जलयुक्त शिवार
योजनेतील कामाचे व विविध रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन. दुपारी 4 वाजता मौजे सात्रा
पोत्रा मुर्शदपूर ता.बीड येथे सीएमजीएसवाय अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन. सायंकाळी
4.45 वाजता पोथ्रा-मुर्शदपूर ता.बीड येथे पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्री.क्षेत्र काशेश्वरी
देवी मंदिर परिसर विविध विकास कामे भूमिपूजन व जाहिर सभा. सायंकाळी 5.30 वाजता मौजे
अंबील वडगाव ता.बीड येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन. सायंकाळी 5.45 वाजता माविम आयोजित
महिला क्रीडा स्पर्धा विजेत्यांना बक्षिस वितरण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता
मौजे नेकनूर ता.बीड येथील खतीब गल्ली (जामा मशीद जवळ) शादिखाना व संरक्षण भिंत भूमिपूजन.
सायंकाळी 6.20 वाजता नेकनूर ता.बीड येथे जाहिर सभा. सायंकाळी 7 वाजता श्री.क्षेत्र
नारायणगड पोंडूळ ता.शिरुर कासार येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन. रात्री 7.45 वाजता
मौजे वंजारवाडी ता.बीड येथे सीएमजीएसवाय अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन व जाहिर सभा. रात्री
8.30 वाजता वाहनाने परळी वैजनाथकडे प्रयाण. रात्री 10.30 वाजता परळी निवासस्थानी आगमन
व मुक्काम.
गुरुवार दि.5 जानेवारी 2017 रोजी सकाळी 8 वाजता वाहनाने कुसळंब
ता.पाटोदाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता आगमन व पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत खंडोबा देवस्थानच्या
विकास कामांचा व सीएमजीएसवाय रस्त्याच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. दुपारी
12.30 वाजता वाहनाने श्री.क्षेत्र गहिनीनाथगड ता.पाटोदाकडे प्रयाण. दुपारी 12.45वाजता
आगमन व श्री.क्षेत्र गहिनीनाथगड देवस्थानच्या विकास कामाचे भूमिपूजन व राखीव. दुपारी
2 वाजता आष्टी येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या उदघाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 2.45
वाजता आष्टी येथे भारती फुड प्रॉडक्टच्या भूमिपूजनाच्या समारंभास उपस्थिती. दुपारी
3.30वाजता वाहनाने तितरवणी ता.शिरुरकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता आगमन व विविध विकास
कामांचा शुभांरभ. सायंकाळी 6 वाजता वाहनाने परळी वैजनाथकडे प्रयाण. रात्री 9 वाजता
परळी निवासस्थानी आगमन व मुक्काम.
शुक्रवार दि.6 जानेवारी 2017 रोजी सकाळी 9 वाजता वाहनाने
ता.माजलगावकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता बीड-परळी रस्त्यावर जवळा फाटा ता.धारुर येथे
फकीर जवळा ते चिखली देवठाना रस्त्याचे भूमिपूजन. सकाळी 10 वाजता दिंद्रुड ता.माजलगाव
येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व बसस्टँड चौक येथे जाहिर सभा. दुपारी 11.30 वाजता
पात्रूड ता.माजलगाव येथे पात्रूड लोनगाव रस्त्याचे भूमिपूजन व सभा. दुपारी 12.30 वाजता
वाहनाने वडवणी मार्गे ताडसोन्ना ता.बीडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता आगमन व 2515 निधी
अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 2 वाजता ताडसोन्ना ते पिंपळनेर ता.बीड दरम्यान
पुलाचे भूमिपूजन. दुपारी 2.30 वाजता मनोज पाटील जिप सदस्य यांचे निवासस्थानी राखीव.
दुपारी 3 वाजता पिंपळनेर ता.बीड येथे सीआरएफ अंतर्गत पिंपळनेर पात्रूड रस्त्याचे भूमिपूजन.
दुपारी 3.15 वाजता पिंपळनेर फाटा ते सांडरवन फाटा ता.बीड रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी
3.30 वाजता पिंपळनेर ते घाटसावळी ता.बीड हिवरापहाडी
मार्गे रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 3.45 वाजता पिंपळनेर ते बेलवाडी ता.बीड सीएमजीएसवाय
रस्ता भूमिपूजन. दुपारी 4 वाजता पिंपळनेर येथे जाहिर सभा. दुपारी 4.45 वाजता पिंपळनेर
ते कुक्कडगाव ता.बीड रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन. सायंकाळी 5 वाजता ईट गुंदा ते
लोणी शहाजानपूर सीएमजीएसवाय रस्ता भूमिपूजन. सायंकाळी 5.15 वाजता वडगाव ते गुंजाळा
रस्ता भूमिपूजन. सायंकाळी 5.30 वाजता गुंधावाडी फाटा ते गुंधावाडी रस्ता भूमिपूजन.
सायंकाळी 5.45 वाजता कुक्कडगाव ते कुर्ला रस्ता कामाचे भूमिपूजन. सायंकाळी 6.30 वाजता दर्पण दिनानिमित्त पत्रकार
भवन, गेवराई येथे सदिच्छा भेट. सायंकाळी 6.45 वाजता राक्षसभूवन ता.गेवराई येथे सीआरएफ
अंतर्गत रस्ता कामाचे भूमिपूजन. रात्री 7.30 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा