बुधवार, ४ जानेवारी, २०१७

राखीव जागेवरील उमेदवारीसाठी जात वैधता समितीकडील पोच पावती सादर करणे बंधनकारक



बीड, दि. 4 :- जिल्हा‍ परिषद  व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका जानेवारी-फेब्रुवारी 2017 मध्ये जाहिर होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी राखीव जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठविल्याची पोच पावती सादर करणे बंधनकारक आहे.

आगामी जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जात वैधता प्रस्ताव नामनिर्देशन पत्रासोबत सादर करण्यासाठी 31 डिसेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडून प्राप्त होणारे जात वैधता पडताळणीचे प्रस्ताव संबंधित तहसीलदार यांची स्वाक्षरी करुन जिल्हास्तरीय जातवैधता समिती,बीड व अनुसूचित जमाती प्रवर्गाचे प्रस्ताव उपसंचालक (संशोधन) तथा सदस्य सचिव अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद येथे संबंधित उमेदवारांनी दाखल करावेत. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा