बीड, दि. 3 :- बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भरविण्यात आलेल्या
कॅशलेस आर्थिक व्यवहारासंबंधीची माहिती देणाऱ्या चित्रमय प्रदर्शनाचे फित कापून उदघाटन
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकारातून हे चित्रमय
प्रदर्शन भरविण्यात आले असून यामध्ये चित्रकार सुहास पालीमकर यांनी रेखाटलेली रंगीत
चित्रांचा समावेश आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून
जनतेला कॅशलेस व्यवहाराचे महत्व अधोरेखीत करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने गेल्या
महिनाभरात विविध ठिकाणी कॅशलेस व्यवहाराल प्रोत्साहन देण्यासाठी मेळावे, कार्यशाळ व
शिबिरे घेतली असून पाटोदा शहर संपूर्णपणे कॅशलेस करण्याचा निर्धार केला आहे. त्या ठिकाणी
बँका, शासकीय तसेच स्वयंसेवी संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी संपूर्णपणे प्रयत्नशील असून
लवकरच काम पूर्ण होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील
सर्व राष्ट्रीयकृत बँका आपल्या क्षेत्रातील गावे कॅशलेस करण्याच्या प्रयत्नात
असून कॅशलेस व्यवहाराला नागरिक प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी
राम यांनी यावेळी दिली. पालकमंत्री मुंडे यांनीही यावेळी कॅशलेस व्यवहाराविषयी नागरिकांनी
अधिकाधिक जागरुक व्हावे असे आवाहन केले व चित्रमय प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल कौतूक
केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा